Breaking News

Ramprahar News Team

बनावट एटीएम कार्डद्वारे 54 हजार लांबविले

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील पालखार येथील फिर्यादीच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून बनावट एटीएम कार्डचा वापर करून चोरट्याने 54 हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. पालखार येथील फिर्यादीचे बँक ऑफ इंडियाच्या गडब शाखेत बचत खाते असून  या खात्याचे फिर्यादीकडे एटीएम डेबिटकार्ड आहे. या खात्यामध्ये 53 हजार 515 रूपये रक्कम शिल्लक होते. …

Read More »

माणगावात वाहतूक पोलिसाला मारहाण : 18 आरोपींना अटक

माणगाव : प्रतिनिधी वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकाणी कारवाई केल्याचा राग मनात धरून रिक्षा चालक संतोष शिर्के, विकास मोरे, राजेंद्र मोरे यांच्यासह सुमारे 60 ते 70जणांनी वाहतूक पोलीस निवास साबळे यांना सोमवारी (दि. 4) सायंकाळी 5.30. वाजण्याच्या सुमारास शिवीगाळ व मारहाण केली. माणगाव निजामपुर रोडवरील अमित कॉम्प्लेक्सजवळ झालेल्या या घटनेत वाहतूक पोलीस …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट; कर्जत तालुक्यात 89 जागांसाठी 164 उमेदवार रिंगणात; हुमगाव ग्रामपंचायत बिनविरोध

कर्जत : प्रतिनिधी/बातमीदार तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक 15जानेवारीरोजी होत आहे. नऊ ग्रामपंचायतीमधील सदस्यपदाच्या 89जागांसाठी 164उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर पाच ग्रामपंचायतीलमधील 17 जागा बिनविरोध झाल्या असून त्यांची अधिकृत घोषणा 18 जानेवारी रोजी होणार आहे. निवडणूका होत असेलेल्या कर्जत तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींमधील सदस्य पदाच्या एकूण 89 जागांसाठी सुरुवातीला 297 नामांकन …

Read More »

कोरोना काळात पत्रकारांचेही कार्यही महत्त्वपूर्ण -प्रवीण दरेकर

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राला पत्रकारांचा एक वेगळा वारसा लाभलेला आहे. आणीबाणीच्या काळात पत्रकारांनी घेतलेल्या भूमिका महत्त्वपूर्ण होत्या. या पत्रकारांचा वारसा वेगवेगळ्या माध्यमातून आजही जीवंत आहे. पनवेल मिडिया प्रेस क्लबने पत्रकार दिनानिमित्त साधून कोरोनाच्या संकटात समाजाला साथ देणार्‍या समाजसेवकांचा सत्कार केला. कर्तृत्ववानांचा सत्कार करणे ही आपली संस्कृती आहे आणि ही …

Read More »

सत्ता पणाला लावायची की नाही हे शिवसेनेने ठरवावे : चंद्रकांत पाटील; नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपचा शिवसेनला सवाल

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर पुन्हा एकदा जोर देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर पहिल्याच सभेत नामांतराचा ठराव मंजूर करू, असा दावा करीत सत्ता पणाला लावायची की नाही हे शिवसेनेने ठरवावे, असे पाटील यांनी म्हटले आहे. …

Read More »

विचुंबे येथील इंजिनियर ज्युसवाला; आर्थिक गरज भागविण्यासाठी मोहिते बंधूंचा व्यवसाय

पनवेल : वार्ताहर मुंबईतील सायन कोळीवाडा या ठिकाणी मूळ वास्तव्यास असलेले ललित ज्ञानेश्वर मोहिते आणि रोहित ज्ञानेश्वर मोहिते काही वर्षांपूर्वी विचुंबे येथे राहण्यास आले. दरम्यानच्या काळात इंजिनियरींगचे शिक्षण घेवून दोन वर्षे नोकरी न मिळाल्यामुळे व लॉकडाऊनच्या काळात या दोन भावंडांनी स्वतःचा ज्युसचा व्यवसाय सुरू केला आहे. विचुंबे गावात सुरू केलेल्या …

Read More »

करंजाडे येथे शिवसाहीज हॉस्पिटलचे उद्घाटन

पनवेल : वार्ताहर करंजाडे येथील नवीन बांधण्यात आलेल्या शिवसाहीज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. बाळासाहेब पाटील म्हणाले की, करंजाडेमधील नागरिकांना शिवसाहीज मल्टीस्पेशालिटीच्या मार्फत चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच डॉ. वेलहारे यांनी लहान वयात त्यांनी खूप …

Read More »

पत्रकार दिनानिमित्त परिसंवाद

नवी मुंबई : विमाका दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त  नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने बुधवारी (दि. 6) पत्रकारदिनी  परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5.30 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, सेक्टर-16 …

Read More »

बामणडोंगरीतील पाणी टाक्यांच्या नुकसानप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

पनवेल : रामप्रहर वृत्त बामणडोंगरी गावातील वाघ धोंड आळी येथे गावातील पाण्याच्या पाच हजार लीटरच्या दोन प्लास्टिक सिंटेक्सच्या टाक्यांचे रविवारी मध्यरात्री अज्ञाताने फोडल्या आहेत. नुकसान करणार्‍या अज्ञातव्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील बामणडोंगरी गावामध्ये वाघ धोंड अळी 50 ते 60 लोकवस्ती आहे. या भागातील लोकांना बरेच …

Read More »

राज्य सरकारच्या निर्णयाने मच्छीमारांना फटका; मत्स्यव्यवसाय विभागाने मंजूर केलेल्या कमी डिझेलमुळे आर्थिक झळ

उरण : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक मच्छीमाराला मासेमारी करण्यासाठी देण्यात येणारा 15 दिवसांसाठीचा डिझेल कोटा सुमारे चार हजारांऐवजी फक्त 1750 लीटर देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत. या मंजूर करण्यात आलेल्या कमी डिझेलमुळे मच्छीमारांना मासेमारी व्यवसाय करणे अवघड होऊन बसणार आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या या मनमानी निर्णयामुळे राज्यातील लाखो मच्छिमारांमध्ये …

Read More »