Ramprahar News Team

राज्यातील मंजूर ट्रामा केअर सेंटरच्या उभारणीबाबत विधिमंडळात तारांकित प्रश्न 

आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष पनवेल : प्रतिनिधी – मुंबईत सुरु असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्यातील मंजूर ट्रामा केअर सेंटरच्या उभारणीबाबत तारांकित प्रश्न दाखल करून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले आहे.  राज्यातील महामार्गावर होणारे अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता अपघातग्रस्तांसाठी गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय …

Read More »

राज्यात “मिशन वात्सल्य” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधिमंडळात तारांकित प्रश्न 

पनवेल : प्रतिनिधी – राज्यात “मिशन वात्सल्य” योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत या प्रश्नावर शासनाचे लक्ष केंद्रित केले.       राज्यात कोरोना संसर्गाने मातृ-पितृ छत्र हरपलेल्या अनाथ बालकांना तसेच कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे कोरोनाने निधन होऊन एकल किंवा विधवा झालेल्या …

Read More »

रायगडातील हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट

एके 47 रायफल्स, जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ श्रीवर्धन ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे समुद्रात संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल आणि तब्बल 250 जिवंत काडतुसे असल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा …

Read More »

माणगावात ग्रंथ पारायण

माणगाव : रामप्रहर वृत्त जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज व प. पू. कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दक्षिण रायगड ज़िल्ह्यात श्रावण महिन्याचे आचित्य साधून श्री लिलामृत ग्रंथ पारायण सोहळे आयोजित केले जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून माणगाव येथील सेवाकेंद्रात मंगळवारी (दि.16) श्री लिलामृत ग्रंथाचे एक दिवशीय पारायण करण्यात आले. जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज …

Read More »

कर्जतमधील शिबिरात 73 जणांचे रक्तदान

कर्जत : बातमीदार सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या कर्जत विभागाच्या वतीने सोमवारी (दि. 15) शहरातील अंबामाता मंदिरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 73 दात्यांनी रक्तदान केले. सह्याद्री प्रतिष्ठानचे सुधीर साळोखे, प्रणव जंगम, स्वप्नाली पाटील, सूरज खडे यांच्यासह अनेक सदस्यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Read More »

रोहा रेल्वे स्टेशन मार्गावर बसविले दिशाफलक

सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचा उपक्रम   धाटाव : प्रतिनिधी रोहा रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर सुराज्य प्रतिष्ठानने दिशादर्शक फलक लावला आहेत. या फलकाचे अनावरण आरपीएफचे अधिकारी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी आदर्श गायकवाड यांनी पुढाकार घेतला होता. त्यांना प्रतिष्ठानच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर, कार्याध्यक्ष मयुर धनावडे, उपाध्यक्ष …

Read More »

पाली पोलिसांची रिले दौड; नागरिकांकडून गावोगावी स्वागत

पाली : रामप्रहर वृत्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाली पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी (दि.17) 75 किलोमीटर रिले दौंडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडमधील सहभागी झालेल्या पोलिसांचे गावागावाजवळ जंगी स्वागत करण्यात आले. ही अमृत महोत्सवी दौड पाली पोलीस ठाणे येथून बुधवारी 7 वाजता सुरू झाली. सुरुवातीला काही पोलीस  झाप गावापर्यंत …

Read More »

‘शिवरायांची आग्र्याहून सुटका इतिहासातील सर्वांत रोमांचकारी घटना’

अलिबाग : प्रतिनिधी देव, देशासाठी जीव ओवाळून टाकणारी पिढी घडविण्याची ताकद रायगड किल्ल्याच्या मातीत असून, त्या श्रध्देने प्रत्येकाने एकदा तरी किल्ल्यावर जावून तेथील माती आणून देवघरात ठेवावी, असे आवाहन शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी बुधवारी (दि. 17) रायगड जिल्हा परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान कार्यक्रमात केले. या वेळी …

Read More »

मुरूडसह रायगडात राष्ट्रगीताचे सामूहिक गायन

मुरूड : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर  राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 17) राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुरूड नगर परिषद कार्यालयाजवळही सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले. या वेळी नागरिकांनी भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण …

Read More »

तळाशेत येथील मंदिराचे लोकार्पण

माणगाव : प्रतिनिधी संत नामदेव हे पहिले राष्ट्रीय संत असून त्यांनी संपूर्ण देश जोडण्याचे काम केले. आपला पुनर्जन्मावर विश्वास नसून, या जन्माचे सोने करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे, असे प्रतिपादन  प्रसिध्द साहित्यीक माजी आमदार रामदास फुटाणे यांनी माणगाव तालुक्यातील तळाशेत येथे केले. भाजपचे तालुका अध्यक्ष आप्पा ढवळे यांनी आपल्या कमाईतून …

Read More »