Breaking News

Ramprahar News Team

उपजिल्हा रुग्णालयात होणार कोविडची चाचणी; रुग्णांना दिलासा

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून रॅपिड अँटीजन किटची सुविधा उपलब्ध झाल्याने आता या ठिकाणी कोविड विषाणूची चाचणी होऊन रुग्णाचा अर्ध्या तासात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली.  रायगडात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून माणगाव तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्ण …

Read More »

खोपोली ः भारतीय जनता पार्टी खोपोली महिला आघाडीतर्फे खोपोली पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम तसेच कोरोना योद्धा (डॉक्टर, सफाई कामगार, केमिस्ट, सामाजिक संस्था) यांना प्रशस्तिपत्र देण्याचा कार्यक्रम सोमवारी (दि. 3) झाला. या वेळी उत्तर रायगड जिल्हा भाजप महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पाटील, खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर …

Read More »

बेशिस्त वाहनचालकांना दणका; सात महिन्यांत कोट्यवधींचा दंड वसूल; लाखो जणांवर कारवाई

अलिबाग ः प्रतिनिधी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत एक लाख 15 हजार 601 वाहनचालकांवर कारवाई करीत दोन कोटी 89 लाख 99 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये लायसन्स नसलेल्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात …

Read More »

बकरी ईदनिमित्त रक्तदान

पाली ः प्रतिनिधी समाजात काही थोडे लोक आपल्या विचारांना कृतीची जोड देतात आणि कृतीतून प्रबोधन घडवितात. नासिर वल्लाद हे इंजिनिअर त्यातीलच एक असून तब्बल 19 वर्षांपासून बकरी ईदनिमित्त ते रक्तदान करीत आहेत. यंदाही बकरी ईदच्या दिवशी त्यांनी रक्तदान केले. त्यांच्या या मानवतावादी सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नासिर यांच्या …

Read More »

मोटरसायकलची कारला धडक; तीन जण जखमी

पेण ः प्रतिनिधी वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशी गावाजवळ मोटरसायकल व कारची धडक होऊन या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि. 2) सायंकाळी 6.45 वाजेच्या सुमारास मोटरसायकलस्वार आपल्या मागे एका इसमास बसवून वाशी फाट्याकडून वाशी गावाकडे जात असताना हा अपघात घडला.  या वेळी मौजे वाशी गावच्या हद्दीत वाशी …

Read More »

अंधत्वावर मात करून मिळविले 83 टक्के गुण

पनवेल : बातमीदार नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर विद्यालयात दहावीत शिकणार्‍या एका अंध विद्यार्थिनीने अंधत्वावर मात करत दहावीच्या परीक्षेत 83. 40 टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशाबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे. पनवेल तालुक्यातील कोप्रोली येथील अरिहंत सोसायटीत राहणारी कस्तुरी नेताजी भोसले ही जन्मताच अंध आहे. …

Read More »

दहावीच्या परीक्षेत विद्यालयांचे सुयश

पी. पी. खारपाटील विद्यालय : 86.13 टक्के चिरनेर : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीच्या निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला असून चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सेासायटीच्या परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक विदयालयातील इयत्ता दहावी शालांत परिक्षेचा शेकडा निकाल 86.13 टक्के इतका लागला असून, शाळेत अनुक्रमे मुलींनीच बाजी मारली …

Read More »

बेलवली (ता. पनवेल) : येथील टीना दत्तात्रेय ढवळे ही विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत 84.60 टक्के गुण मिळवून दिव्यांग गटातून पनवेल तालुक्यात प्रथम आली आहे. याबद्दल तिचे माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी अभिनंदन केले. सोबत मा. सरपंच भरत पाटील, भाजप गाव कमिटी अध्यक्ष सतिश पाटील, गोपाळ पाटील, रामदास ढोपर, संतोष …

Read More »

श्रीजी सुपर मार्केट कळंबोलीकरांच्या सेवेत

कळंबोली : प्रतिनिधी दैनंदिन जीवनातील घरामध्ये वापराच्या व अत्यंत आवश्यक वस्तूचे भांडार (सुपर मार्केट) नव्याने श्रीजी सुपर मार्केट या नावाने कळंबोलीकर व परिसरातील जनतेची कोरोनाच्या बिकट परिस्थिती जनतेला दिलासा देण्यासाठी 5 ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे. यात सर्व वस्तूवर (ऑल फोम प्रोडक्ट) समाधानकारक सुट देण्यात येणार आहे. रोडपाली-कळंबोली गिरीराज इन्कलेस …

Read More »

वंजारी सेवा संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी बबन बारगजे

पनवेल : रामप्रहर वृत्त संभाजीनगर येथे वंजारी सेवा संघाची कार्यकारिणी शनिवारी (दि. 1) घोषित करण्यात आली. वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष माननीय अनिल फड यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बबन बारगजे यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. आज प्रदेश अध्यक्ष अनिल फड, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. खुशाल मुंढे …

Read More »