Breaking News

Ramprahar News Team

पुढील दोन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मुंबई ः प्रतिनिधी ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून महासंचालक मृत्यूंजय मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषद घेत हा अंदाज वर्तविलाय. ऑगस्ट महिना पाहता महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस दिसून येतो, मात्र यंदा राज्यासह देशात पुढील दोन महिन्यांचा विचार केला तर पाऊस सरासरीपेक्षा अधिक राहिल, असे …

Read More »

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून कर्जतमधील पूरग्रस्त भागाची पाहणी

कर्जत : बातमीदार उल्हास नदीच्या पुराचे पाणी कर्जत शहरात घुसून मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कर्जतमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. कर्जत शहरातील सखल भागात पुराचे पाणी घुसले होते. अचानक आलेल्या पुरामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा …

Read More »

सावित्री नदीपूल दुर्घटनेची पुन्हा चौकशी करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी महाड येथील सावित्री नदी पूल दुर्घटनेची पुन्हा चौकशी करण्यात यावी, दोषींवर कारवाई करावी, जिल्ह्यातील जे पूल वाहतुकीस योग्य नाहीत अशा पुलांवरील वाहतूक ताबडतोब बंद करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी यांनी सोमवारी (दि. 2) येथे पत्रकार परिषदेत केली. 2 ऑगस्ट 2016 रोजी …

Read More »

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल आज

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल सोमवारी (दि. 3) जाहीर होणार आहे. कोरोनामुळे यंदा ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व मंडळांना बारावीचा निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य मंडळाला ही मुदत पाळता आली नव्हती. गेला …

Read More »

भारताची डिजिटल क्रांती; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘ई-रूपी’चा शुभारंभ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतातील नवे डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म ई रूपी सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 2) शुभारंभ करण्यात आला. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने वित्तीय सेवा विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मदतीने विकसित केलेले प्रीपेड ई-व्हाऊचर आहे, जे डिजिटल पेमेंटचे …

Read More »

राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या योगिनी पाटीलला रौप्यपदक

पनवेल ः वार्ताहर पनवेलमधील दोन मुलींनी 25 जुलै ते 31 जुलैदरम्यान हरियाणाच्या सोनीपत येथे आयोजित चौथ्या बीएफआय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये योगिनी पाटील ही 52 किलो वजनी गटात खेळली व तिने रौप्यपदक जिंकले. योगिनीने प्राथमिक तसेच उपांत्य फेरीत मध्य प्रदेश, प. बंगाल आणि दिल्लीच्या बॉक्सर्सचा पराभव केला. …

Read More »

सोनू सूद करणार भारताचे नेतृत्व; विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई ः प्रतिनिधी गरीब, त्रासलेल्या आणि गरजूंना मदत करणारा बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने अलीकडेच आपला 48वा वाढदिवस साजरा केला. या वेळी त्याच्या चाहत्यांव्यतिरिक्त, जवळचे मित्र आणि बॉलीवूड स्टार्सनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासह सोनूला त्याच्या वाढदिवशी विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर …

Read More »

ऑनलाइन बुद्धीबळ स्पर्धेत रशियाचा वाखलामोव्ह विजेता

मुंबई ः प्रतिनिधी दै. शिवनेरतर्फे माजी गृहराज्यमंत्री तथा भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वाढदिवसानिमित आयोजित ऑनलाइन विनाशुल्क बुद्धीबळ स्पर्धेत साखळी 11 फेर्‍यांमध्ये 10 गुण जिंकून रशियाचा फिडे मास्टर इगोर वाखलामोव्ह विजेता ठरला. वाखलामोव्हने उत्तम सरासरीच्या बळावर दिल्लीचा फिडे मास्टर आर्यन वार्ष्णेयला (10 गुण) द्वितीय स्थानावर टाकले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, इन्स्टिट्यूट …

Read More »

हॉकीत सुवर्णयुगाची नांदी; भारतीय महिला संघही सेमीफायनलमध्ये; ऑस्ट्रेलियाला नमविले

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला 1-0ने पराभूत करून ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना सुरू झाल्यानंतर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताच्या शर्मिला देवीला दुखापत झाल्याने मैदानाबाहेर जावे लागले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसर्‍या क्वार्टरमध्ये भारतीय महिला …

Read More »

अलिबागच्या सोगावमध्ये दरड कोसळण्याचा धोका; आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सोगाव येथील आदिवासी वाडीवर मातीचा काही भाग कोसळला. सुदैवाने जीवितहानी टाळली. येथील आदिवासी कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. सोगाव येथील आदिवासींच्या घराच्या पाठीमागे 30 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास डोंगराची माती येऊन भिंतीवर धडकली. या डोंगरावर  आरसीएफ कारखान्याला वीजपुरवठा करणारा टॉवर उभा …

Read More »