मुंबई : प्रतिनिधी मुंबईत सिग्नल लागल्यानंतर 60 सेकंद थांबण्याचे संयम मुंबईकरांमध्ये नसतं. सिग्नल 10 सेकंदापर्यंत आला की, लगेच हॉर्न वाजवून सुटण्याची घाई मुंबईकरांना असते. आता यावर मुंबई वाहतूक पोलिसांनी एक भन्नाट आयडिया काढली आहे. यामुळे सिग्नलवर विनाकारण हॉर्न वाजवणे थांबेल, अशी अपेक्षा मुंबई पोलिसांना आहे. मुंबई पोलिसांनी सिग्नल परिसरात आवाज …
Read More »पनवेल : जांभिवली ग्रामपंचायतीचे सदस्य शेखर जाधव यांनी त्यांच्या स्वखर्चातून जांभिवलीच्या आंगणवाडीतील मुलांना मंगळवारी दप्तरवाटप केले. या वेळी सरपंच रिया रविंद्र कोंडीलकर यांच्यासह शिक्षिका उपस्थित होत्या.
Read More »जेएनपीटी ते नवघरफाटा पाण्याची पाईपलाईन फुटली, उरणचा पाणीपुरवठा दोनतास बंद
उरण : प्रतिनिधी उरण-पनवेल रोडवरील जेएनपीटी वसाहत ते नवघरफाटा दरम्यान गुरुवारी (दि. 30) सकाळी एमआयडीसीची पाण्याची 24 इंचाची पाईपलाइन फुटून लाखो लिटर्स पाणी वाहून गेले. दोन तास दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे उरणकरांना पाण्यासाठी दुरुस्ती होईपर्यंत वाट पाहावी लागली. थंडीमुळे वेल्डींगला तडा गेल्याने पाईपलाईन फुटली असल्याची माहिती …
Read More »सिडकोकडून एमएमआरडीएच्या तीन हजार पोलिसांना घरे
पनवेल : बातमीदार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार्या सर्व पोलिसांचे टप्याटप्याने हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिडकोने तीन हजार घरांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्प्पन्न गट (एलआयजी) या दोन प्रकारातील पोलिसांना घरे मिळणार असून …
Read More »‘भिकारीमुक्त पनवेलचा’ पोलिसांकडून संकल्प, कौतुकास्पद उपक्रमास पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -वपोनि अजयकुमार लांडगे
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात असलेल्या रेल्वे स्टेशन, बस स्थानक, उड्डाण पुलाखाली, मंदिर, मस्जिद परिसरात मुख्य नाक्यावर, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भिकारी वास्तव्य करीत असतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच अनेक वेळा गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा वाढते. तर अनेक भिकारी आजारी पडून तेथेच प्राण सोडतात. त्यामुळे पुढील …
Read More »रस्ते बांधण्यासाठी प्लास्टिकचा पर्याय
रस्ते बांधण्यासाठी डांबर वापरले जात होते. आजही डांबरीच रस्ते आहेत, परंतु आता राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामासाठी सिमेंट वापरले जाते. कोकणात भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे रस्ते टिकत नाहीत. त्यासाठी पर्याय शोधला जात आहे. नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने प्लास्टिकचा वापार करून रस्ते बांधता येतात आणि हे रस्ते टिकतातदेखील हे सिद्ध केले आहे. त्यामुळे …
Read More »आरे वनाचा चंद्र!
न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई करण्यात आली. प्रस्तावित कारडेपोचा भूखंड हा जंगलाचा भाग नाही हे न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे. तरी देखील पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरे यांच्या हट्टाखातर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामास स्थगिती देऊन एका आदर्श विकासकामात खोडा मात्र घातला. या स्थगितीपायी सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण पडत असून दररोज पाच …
Read More »पिंपळपाडा येथील अंगणवाडी धोकादायक; विद्यार्थी घेताहेत अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण
कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीमधील पिंपळपाडा येथील अंगणवाडी सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत उभी आहे. त्यामुळे जुलै 2019पासून विद्यार्थी अंगणवाडीसेविकेच्या घरी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ येथील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणेवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. रायगड जिल्हा परिषदेतर्फे सुमारे सहा लाख रुपये खर्चून मोग्रज ग्रामपंचायतमधील पिंपळपाडा …
Read More »मुलींनी गैरवर्तनाची माहिती पालकांना द्यावी; जिल्हा न्यायाधीशांचा सल्ला
अलिबाग : प्रतिनिधी आपल्या नात्यातला, ओळखीचा किंवा अनोळखी कुणीही पुरुष आपल्याशी गैरवर्तन करीत असेल, तर मुलींनी त्याची महिती आपल्या पालकांना द्यावी. त्यामुळे पुढील धोके टाळता येतील, असा सल्ला जिल्हा न्यायाधीश (प्रथम) वर्षा मोहिते यांनी येथे दिला. बालिका दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयातील विद्यार्थिनींकरिता आयोजित करण्यात …
Read More »नागोठण्यापाठोपाठ कुरूळमधील गुटखा अड्ड्यावर धाड
पाली ः प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असताना रायगड जिल्ह्यातील खेड्यापाड्यात राजरोसपणे गुटखाविक्री होत असल्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. पेण, नागोठणे येथील अवैध गुटखा प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्यानंतर अलिबाग कुरूळ येथील गुटखा जप्त करण्यात आला. अशा दिवसा व रात्री केव्हाही होणार्या बेधडक कारवाईमुळे गुटखाकिंग पुरते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper