Breaking News

Ramprahar News Team

पक्षविरोधी कार्यवाहीबद्दल गणेश वाघिलकर सहा वर्षांसाठी निलंबित

पनवेल : पक्षविरोधी कार्यवाही केल्याबद्दल तक्का येथील गणेश वाघिलकर यांचे भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. या संदर्भात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी वाघिलकर यांना निलंबन पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आपण आपल्या गावातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरोधात अपप्रचार व त्यांची खोटी बदनामी …

Read More »

तक्का परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करा -नगरसेवक अजय बहिरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त   पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गाव परिसरातील विजेच्या समस्यांचे निवारण करून येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी नगरसेवक अजय बहिरा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ बहिरा सोबत होते. नगरसेवक अजय बहिरा यांनी निवेदनात म्हटले की, प्रभाग क्रमांक …

Read More »

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर माजी उपमहापौर व भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सव 2020चे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत व वोकल फॉर लोकल या संकल्पनेतून आत्मनिर्भर प्रभाग 18 दिवाळी महोत्सव 2020चे आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले होते. प्रभागातील …

Read More »

पक्षी सप्ताहानिमित्त ‘सीकेटी’मध्ये कार्यशाळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त दरवर्षी 5 नोव्हेंबर हा पक्षितज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि 12 नोव्हेंबर हा डॉ. सलीम अली यांचा जन्मदिवस असल्याने हा सप्ताह महसूल आणि वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत पक्षी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पक्षी सप्ताहानिमित्त सीकेटी विद्यालय इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागाने विद्यार्थ्यांसाठी पोस्टर मेकिंग …

Read More »

राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांची पिळवणूक थांबवावी!; अन्यथा जनआंदोलनाचा भाजपचा इशारा

मुरूड ः प्रतिनिधी एसटी महामंडळातील चालक-वाहक, तांत्रिक विभाग, लिपिक आदी सर्व घटकाला मागील तीन महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे सर्व कर्मचारी वृंदांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. खोलीचे भाडे व जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत. सर्वांत कमी पगार एसटीमधील कर्मचार्‍यांना दिला जातो. त्यातच तीन महिने पगार नसल्याने कुटुंबाची …

Read More »

सीमेवरील जवानांसाठी पौष्टिक लाडू; ‘भाविप’ची अनोखी दिवाळी

पनवेल ः वार्ताहर लेह, लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथे सीमेवरील सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्याचा उपक्रम भारत विकास परिषद संस्थेच्या पनवेल शाखेच्या वतीने या वर्षी प्रथमच राबविण्यात आला. एकूण 14 हजार पौष्टिक लाडू वेगवेगळ्या सीमेवर पाठविण्यात आले. भारतीय सैनिकांना दिवाळी फराळ पाठवावा ही प्रेरणा मुळात गेली काही वर्षे …

Read More »

फटाके विक्रीस तूर्त मोकळीक; नवी मुंबईतील गर्दीवर मात्र दक्षता पथकांची नजर

नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने फटाके फोडण्यास मज्जाव केला असला तरी नवी मुंबईत अद्याप अशा प्रकारचा कोणताही निर्णय झाला नाही, मात्र बंदी नसली तरी प्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा आजार श्वसनाशी संबंधित असल्यामुळे अशा रुग्णांना फटाक्यांच्या प्रदूषणाचा त्रास …

Read More »

पनवेल : भाजप युवा कार्यकर्ते निलेश अरुणशेठ भगत यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपमहापौर जगदिश गायकवाड, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

शैक्षणिक फी कमी करा; रोह्यातील राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांचे निवेदन

रोहे : प्रतिनिधी विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाची शालेय फी निम्मी घ्यावी, अशी मागणी करीत सोमवारी (दि. 9) सकाळी येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांनी निवेदन दिले. स्कूलच्यावतीने हे निवेदन गणेश पवार यांनी  स्वीकारले. सरकारचे 2020 व 2021 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय फीबद्दल अद्याप कोणतेही स्पष्ट धोरण नसताना रोहे …

Read More »

पालीमध्ये पाणीटंचाई; पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा

पाली : प्रतिनिधी कोलाड पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाली (ता. सुधागड) मधील ग्रामस्थांना गेल्या तीन दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अंबा नदीवर बलाप गावाजवळील उभारलेल्या केटी बंधार्‍यातून पाली शहराला पाणी पुरवठा केला जातो. केटी बंधार्‍याचे दरवाजे किंवा फळ्या बंद करुन अंबा नदीचे पाणी अडविले …

Read More »