Breaking News

Ramprahar News Team

उसरण धरणातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात; आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त उसरण धरण निर्माणानंतर जवळपास 32 वर्षांनी प्रथमच या धरणाच्या अनुषंगाने नाल्यातून जाणारे गाळ काढण्याचे काम झाले आहे. यासाठी उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी आला आहे. देवळोली गावजवळ 1989 साली उसरण या धरणाची निर्मिती झाली. डोंगर कपार्‍यात असलेल्या धरणाचे पाणी …

Read More »

मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह उपनगर भागात शनिवारी (दि. 12) पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात …

Read More »

आता घरीच मिळणार लर्निंग लायसन्स

पेण : प्रतिनिधी लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरीच ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. या लायसन्सची ऑनलाइन प्रिंट काढता येणार असल्याने शिकाऊ चालकांची आता एजंटच्या विळख्यातून सुटका तर होणार आहेच, शिवाय खर्च आणि वेळदेखील वाचणार आहे. आजच्या घडीला अनेकजण वाहने चालवतात. मात्र, काहीजणांकडे लायसन्स नाहीत. लायसन्स काढण्यासाठी …

Read More »

अलिबाग तालुक्यातील सहा गावे कंटेन्मेंट झोन घोषित

रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधी कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या अलिबाग तालुक्यातील सहा गावांना ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामध्ये सासवणे, नागाव, कुरूळ, नवेदर नवगांव, चौल व रेवदंडा या गावांचा समावेश आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषीत क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले असून त्या बाबतचे आदेश अलिबागचे …

Read More »

रा.स्व.संघ जनकल्याण समितीने दिला वादळग्रस्त आदिवासी भगिनीला आधार

कर्जत : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळात कर्जत तालुक्यामधील पेठ गावातील आदिवासी भगिनी नंदा डामसे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले होते. घराचे तसेच आतील सामानाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याची माहिती मिळताच रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी नंदा डामसे यांना घराच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने मदत केली. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच डामसे यांच्या घरावर छप्पर …

Read More »

हिंदुस्थान पेट्रोलियमची 26 सुरक्षारक्षकांवर कारवाई; प्रकल्पबाधित कामगारांना न्याय देणार भाजप नेते सुनील गोगटे यांचे आश्वासन

कर्जत : बातमीदार पाइपलाइनची रखवाली करणार्‍या 26 सुरक्षारक्षकांना  हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने तडकाफडकी कामावरून कमी केले आहे. हे सुरक्षारक्षक प्रकल्पग्रस्त असून, गेल्या तीन वर्षोपासून काम करीत होते. त्यांना न्याय्य मिळवून देण्याचे आश्वासन भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी दिले आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने पाइपलाइन टाकली असून, तिची सुरक्षा …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी संघर्ष सुरूच राहील -बाळासाहेब पाटील

पनवेल : वार्ताहरनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कृती संघर्ष समितीच्या वतीने विशाल असे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी स्व. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला दिले जात नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष सुरूच राहील असे …

Read More »

खारघरमध्ये वृक्षारोपण; वाढदिवस व पर्यावरण दिनाचे औचित्य

खारघर : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 70वा वाढदिवस व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ऑक्सिजन देणारे व आयुर्वेदिक असे कडुलिंबाच्या झाडांचे वृक्षारोपण खारघरच्या सेक्टर 11 येथे करण्यात आले. या वेळी नगरसेवक रामजी बेरा, भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जिल्हा मीडिया सहसंयोजिका मोना अडवाणी, सहकार सेल …

Read More »

धोकादायक वीजवाहिन्यांची दुरुस्ती; नगरसेवक राजू सोनी यांची तत्परता

पनवेल : वार्ताहर तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा रायगडसह पनवेललाही बसला. यादरम्यान विजेचेही मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब, विजवाहिन्या, डीपी वादळात कोलमडून पडले. नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने विद्युत महामंडळाने अथक प्रयत्न करून अल्पावधीतच वीजपुरवठा सुरळीत करून घेतला. वादळाच्या तडाख्याने पनवेल शहरातील रोहिदास वाडा याठिकाणी असणार्‍या विजेच्या खांबावरून मुख्य …

Read More »

धबधब्यांवर पर्यटकांना नो एण्ट्री

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील पांडव कड्यासह इतर छोट्या मोठ्या धबधब्यांवर पर्यटकांनी वर्षासहलीसाठी येऊ नये, असे आवाहन पोलिसांमार्फत करण्यात आले आहे. या संदर्भात खारघर पोलीस ठाण्याकडून सर्व पर्यटकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, खारघरमधील डोंगर भागात पावसाचे पाणी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे झरे निर्माण होऊन, खारघर परिसरातील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, …

Read More »