Breaking News

Ramprahar News Team

विनाकारण फिरणार्यांची कोरोना चाचणी; पॉझिटिव्ह येणार्यांची कोविड सेंटरमध्ये रवानगी, पनवेलमध्ये मनपा आणि पोलिसांची अनोखी कारवाई

पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने कडक निर्बंध जाहीर केले. यामुळे कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे, परंतु असे असले तरीही अजूनही काही नागरिक विनाकारण इतरत्र ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत. पनवेलमध्ये शनिवारी (दि. 15) अशा नागरिकांची अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येत …

Read More »

रोहा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोहा शहरात 7 मेपासून  कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र तो हटवल्यानंतर गुरुवारी (दि. 13) रोहा बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. रोहा तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कडक लॉकडाऊन  लावण्यात आला होता. मात्र …

Read More »

कर्जतमधील श्री धापया महाराजांची जत्रा यंदाही रद्द

कर्जत : प्रतिनिधी कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक वर्षांपासून होणारी जत्रा यंदाही कोरोनाच्या संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. या जत्रेच्या निमित्ताने होणारी  कुस्ती स्पर्धाही रद्द करण्यात आल्याने यंदा हा आखाडा कुस्ती विना राहणार आहे. ग्रामदैवत श्री धापया महाराजांची अक्षय्य तृतीयेला दोन दिवसांची जत्रा …

Read More »

घोड्यांचा चारा वाटपावरून माथेरानमधील दोन संघटनांत वाद

कर्जत : बातमीदार लॉकडाऊनमुळे गतवर्षीप्रमाणे यावर्षीही माथेरानचा   पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे येथील अश्वचालकांवर बिकट परिस्थिती ओढावली असून त्यांच्या  घोड्यांच्या चार्‍याचाही प्रश्न निर्माण झाला होता. मात्र प्राणीप्रेमी व अनेक दानशूर व्यक्तींनी घोड्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आणि माथेरानमध्ये अश्वखाद्याचा ओघ सुरु झाला. चार्‍याच्या या मुबलक मदतीमुळे येथील दोन संघटनांमध्ये …

Read More »

लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या; पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांची मागणी

पेण : प्रतिनिधी ऑनलाइन नाव नोंदणी करून रायगड जिल्ह्याबाहेरील नागरिक पेण उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लसीकरणासाठीच्या ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रियेत बदल करून स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी गुरुवारी (दि. 13) रायगड जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 45 …

Read More »

पालीत नऊ दिवसांचा जनता कर्फ्यू; फक्त मेडिकल दुकाने पूर्णवेळ राहणार उघडी

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाली शहरात शनिवार (दि.15) पासून नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी गुरुवारी (ता.13) दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 12) पाली तहसील कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.  या बैठकीत …

Read More »

अजुन थोडी कळ सोसा

लॉकडाऊनआधी महाराष्ट्रात रुग्णांची संख्या सात लाखांपर्यंत पोहचली होती. लॉकडाऊननंतर मात्र ती चार लाख 75 हजारांपर्यंत खाली आली. देशाचा रुग्णवाढीचा दर 1.4 इतका आहे, तर राज्यात तो 0.8 पर्यंत खाली आला आहे. याचा अर्थ लॉकडाऊनसदृश कठोर निर्बंधांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत, म्हणूनच राज्यातील कठोर निर्बंधांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. …

Read More »

जिल्ह्यातील पहिल्या रक्तविघटन प्रकल्पाचा आज महाडमध्ये शुभारंभ

महाड ः प्रतिनिधी येथील जनकल्याण रक्तपेढीच्या रक्तविघटन प्रकल्पाचा अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी 4 वाजता शुभारंभ होणार असल्याची माहिती रक्तपेढीचे अध्यक्ष धनंजय परांजपे आणि संचालक संजीव मेहता यांनी दिली. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प असून, पन्नास लाख लोकांना त्याचा फायदा होणार आहे. या रक्तविघटन …

Read More »

रा.स्व.संघ जनकल्याण समितीतर्फे परिचारिकांचा सन्मान

खोपोली : प्रतिनिधी जागतिक परिचारिका दिनानिमित्त जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 12) खोपोलीतील डॉ. डोंगरे, डॉ. वानखेडे, डॉ. ठाकूर यांच्या रुग्णालयात जाऊन तेथील परिचारिकांचा गुलाब पुष्प आणि कॅडबरी चॉकलेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. परिचारिका या रुग्णाची एखाद्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे सेवा करीत असतात. कोरोना सारख्या महामारीच्या काळातही …

Read More »

अलिबाग तालुक्यातील पाणीटंचाई मानवनिर्मीत

अलिबाग तालुका गेले काही वर्षे टँकरमुक्त आहे. कागदावर तरी तसं आहे. या तालुक्यात तीनविरा, कुसूंबळे, नारंगी, रेवस झोन 1, रेवस झोन 2, उमटे या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. यावरून सार्वजनिक व खाजगी जोडण्या दिल्या जातात. काही ग्रामपंचायतींच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजना आहेत.  एमआयडीसीकडून त्यांना पाणीपुरवठा केला जातो. असे असतानादेखील यंदा अलिबाग …

Read More »