Breaking News

Ramprahar News Team

नियोजित डोलवी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध; जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना रोखले

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील काराव-गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) डोलवी औद्योगिक वसाहत विकसित करीत आहे. त्यासाठी सोमवारी (दि. 7) एमआयडीसी आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांनी भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याला शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. डोलवी औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसी …

Read More »

मुलाच्या स्मरणार्थ शाळेची दुरुस्ती

पनवेल : रामप्रहर वृत्त सातत्याने समाजसेवाचा ओढा घेतलेले सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जोशी यांनी त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ ओवे पेठ येथील शाळेची दुरुस्ती करून एका चांगला पायंडा पाडला आहे.  रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या ओवे पेठ मराठी शाळेची पडझड झाली होती. विद्या दानाचे काम होणार्‍या या विद्यालयाची इमारत तौक्ते वादळात नुकसानग्रस्त झाली. …

Read More »

10 जूनच्या आंदोलनासाठी नवी मुंबईतही बैठका; विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. यासाठी 10 जून रोजी होणार्‍या मानवी साखळी इशारा आंदोलनासाठी गावोगावी बैठका सुरू आहेत. त्याप्रमाणे जुईनगर, सारसोळे, नेरूळ या ठिकाणी ग्रामस्थांच्या बैठका झाल्या. या बैठकांना उत्स्फूर्तपणे विविध पक्ष, संघटना, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत …

Read More »

पनवेल मनपा क्षेत्रात विविध कामे; प्रभाग 19मधील नगरसेवकांचा पुढाकार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून नागरिकांच्या समम्या जाणून त्या सोडविण्याचे तसेच त्यांना विविध सुविधा देण्याचे काम सातत्याने करण्यात येत आहे. त्याअंतर्गत नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या नगरसेविक निधीमधून प्रभाग क्रमांक 19मधील पटवर्धन वाडा येथील गल्लीमध्ये स्टॅम्प काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या हस्ते …

Read More »

अ‍ॅपकॉटेक्स कंपनीच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

कळंबोली : प्रतिनिधी कोरोना काळात सर्वत्र आर्थिक व्यवहार ठप्प झालेले असताना बर्‍याच कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवलेली असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काहींना नोकर्‍यादेखील गमवाव्या लागल्या, असे असताना दुसरीकडे तळोजा औद्योगिक वसाहतीत असलेल्या अ‍ॅपकॉटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतील कामगारांना भरघोस अशी 14 हजार रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतलेला आहे. …

Read More »

पोलिसांकडून आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : वार्ताहर स्माईल फाऊंडेशन व ब्लू लाईन फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पनवेल तालूका पोलिसांनी आदिवासी वाड्या येथे जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत फणसवाडी (भाताण, पो. आजिवली, ता. पनवेल) ही आदिवासी वाडी आहे. त्या आदिवासी वाडीमध्ये एकूण 45 आदिवासी कुटुंबे राहतात. सध्याचे कोरोना महामारीमध्ये …

Read More »

नवी मुंबईच्या धान्य बाजार आवारात लसीकरण केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न

नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसी बाजार आवारातील 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग अशा सर्व घटकांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने निलेश वीरा फाउंडेशन व कच्छी भानुशाली समाज यांच्या सौजन्याने एमजीएम हॉस्पिटल, वाशी यांच्या माध्यमातून वाशी येथील एपीएमसी …

Read More »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, लोकनेते ‘दिबां’च्या नावासाठी प्रकल्पबाधित समितीचा पाठिंबा

पनवेल : वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्यास सिडको व शासनाविरोधात प्रकल्पबाधित 18 गाव समिती प्रचंड जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा सोमवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकार्‍यांनी दिला. या पत्रकार परिषदेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित 18 गाव समितीचे नंदाजी मुंगाजी, अ‍ॅड. …

Read More »

जि. प.च्या शिक्षकांसाठी फोनिक्स ऑनलाइन प्रशिक्षणाचा शुभारंभ

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या प्रगतीसाठी नवनवीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी फोनिक्स ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. गेले दीड वर्ष रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बंद शिक्षण सुरू या …

Read More »

कर्जत तालुक्यात शिवस्वराज्य दिन साजरा

कर्जत ः प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश परिपत्रकाद्वारे दिला होता. त्यानुसार तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवसक राजदंड स्वराज्य गुढी उभारून अभिवादन करण्यात आले. रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्य …

Read More »