अँटिग्वा ः वृत्तसंस्था अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला चार गड्यांनी पराभतू करून विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारत पाचव्यांदा अंडर 19 विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय त्यांच्या अंगलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज …
Read More »परीक्षा नव्हे, आव्हान!
दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत प्रचंड खेळखंडोबा करून ठेवल्यानंतर शिक्षणविभागाने अखेर दोन्ही परीक्षा ऑफलाइन म्हणजेच नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत करायचे म्हटले तर विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहून चिंता वाटू लागते आणि या निर्णयाला विरोध करावा तर विद्यार्थ्यांच्या नुकसानाची काळजी वाटते. अर्थात या निर्णयाचे काही नकारात्मक …
Read More »फणसाड अभयारण्यात जाळरेषा काढण्यास वेग; विहूर आदिवासीवाडीतील तरुणांची मदत
मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड अभयारण्य आगीपासून सुरक्षित रहावे, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जळीत रेषा काढण्याचे काम वेगात सुरु आहे. या कामात विहूर आदिवासी वाडीतील तरुण मदत करीत आहेत. मुरूड तालुक्यातील सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात फणसाड अभयारण्य पसरले आहे. या अरण्यात वन्यजीवांसह असंख्य पक्ष्यांच्या जाती …
Read More »कार्ले गावात गोळ्या येतातच कशा?
अलिबाग तालुक्यातील परहूरपाडा येथील पोलिसांच्या गोळीबार सरावावेळी डोंगरापलिकडील कार्ले गावात बंदुकीच्या गोळ्या येण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मागील आठवड्यात अशीच घटना घडली. एक गोळी घराच्या छपरातून आत आली. या घटना आता कार्ले गावाला नवीन राहिलेल्या नाहीत. या गोळ्यांमुळे कुणी जखमी झालेला नाही. वास्तविक पाहता परहूर आणि कार्ले या दोन गावांच्यामध्ये …
Read More »चौकमध्ये सरनौबत नेताजी पालकर यांना मानवंदना
चौक : रामप्रहर वृत्त विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि. 2) उंबरखिंड विजयोत्सव दिन साजरा करण्यात आला. संस्थेच्या कार्याध्यक्ष शोभाताई देशमुख यांनी सरनौबतांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रचिती देशमुख, जिया देशमुख, सलोनी पाटील, जिज्ञा शिंदे व प्राची जाधव …
Read More »नेरळ धरणाची स्वच्छता करावी; सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांची मागणी
कर्जत : बातमीदार नेरळ येथे कल्याण-कर्जत रस्त्याला लागून असलेल्या ब्रिटिशकालीन धरणामध्ये प्लास्टिक कचरा आणि पिशव्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे धरणातील गणेश घाटाच्या बाजूला उकिरडा निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या धरणाची स्वच्छता करावी आणि धरणाभोवती वॉकिंग ट्रॅक उभारावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांनी केली आहे. ब्रिटिश काळात बांधलेले हे …
Read More »महाडमध्ये 10 वर्षे अत्याचार करणार्यांवर दोन वर्षांनी गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी विवाहितेवर हुंड्यासाठी गेली दहा वर्षे अत्याचार करणार्या सासरच्या लोकांविरोधात पीडित महिलेने सन 2020मध्ये तक्रार केली होती, त्यांच्यावर गुरुवारी (दि. 3) महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिलेचा विवाह 13 मार्च 2010 रोजी विनेश सुदाम गायकवाड (रा. काकरतळे, महाड) याच्याशी रितीरीवाजाप्रमाणे झाला होता. नवरदेवाला मुलीच्या …
Read More »वढाव ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वढाव ग्रुपग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. मानांकन संस्थेचे मुख्य लेखापाल किरण भगत यांच्या हस्ते वढाव संरपच पूजा पाटील, उपसरपंच ओमकार म्हात्रे, ग्रामसेवक कुंभार यांनी हे प्रशस्तीपत्र स्वीकारले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेश वर्तक, पोलीस पाटील कविता म्हात्रे, समाजसेवक अशोक पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ या वेळी …
Read More »महडमध्ये कोरोना नियम पाळून होणार माघी गणेशोत्सव
खोपोली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी महड येथील श्री वरदविनायकाची पूजा बुधवारी (दि. 2) देवस्थानच्या कार्याध्यक्ष मोहिनी वैद्य यांच्या हस्ते केल्यानंतर मंदिरातील माघी गणेशोत्सवाला सुरुवात झाली. 7 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा माघी गणेशोत्सव यंदाही कोरोनाविषयक सर्व नियम पाळून साजरा होत आहे. महड येथील श्री वरदविनायक मंदिरातील माघी गणेशोत्सवात सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे …
Read More »माणगाव वडघर येथे नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा
माणगाव : प्रतिनिधी आशयानुसार कवितेचे सादरीकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन कोमसाप जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी माणगाव तालुक्यातील वडघर येथे केले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि कोमसाप उरण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 30) वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक येथे सुधीर शेठ यांच्या अध्यक्षतेखाली नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper