खोपोली : प्रतिनिधी पावसाळा सुरू होताच वर्षा सहलीसाठी निघालेल्या दुचाकीस्वार पर्यटकांवर खालापूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कोरोना संसर्ग लाटेचा प्रभाव काहीसा ओसरू लागल्यानंतर नागरिक बेफिकीर झाल्याचे दिसत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विनाकारण फिरणार्या दुचाकीस्वारांवर पोलीस दंडात्मक कारवाईदेखील करीत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने मुंबई, नवी मुंबईचे तरुण मोठ्या प्रमाणात खोपोली, …
Read More »ओबीसींचे आरक्षण रद्द केल्याविरोधात खोपोलीतून राज्य शासनाला निवेदन
खोपोली : प्रतिनिधी ओबीसी समाजाची जनगणना करून स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत द्यावे तसेच मुख्यमंत्र्यांनी ओबीसी समाजाच्या निवेदनामधील मागण्या मंजूर कराव्यात अशा मागण्यांची दोन वेगवेगळी निवेदने खोपोली शहरातील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांच्या उपस्थितीत खालापूर तहसीलदार इरेश चपल्लवार यांना देण्यात आली. माजी नगरसेवक राजेंद्र फक्के, …
Read More »सुधागडातील आदिवासींचे भाजीचे मळे उद्ध्वस्त, नुकसानभरपाईची मागणी
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आदिवासी बांधव नदीकिनारी जागा शोधून तेथे भाजीपाल्याचे मळे करून आपली उपजीविका करीत आहेत. त्यांनी फुलविलेल्या मळ्यांचे तौत्के चक्रीवादळात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी बाधीत आदिवासी बांधव करीत आहेत. सुधागड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी, कातकरी बांधव असून, ते काही ठिकाणी …
Read More »पनवेल : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा नेते दशरथ म्हात्रे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे आदी उपस्थित होते, तर भाजपचे उत्तर …
Read More »एपीएमसीत कोविड लसीकरण केंद्र सुरू; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई : प्रतिनिधी एपीएमसी बाजार आवारातील 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या व्यापारी, माथाडी कामगार, गुमास्ता वर्ग, सफाई कर्मचार्यांच्या लसीकरणासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी वाशीतील एपीएमसी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ इमारतीत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ, वफा …
Read More »सिडकोच्या भोंगळ कारभारामुळे नामदेववाडीतील रहिवासी दहशतीखाली; 14 घरांना पाण्याचा वेढा
पनवेल ः वार्ताहर मुसळधार पावसामुळे पनवेलजवळील वडघर येथील नामदेववाडी येथे राहणार्या 14 घरांना पाण्याने वेढले आहे. धुवाँधार पावसामुळे येथील सर्व कुटुंबे भीतीच्या सावटाखाली येथे राहत असून सिडकोने केलेल्या भरावामुळेच आज आमची ही अवस्था झाल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी अनेक गावे विस्थापित करण्यात आली. त्यातील काही गावांना …
Read More »लसीकरणाबाबत आदिवासी समाजात संभ्रम; खालापुरात प्रशासन, सामाजिक संघटनांकडून जनजागृती
खोपोली : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीबाबत खालापूर तालुक्यातील आदिवासी समाजात विविध प्रकारचे गैरसमज असून, लस घेण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. कोरोनापासून बचावासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मास्क, सामाजिक अंतर आणि लॉकडाऊनचे पर्याय यांनीसुद्धा कोरोना आटोक्यात येत नसल्याने आरोग्य यंत्रणेवर …
Read More »तीन तिघाडा काम बिघाडा
मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकर्यांचा पीक विमा, वादळग्रस्तांना साह्य, कांजूरमार्गची प्रस्तावित मेट्रो कारशेड, अभिजात मराठी भाषा आणि माननीय राज्यपालांकडे प्रस्तावित असलेला 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न यांसारखे छोटेमोठे मुद्दे घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण या तिघांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पंतप्रधानांशी तब्बल पावणेदोन तास चर्चा केली. शिष्टमंडळाने पंतप्रधानांसमोर …
Read More »विनाकारण फिरणार्यांची अँटीजेन टेस्ट; सुधागडात आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात विनाकारण व विनामास्क फिरणार्यांची 63 जणांची सोमवारी (दि. 7) पाली, परळी व उन्हेरे फाट्यावर तालुका आरोग्य विभागाकडून अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये तब्बल सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मढवी यांनी दिली. पालीमध्ये झालेल्या कारवाईत नगरपंचायत शिपाई प्रवीण थळे, …
Read More »रायगडात उद्यापासून अतिवृष्टीचा इशारा; दरडग्रस्त गावांमधील लोकांचे होणार स्थलांतर
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात दोन दिवस (दि. 10 व 11) अतिवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे समुद्रकिनार्यावरील 62 गावे, खाडीकिनार्यावरील 128 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील 20 दरडग्रस्त गावांमधील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार आहे. मुबईसह उत्तर कोकणमध्ये 10 व 11 जून रोजी अतिवृष्टी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper