Breaking News

Ramprahar News Team

शेतकर्‍यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी; भाजप किसान मोर्चाची मागणी

कर्जत ः बातमीदार परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतीची 100 टक्के नासाडी झाली असून या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी (दि. 15) भाजप किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अवकाळी आणि वादळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील सर्व …

Read More »

देवदूतांच्या कार्यामुळे सर्वसामान्यांना आधार; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान

मुंबई ः हरेश साठे कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी देवदूताप्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करू तेवढी कमीच असून कोरोनाच्या कष्टकाळात देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार मिळाला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (दि. 14) राजभवन येथे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना राज्यपालांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान

मुंबई : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान करून बुधवारी सन्मानित करण्यात आले. या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसेच आयोजक …

Read More »

राज्यात पावसाचा कहर; पंढरपूरमध्ये भिंत कोसळून सहा जण मृत्युमुखी

मुंबई, पंढरपूर : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, या वेळी ग्रामीण भागासह शहरांनाही याचा मोठा फटका बसला आहे. अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पंढरपूर शहरात चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत बुधवारी (दि. 15) दुपारी दीडच्या सुमारास …

Read More »

पनवेल महापालिकेच्या 945 कोटींच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीची मंजुरी

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या सन 2020-21च्या 945 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंगळवारी (दि. 13) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका उद्याने विकास, वैद्यकीय सेवा व झोपडपट्टीत नागरी सुविधा देणे आणि नवीन गटारे  बांधकाम व दुरूस्तीसाठी सन 2020-21च्या अर्थसंकल्पात तरतूद केल्याने पनवेल शहर स्वच्छ होण्यास मदत होऊन …

Read More »

सांगडेत पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन, आरिवली येथे रस्त्याचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील सांगडे येथे पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आणि आरिवली येथे डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 14) करण्यात आले. सांगडे येथे रायगड जिल्हा परिषद राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत जलकुंभ नळ योजनेतून पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्याचा …

Read More »

‘मेट्रो कारशेड कांजूरला नेल्याने सरकारी तिजोरीवर ताण येणार’

मुंबई : प्रतिनिधी मेट्रोचे कारशेड आरेमधून कांजूरला हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे हा प्रकल्प तर लांबणारच शिवाय सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, कारशेड कांजूरमार्ग येथे स्थानांतरित करून मेट्रो-3चे प्रश्न सुटणार …

Read More »

रायगड जिल्ह्यात 212 नवे पॉझिटिव्ह; पाच रुग्णांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, मंगळवारी (दि. 13) नव्या 212 कोरोना रुग्णांची आणि पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 316 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 126 व ग्रामीण 29) तालुक्यातील 155, अलिबाग 19, उरण व कर्जत प्रत्येकी …

Read More »

स्व. विखे-पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; पंतप्रधानांकडून कार्याचे कौतुक

अहमदनगर : प्रतिनिधी दिवंगत माजी केंद्रीय मंत्री व राज्यातील मात्तबर नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन मंगळवारी (दि. 13) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने झाले. विखे-पाटील यांच्या कार्याचे या वेळी पंतप्रधानांनी कौतुक केले. प्रवरानगर येथील डॉ. धनंजय गाडगीळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय …

Read More »

नवरात्रोत्सवासाठी बाजारपेठा सजल्या; साहित्याची खरेदी

पनवेल ः वार्ताहर गणेशोत्सवानंतर भाविकांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले असून, येत्या शनिवारी (दि. 17) देवीची घटस्थापना होणार असल्याने देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू आहे, तर दुसरीकडे देवीला लागणार्‍या पूजा साहित्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. नवरात्रोत्सवामध्ये सार्वजनिक आणि घरगुती देवींची प्रतिष्ठापना करण्यात येते. या उत्सवांत देवीची नऊ दिवस पूजा …

Read More »