अलिबाग : प्रतिनिधी वसुबारस… दिवाळीचा पहिला दिवस … या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते. अलिबागजवळच्या खानाव इथल्या सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत गुरुवारी (दि. 12) गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. यानिमित्ताने संस्थेचे देणगीदार राजेश प्रधान यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात गणेशपूजन, होमहवन करण्यात आले. गोशाळेतील दोन गर्भवती गायींचा …
Read More »झुगरेवाडी शाळेची दिवाळी झाली गोड; रोटरी क्लबकडून विद्यार्थ्यांना फराळाचे साहित्य वाटप
कर्जत : बातमीदार तालुक्याच्या दुर्गम भागातील झुगरेवाडीमधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लबकडून शैक्षणिक साहित्य आणि दिवाळी भेट म्हणून खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टनसींगच्या नियमांचे पालन करण्यात आले. झुगरेवाडी परिसरात कार्यरत असणार्या आणि प्राथमिक शाळा दत्तक घेतलेल्या रोटरी क्लब ऑफ मुंबई वरळी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन मुख्याध्यापक रवी …
Read More »काथ्यापासून इंकोफ्रेडली आकाश कंदील
रेवदंडा ़़: प्रतिनिधी ऐन दिवाळीनिमित्त बाजारात विविध आकाराचे रंगीबेरंगी आकर्षक आकाश कंदिल विक्रीस आले आहेत. चौलच्या राकेश काठे यांनी काथ्यापासून इंकोफ्रेडली आकाश कंदिल बनविले असून त्यांनी ग्राहक राजाला आकर्षीत केले आहे. चौलच्या भाटगल्लीत राहणार्या राकेश काठे यांनी काथ्याच्या दोरीचे नक्षीदार विणकाम करुन पर्यावरण पुरक, टिकाऊ व आकर्षक असे आकाश कंदिल …
Read More »आई डे केअर च्या विद्यार्थ्यांनी बनविल्या हजारो पणत्या
पेण : प्रतिनिधी पेणमधील आई डे केअर संस्थेच्या 40 विशेष गतिमंद मुलांनी व्यावसायिक मार्गदर्शन घेऊन लॉकडाऊनच्या काळात घरच्याघरी यावर्षी 15 हजार विविध प्रकारच्या पणत्या बनविल्या आहेत. त्यातून संस्थेला आर्थिक हातभार तर लागलाच शिवाय काही मुलांनी चांगल्या प्रकारे मानधन मिळविले. आई डे केअर संस्थेत 40 ते 42 विद्यार्थी असून त्यांची गणपती, …
Read More »मुरुड आगाराची दुरावस्था दूर करा, अन्यथा आंदोलन; समाजसेवक अरविंद गायकर यांचा इशारा; सुविधांची वानवा
मुरुड : प्रतिनिधी एसटीचे मुरूड आगार गेल्या काही महिन्यांपासून गैरसोयींचे आगार झाले आहे. त्यातच निसर्ग चक्रिवादळाने या आगाराची पार दैना उडवली आहे. येथील गैरसोयी दूर करून आगाराची दुरुस्ती करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा येथील समाजसेवक अरविंद गायकर यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रकांना निवेदनाद्वारे दिला आहे. मुरुड हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध …
Read More »मोदी है तो मुमकिन है
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी दिवाळी दोन दिवस अगोदरच सुरू झाली. बिहारमधील प्रचंड दिग्विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे भरते आले असून पंतप्रधान मोदी यांच्यावर बिहारच्या जनतेने दाखवलेला विश्वास हे त्याचे कारण आहे. याखेरीज अन्य राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्येही 59 पैकी 41 जागा भाजपनेच जिंकल्या असून त्याचेही श्रेय मोदीजींनाच जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार …
Read More »उरणमध्ये दिवाळीनिमित्त विविध स्पर्धा
उरण : वार्ताहर उरण शहरातील बोरी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने दिवाळी निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाचे नंदन पानसरे, सुरेश साळुंखे यांनी दिली. स्पर्धा बोरी गावं मर्यादित असेल. स्पर्धेचे दिनांक रविवारी (दि.15) सायंकाळी 4 वाजता असेल. या स्पर्धांमध्ये किल्ला बनविण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांनी रायगड किल्याची प्रतिकृती तयार …
Read More »आंतरराष्ट्रीय वेबिनार उत्साहात
पनवेल : वार्ताहर भारती विद्यापीठ व्यवस्थापन आणि संशोधन महाविद्यालयाच्या मानव संसाधन क्लब आणि एबीएलई, नवी मुंबई ह्यांनी संयुक्तरित्या कोविड आणि कोविड नंतरच्या मानव संसाधन रणनीती ह्या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले. आयोजित वेबिनारची सुरुवात राष्ट्रगीतापासून करण्यात आली. ह्या वेबिनारसाठी रिलैअन्स डिजिटल ह्या कंपनीचे ज्येष्ठ उपाअध्यक्ष अॅण्ड मानव संसाधन प्रमुख …
Read More »कर्नाळा अभयारण्यात पक्षी संमेलन रंगले
पनवेल ः वार्ताहर राज्यात 5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान प्रथमच पक्षी सप्ताह आयोजित केला जात आहे. त्यानिमित्ताने सोमवारी (दि. 9) पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यातही पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले होते. पक्षी संमेलनास वनविभाग अलिबाग, सामाजिक वनीकरण पनवेल, …
Read More »भिंगारी येथील पाइपलाइनचे काम सुरू; भाजपला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीमधील भिंगारी कांदेवाडी परिसरामधील पाण्याची पाइपलाइन काही ठिकाणी फुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. या संदर्भात भाजप नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, या पाइपलाइनचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांची पाणीटंचाईच्या समस्येतून लवकरच सुटका होणार आहे. माजी उपमहापौर व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper