मुंबई ः प्रतिनिधी भारताच्या यजमानपदाखाली 11 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत होणार्या कुमारी (17 वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यांसाठी नवी मुंबईसह भुवनेश्वर आणि गोवा या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका झुरिच येथे 24 जूनला जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाच्या साथीमुळे 2020मध्ये स्पर्धा रद्द करण्यात आल्यानंतर फिफा, …
Read More »रोशन खडे ठरला ‘खोपोली श्री’चा मानकरी
खापोली ः प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीपक ब्रदर्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकी गायकवाड आणि पदाधिकार्यांच्या पुढाकारातून रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन आणि खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने या वर्षीही खोपोली श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि. 16) करण्यात आले होते. स्पर्धेत चार वेगवेगळ्या गटांत …
Read More »महाडमध्ये अर्ध मॅरेथॉन, क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
महाड ः प्रतिनिधी वेदा जनजागृती मंचच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक धाव शहीदांसाठी ही हाफ मॅरेथॉन आणि राजमाता महिला क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांचे बक्षीस वितरण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या बक्षीस वितरण समारंभास पद्मश्री पुरस्काराने सन्मानित महाडचे …
Read More »मुरूड-जंजिरा खोरा बंदराला प्रवासी जेट्टीसाठी 11.27 कोटीचा निधी मंजूर
मुरुड जंजिरा : प्रतिनिधी मुरुड जंजिरा येथील खोरा बंदराला प्रवासी शासनाकडून जेट्टीसाठी 11.27 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. खोरा बंदर येथून जंजिरा किल्ल्यासाठी प्रवाशी जलवाहतूक सुरळीत सुरू आहे, मात्र जंजिरा किल्ल्यात जाणार्या पर्यटकांची संख्या वाढल्याने समुद्राच्या ओहोटीला प्रवाशी वाहतूक करणार्या बोटी जेट्टीला लागत नाहीत. प्रवाशांना चढणे उताराने त्रासाचे होते. त्यासाठी …
Read More »झुगरेवाडी शाळेला डिजिटल संच, स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची भेट
कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेवटचे टोक असणारी व दुर्गम भागातील संपूर्ण आदिवासी भाग असणारी झुगरे वाडी ही 100 घरांची वस्ती आहे. या शाळेत शिकणार्या मुलांना सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षक महाराष्ट्र अर्थात एटीएम समूह सदस्य रवी काजळे हे विक्रम अडसूळ यांचे आणि आएओइ मास्टर माईंड मुंबई …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वोत्तम विद्वान -संजीव नाईक
नवी मुंबई ः प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वोत्तम विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच आपण भारतीय बाबासाहेब यांना युगपुरुष म्हणून संबोधित करतो. समता, स्वतंत्र आणि बंधुत्व यावर आधारित त्यांनी लिहलेल्या आदर्श राज्यघटनेमुळेच आजही आपण एकसंघ आहोत, असे प्रतिपादन माजी खासदार संजीव नाईक यांनी नेरुळमध्ये बोलताना सांगितले. नेरुळ सेक्टर 6 सारसोले …
Read More »पालीत कचर्यामुळे गुरांचे आरोग्य धोक्यात
वाढता उष्मा आणि चार्याच्या अभावामुळे गुरांची फरफ ट होत आहीे. सध्या उन्हाचा तडाखा सर्वत्र वाढला आहे. मानवाबरोबरच प्राण्यांनाही उष्माचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्यांचा देखील अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न पाण्याची कमतरता भासू लागली आहे. ही मोकाट गुरे सध्या …
Read More »वादंगाची हनुमान उडी
मशिदींवरील भोंग्यांविषयीच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेची चांगलीच पंचाईत झालेली दिसते. अधुनमधून हिंदुत्वाची आरोळी ठोकणार्या शिवसेनेची अवस्था तेलही गेले, तूपही गेले अशीच सध्या झालेली आहे. हिंदुत्वाचा प्रखर पुरस्कार करावा तर ज्यांच्या सोबत सत्तेमध्ये मांडीला मांडी लावून बसलो ते नवे मित्रपक्ष दुखावतात. त्यांना चुचकारण्यासाठी हिंदुत्वाचा बाणा सोडून द्यावा तर परंपरागत मतदार …
Read More »गव्हाण : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंत्ती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त गव्हाण ग्रा.पं.तीच्या कार्यालयात जयंत्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी भेट देत डॉ.बाबासोहब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी गव्हाण ग्रा.पं.च्या सरपंच …
Read More »नितळस ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या निशा शरद पावशे यांची निवड
पनवेल : तालुक्यातील नितळस ग्रा.पं.च्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या निशा शरद पावशे यांची निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचीत सरपंच निशा पावशे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपनेते एकनाथ देशेकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper