Breaking News

Ramprahar News Team

सीमेवरील जवानांसाठी पौष्टिक लाडू; ‘भाविप’ची अनोखी दिवाळी

पनवेल ः वार्ताहर लेह, लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथे सीमेवरील सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्याचा उपक्रम भारत विकास परिषद संस्थेच्या पनवेल शाखेच्या वतीने या वर्षी प्रथमच राबविण्यात आला. एकूण 14 हजार पौष्टिक लाडू वेगवेगळ्या सीमेवर पाठविण्यात आले. भारतीय सैनिकांना दिवाळी फराळ पाठवावा ही प्रेरणा मुळात गेली काही वर्षे …

Read More »

फटाके विक्रीस तूर्त मोकळीक; नवी मुंबईतील गर्दीवर मात्र दक्षता पथकांची नजर

नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यास मज्जाव केला असला तरी नवी मुंबईत अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही, मात्र बंदी नसली तरी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास …

Read More »

पनवेल : भाजप युवा कार्यकर्ते निलेश अरुणशेठ भगत यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर जगदिश गायकवाड, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

शैक्षणिक फी कमी करा; रोह्यातील राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांचे निवेदन

रोहे : प्रतिनिधी विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाची शालेय फी निम्मी घ्यावी, अशी मागणी करीत सोमवारी (दि. 9) सकाळी येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांनी निवेदन दिले. स्कूलच्यावतीने हे निवेदन गणेश पवार यांनी  स्वीकारले. सरकारचे 2020 व 2021 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय फीबद्दल अद्याप कोणतेही स्पष्ट धोरण नसताना रोहे …

Read More »

पालीमध्ये पाणीटंचाई; पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा

पाली : प्रतिनिधी कोलाड पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाली (ता. सुधागड) मधील ग्रामस्थांना गेल्या तीन दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अंबा नदीवर बलाप गावाजवळील उभारलेल्या केटी बंधार्‍यातून पाली शहराला पाणी पुरवठा केला जातो. केटी बंधार्‍याचे दरवाजे किंवा फळ्या बंद करुन अंबा नदीचे पाणी अडविले …

Read More »

नागोठणे-रोहे रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांमुळे एसटी बसेसचा मार्ग बदलावा लागला

नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे – रोहे मार्गातील आंबेघर फाटा ते आमडोशी फाटा दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून चालणार्‍या एसटी बसेससाठी हा रस्ता बंद करून त्या वाकण- आमडोशी मार्गावरून चालवण्याची परिस्थिती एसटी महामंडळावर ओढवली आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. नागोठणे-रोहे …

Read More »

रायगडात 66 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून, रविवारी (दि. 8) नव्या 66 कोरोना रुग्णांची आणि एक जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 116 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 31 व ग्रामीण 16) तालुक्यातील 47, अलिबाग पाच, खालापूर व कर्जत प्रत्येकी तीन, …

Read More »

‘कार्तिकी’साठी वारकरी आक्रमक; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

पंढरपूर : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे गेल्या 17 मार्चपासून कुलुपात बंद असलेल्या विठूरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडावीत आणि कमीत कमी निर्बंध घालून यंदा कार्तिकी यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी रविवारी (दि. 8) वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला पंढरपूर शहरात संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकर्‍यांना कोरोनाचे नियम …

Read More »

अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्षांना पंतप्रधान मोदींकडून खास शुभेच्छा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि भारतीय वशांच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करून खास शुभेच्छा दिल्या आहेत. जो बायडन यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले की, भव्य …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते चिंध्रण ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील चिंध्रण ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. या कार्यालयामुळे चिंध्रण ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना आता अधिक चांगल्या पद्धतीने सेवा उपलब्ध होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यास पंचायत समिती सभापती देवकीबाई कातकरी, सहाय्यक गटविकास अधिकारी लता …

Read More »