महाराष्ट्रात तसेच पंजाबसारख्या अन्य काही राज्यांत राज्य सरकारी यंत्रणेच्या धीम्या कारभारामुळे मजूर सैरभैर होऊ लागले आहेत. कुठे नावे नोंदवायची, प्रवासाची सोय कधीपर्यंत होईल या सार्याबद्दलच गोंधळ असल्याने स्थलांतरित मजूर पायीच गावाकडचा रस्ता धरत आहेत असे चित्र सर्रास दिसते आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून एकूण केसेसचा आकडा बुधवारी 50 हजाराच्या …
Read More »बिहार राज्यातील मजुरांना उरणमधून निरोप उरण : बिहार राज्यातून आलेल्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म व त्यांची वैद्यकीय तपासणीचे काम येथील वैद्यकीय अधिकार्यांच्या मदतीने मंगळवारी पोलिसांनी तत्परतेने केले असून, एकूण 300 मजुरांना पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी एनएमएमटी बसेसमध्ये बसवून निरोप देऊन शुभेच्छा …
Read More »सिडको वसाहतीत मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर; कळंबोलीत रस्ते दुरुस्ती, नाले, गटार सफाई
कळंबोली : प्रतिनिधी सिडकोने विकसित केलेल्या शहरात मान्सूनपूर्व कामांना युद्ध पातळीवर सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. कळंबोली शहरातील रस्ते चकाचक करण्यात आले असून नाले व गटार सफाईच्या कामांना गती देण्यात आली आहे. सिडकोचे अधिक्षक अभियंता सिताराम रोकडे हे राज्यात कोरोनाची महामारी असताना पावसाळ्यात पनवेलमधील जनतेला कोणत्याही …
Read More »रायगड पोलिसांकडून कोरोना योद्धा बनण्याची संधी
खोपोली : बातमीदार कोरोना विषाणू लढाईत आता सर्वसामान्य नागरिकाला देखील कोरोना योद्धा बनण्याची संधी रायगड पोलीस दलातर्फे देण्यात आली असून त्यासाठी पात्रता निकषात बसल्यास कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावता येणार आहे. लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात रायगड ऑरेंज झोनमध्ये असला तरी पोलीस दल मात्र कोणत्याही प्रकारची बेफिकिरी बाळगण्याच्या मनस्थितीत नाही. पहिल्या दोन …
Read More »रस्त्यांवरील गर्दीने महाडकर धास्तावले; कलम 144चा फज्जा; सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर
महाड : प्रतिनिधी गेली दिड महिनाभरापासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू केली आहे. टप्प्यावर याचा कालावधी वाढत असला तरी गेल्या काही दिवसांपासून महाडमध्ये कलम 144 लागू आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांवर वाढती गर्दीपाहून महाड शहरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. प्रशासन मात्र ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिक …
Read More »स्व. जनार्दन भगत : सच्चा समाजसेवक
स्व. जनार्दन आत्माराम भगतसाहेब म्हणजे माझे आबा. त्यांच्या 32व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहे. माझे आबा म्हणजे सुसंस्कारांचा खजिना, मायेचा जिवंत झरा, दीन-दुबळ्यांचे आधारस्तंभ, गोरगरिबांचे कनवाळू. जेव्हा माझे आबा काळाच्या पडद्याआड गेले तेव्हापासून वियोगाची स्पंदने आजही आठवतात. आज त्यांनी मोठी संपती जरी मागे ठेवली नसली तरी …
Read More »खारघर : दिव्यांग असलेले सय्यद अब्दुल सुभान हे लॉकडाऊन काळात त्यांचा सलून व्यवसाय बंद असतानादेखील आपल्याकडे असलेल्या शिवणकलेचा सदुपयोग करीत स्वखर्चाने स्वतः शिवलेले मास्क शहरातील गोरगरिबांना निःशुल्क वाटप करीत आहेत. तसेच पोलीस बांधवांना पाण्याचे वाटप करीत आहेत. सय्यदभाई नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेतात, असे नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सांगितले.
Read More »गोरगरिबांना अन्नधान्य वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन जारी केले आहे. या काळात सर्व व्यवहार ठप्प असल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, गोरगरिबांना हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळे हातात पैसे नाही. त्यामुळे आय फ्लेक्स टेक्नॉलॉजीसचे डायरेक्टर रणजित मच्छिंद्र नरुटे यांच्या माध्यमातून पनवेल या ठिकाणी गोरगरीबांना अन्न धान्य वाटप केले. …
Read More »रानसई हद्दीतील वाड्यांची पाण्याच्या समस्येतून मुक्तता करा; आदिवासी बांधवांकडून मागणी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील रानसई धरणाच्या आजूबाजूला असणार्या रानसई या ग्रामपंचायत हद्दीतील सहा वाड्यांच्या एक हजार आदिवासी बांधवाना वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने त्याची कायमची पाणी टंचाईच्या समस्येतून मुक्तता करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे. रानसई ग्रामपंचायत हद्दीतमध्ये सहा आदिवासी वाड्या आहेत. त्या पैकी …
Read More »एमजीएम रुग्णालयाला एक हात मदतीचा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळातर्फे रक्तदान
कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णामुळे रक्ताची कमतरता भासत असल्याने त्यांना तातडीने रक्त पुरवठा करता यावा म्हणून उपजिल्हा रुग्णालय पनवेल व एमजीएम कामोठे रुग्णालयानी रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळानी पुढे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper