Breaking News

Ramprahar News Team

अण्णा हजारेंचा एसटी कर्मचार्‍यांच्या संपाला पाठिंबा

नगर ः वृत्तसंस्था राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. आपण प्रत्यक्ष संपात सहभागी होऊ शकत नसलो, तरी कर्मचार्‍यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अण्णांनी म्हटले. एसटी कर्मचार्‍यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. त्या वेळी अण्णांनी …

Read More »

काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

बंगळुरू ः वृत्तसंस्था काँग्रेसचे अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचं कौतुक करणार्‍या काँग्रेस नेत्यांमध्ये आणखी एक नाव जोडले गेलेय ते म्हणजे कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद माधवराज यांचे. प्रमोद माधवराज यांनी पद्म पुरस्कारांबाबतचा ट्रेंड बदलल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे. …

Read More »

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी -कपिल पाटील; वसंत डावखरे स्मृती पुरस्काराचे वितरण

ठाणे ः प्रतिनिधी भारतरत्न सचिन तेंडुलकर, प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांची खेळातील गती शिक्षकांनी ओळखली होती. त्याच धर्तीवर शिक्षकांनी चांगला समाज घडवित असतानाच विद्यार्थ्यांमधील गती ओळखावी, असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी (दि. 13) येथे केले. विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या स्मृत्यर्थ भाजप शिक्षक …

Read More »

अमरावतीत आज कडकडीत बंद; जमाव आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज

अमरावती ः प्रतिनिधी राज्यात शुक्रवारी ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चांमधून हिंसाचार उसळल्याच्या निषेधार्थ अमरावतीत भाजपने शनिवारी (दि. 13) बंदची हाक दिली होती. या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी जनक्षोभ उसळून जमाव आक्रमक झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. त्रिपुरा राज्यात झालेल्या कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर 15 …

Read More »

शोएब मलिकचे अभिनेत्रीसोबत फोटोशूट

लाहोर ः वृत्तसंस्था सध्या पाकिस्तानात आणि सोशल मीडियावर आयेशा ओमर आणि शोएब मलिकच्या हॉट फोटोशूटची चर्चा सुरु आहे. आयेशा ओमर पाकिस्तानी अभिनेत्री असून पाकिस्तानातील एका स्थानिक मॅगझिनसाठी आयेशा आणि शोएबने फोटोशूट केले आहे. स्विमिंग पूलसह अन्य फोटोमधील दोघांचा लूक आणि जवळीक यामुळे या फोटोशूटची चर्चा सुरू आहे. शोएब मलिक भारताची …

Read More »

चला धावूया आरोग्य जागरूकतेसाठी! कामोठ्यात आज फन रन

पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठ्यातील छाबा फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (दि. 14) बालदिनानिमित्त 5 आणि 10 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम समाज निर्माण करणे आणि वंचित मुलांच्या प्रगतीसाठी त्यांना पोषक अन्न व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ध्येयाने या फन रनचे आयोजन करण्यात आले आहे. कामोठे …

Read More »

खान साब तुमची जिद्द नडली!; पाकिस्तानच्या पराभवानंतर ट्वीट व्हायरल

कराची ः वृत्तसंस्था टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील दुसर्‍या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तान संघावर टीका केली जात आहे. एका बाजूला पाकिस्तानच्या पराभवाला काही ठराविक खेळाडू कारणीभूत असल्याची चर्चा रंगत असताना इमरान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांच्या ट्विटचीही चर्चा रंगली आहे. त्यांनी …

Read More »

महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानला सुवर्णपदक

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताची महिला सेलिंगपटू नेत्रा कुमानन हिने स्पेनमधील सेलिंग चॅम्पियनशिप जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. नेत्राने ग्रॅन कनारिया सेलिंग चॅम्पियनशिपमधील रेसर रेडीयल प्रकारात सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवणारी नेत्रा कुमानन ही भारताची पहिलीच महिला सेलिंगपटू ठरली आहे. स्पेनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत तीन देशांतील 20 स्पर्धकांनी …

Read More »

टीकाकारांना शास्त्रींचे सडेतोड उत्तर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलेय. टी-20 विश्वचषकात सुपर 12मधूनच भारत बाहेर पडल्यानंतर भारतीय संघावर जोरदार टीका झाली. यानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा करारही संपुष्टात आला. या सर्व घडामोडींवरच शास्त्री यांनी भाष्य केले तसेच भारतीय संघाने मागील सात वर्षांत …

Read More »

आरपीएलचे आज उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड प्रीमियर लीग क्रिकेट समिती आयोजित 25 वर्षाखालील मुलांची टी-20 क्रिकेट स्पर्धा 15 नोव्हेंबरपासून जेएनपीटी क्रिकेट मैदान आणि रसायनी-मोहोपाडा येथील एनआयएसएमच्या क्रिकेट मैदानावर सुरू होत आहे. तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि. 14) अलिबागच्या कुरूळ येथील क्षेत्रिय समाज हॉलमध्ये रंगारंग कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. या उद्घाटन समारंभास …

Read More »