Breaking News

Ramprahar News Team

सर्वसामान्य प्रवाशांसाठी आजपासून लोकल

मुंबई : प्रतिनिधी सर्वसामान्य प्रवाशांसाठी सोमवार (दि. 1)पासून अखेर पुन्हा एकदा लोकल धावणार आहे. अर्थात त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चपासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आवश्यक सेवा देणार्‍यांसाठी लोकलची दारे उघडी झाली. आता सामान्यांसाठी वेळेची मर्यादा घालून लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली …

Read More »

आशयपूर्ण एकांकिकांनी जिंकली प्रेक्षकांची मने! तुफान प्रतिसादाने स्पर्धा हाऊसफुल्ल

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या तिसर्‍या व अंतिम दिवशीही रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद …

Read More »

जंजिरा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात

मुरूड : प्रतिनिधी मुरूड शहरातील आझाद चौकात रविवारी (दि. 31) जंजिरा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रथेप्रमाणे ध्वजारोहण झाले. मुरूड, श्रीवर्धन व म्हसळा या तीन तालुक्यांवर नवाबाची राजवट होती. मुरूड येथील राजवाड्यातून ते कारभार चालवत. देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, तरीही जंजिरा संस्थान नवाबाच्या ताब्यात …

Read More »

‘त्या’ आरोपींना सशर्त जामीन

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पिस्तूल दाखवून वाहतुकीतून मार्ग काढणार्‍या आरोपींना रविवारी (दि. 31) खोपोली पोलिसांनी खालापूर न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने या आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला. एक्स्प्रेस वेवर गुरुवारी मध्यरात्री कारचालक आणि त्यातून प्रवास करणारे लोक पिस्तूल दाखवत ट्रॅफिकमधून रस्ता काढत पुढे जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल …

Read More »

कृषी कायद्यांबाबत पवारही भूमिका बदलतील : तोमर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांबाबत शरद पवारही आपली भूमिका बदलतील आणि आपल्या शेतकर्‍यांना या कायद्यांचे फायदे समजावून सांगतील, असा विश्वास केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी व्यक्त केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमधील तरतुदी आणि पवार कृषिमंत्री असताना कायद्यात सूचविलेले बदल यांची पवारांनी तुलनात्मक समीक्षा केली …

Read More »

तिरंग्याच्या अपमानाने देश दु:खी; दिल्लीतील हिंसाचारावर पंतप्रधान मोदींची नाराजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅलीत उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 31) आपल्या मन की बात कार्यक्रमात भाष्य केले. दिल्लीत 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगी ध्वजाचा झालेला अपमान पाहून देश खूप दुःखी झाला, असे …

Read More »

आज सादर होणार डिजिटल केंद्रीय अर्थसंकल्प; देशवासीयांचे लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नव्या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सोमवारी (दि. 1) अर्थसंकल्प सादर करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021-22च्या बजेटकडे सगळ्यांचे लक्ष आहे. याचबरोबर रेल्वे बजेटही सभागृहात मांडले जाईल. यंदाचा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांपेक्षा वेगळा ठरणार आहे. याआधी अर्थमंत्री ब्रिफकेसमधून अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन जात. यंदा पेपरलेस बजेट सादर केले जाणार …

Read More »

पनवेल : शेलघर ग्रामस्थ मंडळ व महेश स्पोर्ट्स यांच्या वतीने जावळे येथील मैदानात आयोजित सरपंच चषक 2021 स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे कौतुक केले. या वेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य विजय …

Read More »

टोकियो ऑलिम्पिक होणारच जपानच्या पंतप्रधानांचा दावा

टोकियो : वृत्तसंस्था जपानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत अनिश्चितता वाढू लागली आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिक होणारच, असा दावा जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी केला आहे. जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीत दूरचित्रसंवादाद्वारे ते बोलत होते. ‘भविष्यातील विषाणू संसर्गाची तयारी करण्यासाठी आम्हाला धडा मिळाला आहे. गेल्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा …

Read More »

इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी ठरू शकतात धोकादायक!

चेन्नई : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीमध्ये 2-1ने कसोटी मालिकेत हरविणार्‍या टीम इंडियापुढे आता इंग्लंडचे आव्हान आहे. इंग्लंडचे पाच खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. 2020मध्ये कोरोनामुळे फार क्रिकेट खेळले गेले नाही, पण इंग्लंडच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी …

Read More »