Breaking News

Ramprahar News Team

ओबीसी, ईडब्ल्यूएस घटकांना मेडिकल प्रवेशासाठी आरक्षण

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मेडिकल क्षेत्रातील शैक्षणिक प्रवेशांसाठी देशभरात यंदा इतर मागास वर्ग (ओबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय स्तरावर मेडिकलच्या प्रवेशासाठी ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण आणि …

Read More »

पनवेल ः न्हावे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या मंजुषा गोपीचंद ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी गुरुवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट घेतली. या वेळी उपसरपंच मंजुषा ठाकूर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. माजी सरपंच चंद्रकांत भोईर, सागरशेठ ठाकूर, …

Read More »

मेरी कोमचा पराभव

टोकियो ः वृत्तसंस्था लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या मेरी कोमला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराभवाचा धक्का बसला. महिलांच्या 48-51 किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व फेरीत मेरीचा कोलंबियाच्या इंग्रीट लोरेना व्हिक्टोरिया हिने पराभव केला. पहिल्या फेरीत इंग्रीटने आक्रमक खेळ करून 4-1 अशी बाजी मारली. दुसर्‍या फेरीत मेरीकडून पलटवार झाला. मेरीने या फेरीत 3-2 अशी …

Read More »

अतानू दास अंतिम 16मध्ये; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला नमविले

टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीमध्ये अतानू दासने अंतिम 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे अटीतटीच्या या सामन्यात अतानूने ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचाही पराभव केला. अतानू दासने आधी चीनी ताइपेच्या डेंग यू-चेंगचा 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. अतानूने हा सामना 27-26, 27-28, 28-26, 27-28 आणि …

Read More »

सिंधू उपांत्यपूर्व फेरीत : पदकापासून केवळ दोन विजय दूर

टोकियो ः वृत्तसंस्था विश्वविजेत्या पी. व्ही. सिंधूने ऑलम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणार्‍या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत 12व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा 40 मिनिटांमध्ये …

Read More »

बॉक्सर सतीश कुमारची उपांत्य फेरीत धडक

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय बॉक्सर सतीश कुमारने टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष सुपर हेवीवेट कॅटेगरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने 16व्या फेरीत जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला 4-1ने पराभूत केले. सतिशच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमध्ये पदकासाठी भारताच्या आशा उंचावल्या आहेत. पहिल्या फेरीत सतीशने प्रभावी खेळ करून पंचांची आणि उपस्थितांची मने जिंकली तर दुसर्‍या फेरीत …

Read More »

भारत उपांत्यपूर्व फेरीत; टोकियो ऑलिम्पिकध्ये अर्जेंटिनावर मात

टोकियो ः वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या अर्जेंटिनाला साखळी फेरीतील सामन्यात धूळ चारली आहे. भारताने अर्जेंटिनाविरुद्धचा सामना 3-1च्या फरकाने जिंकला. या विजयासोबतच भारताने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये एकाही संघाला गोल करता आला नाही. पहिल्या हाफपर्यंत दोन्ही …

Read More »

पनवेलच्या सोसायटी मित्र मंडळाकडून महाडमधील पूरग्रस्तांना मदत

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील मिडलक्लास हौसिंग सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने महाडमधील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत बुधवारी (दि. 28) सकाळी महाडला रवाना करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोसायटी मित्र मंडळाचे कौतुक केले. या वेळी मंडळाचे …

Read More »

महाडमध्ये भाजपचे अखंड सेवाकार्य; नेत्यांकडून पाहणी, मदतवाटपाचाही घेतला आढावा

महाड ः रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे महाडमध्ये पूर येऊन, तसेच दरड कोसळल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्त व दरडग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी केंद्र व राज्यातील भाजप नेते व लोकप्रतिनिधींनी तत्काळ धाव घेऊन पाहणी केली, तसेच पूरग्रस्तांना मदत देणे सुरू केले. त्यामुळे महाडकरांना मोठा दिलासा मिळाला. भाजप नेत्यांनी बुधवारीही (दि. 28) महाडमध्ये …

Read More »

महाड, पोलादपूर तालुक्यातील 188 गावे अद्यापही अंधारात

अलिबाग ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे महाड व पोलदपूर तालुक्यातील 268 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 80 गावांमध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे, मात्र अतिवृष्टी होऊन सात दिवस झाले तरी या दोन तालुक्यांतील तब्बल 188  गावांमधील 68 हजार 856 वीजग्राहक आजही अंधारात आहेत. अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर तालुक्यात महावितरणचे अतिउच्च दाबाचे …

Read More »