Breaking News

Ramprahar News Team

सिडकोची चिपळे गावात अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई

पनवेल ः प्रतिनिधी सिडकोच्या नियंत्रक अनधिकृत बांधकामे (नैना) विभागातर्फे पनवेल तालुक्यातील चिपळे गाव येथे अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाई करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे सतीशकुमार द. खडके, अनधिकृत बांधकामे नियंत्रक (नैना) अमित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भूमापक विशाल ठेले, अमोल तांबे, शिवराज चव्हाण आणि कमलेश पाटील यांच्या पथकाने …

Read More »

शेतकर्यांना हेक्टरी 25 हजारांची तत्काळ मदत द्यावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

मुंबई ः प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 1) विधानसभेत केली. विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

महिला मोटरसायकल रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, वर्षाताई ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन, आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन व इनरव्हील क्लब ऑफ इंडस्ट्रीयल यांच्या वतीने सामाजिक संदेश व जनजागृतीच्या उद्देशाने महिला मोटरसायकल रॅली व पथनाट्याचे आयोजन रविवारी (दि. 1) करण्यात आले होते. पनवेल शहरासह नवीन पनवेल येथ आयोजित या रॅलीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई ठाकूर यांच्या हस्ते ध्वज दाखवून …

Read More »

रेल्वेचा जिना प्रवाशांसाठी खुला, पनवेलकरांनी मानले आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवरील नवीन पनवेलकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेला मोठा जिना अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे जिन्यावर होणारी गर्दी कमी होऊन अपघात टळणार असल्याने प्रवाशांनी त्यासाठी प्रयत्न करणार्‍या आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत. मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 ते 4वरून रोज छत्रपती शिवाजी …

Read More »

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती केली. रविवारी (दि. 1) विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे पत्र दिले, …

Read More »

अंकित पाटील सुवर्णपदकाचा मानकरी

श्रीगाव : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मेढेखार येथील अंकित नवनाथ पाटील कर्जत येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. 66 ते 70 किलो वजनी गटामध्ये एकूण 23 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यामधून सन मार्शल आर्ट्स अ‍ॅकॅडमी मेढेखारचा कराटेपटू अंकित पाटीलने सुवर्णपदक पटकावून मेढेखार गावासह रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरात कोरले. या …

Read More »

सावरकर स्मारकाचे मुष्टियोद्ध्यात घवघवीत यश

मुंबई ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मुष्टियोद्ध्यांनी मुंबई विद्यापीठाच्या रुईया महाविद्यालयात झालेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. विल्फ्रेड गोन्सालविस याने 60 किलो वजनी गटात, तर स्नेहा खरटमलने 69 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले. ज्योती धडसेने 54 किलो, सुनील मोरेने 56 किलो, साईराज हेगिस्तेने 75 किलो वजनी गटात रौप्यपदक …

Read More »

उरणमध्ये 19वा द्रोणागिरी जिल्हास्तरीय युवा महोत्सव

उरण ः प्रतिनिधी कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या उरणमधील द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून 19व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा युवा महोत्सव उरण शहरातील वीर सावरकर मैदानावर शुक्रवार (दि. 20) ते मंगळवार (दि. 24) या कालावधीत पार पडणार आहे. खेळाडू, कलाकार आदी स्पर्धकांसाठी एक उत्तम …

Read More »

संकेत म्हात्रेची जलतरण स्पर्धेत सप्तरंगी कामगिरी

पेण ः प्रतिनिधी  46व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेत संकेत केशव म्हात्रे याने सात पदकांची कमाई केली. संकेत हा पेण तालुक्यातील पाटणेश्वर गावचा सुपुत्र असून, तो नवी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहे. सिंधुदुर्ग येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये 50 मीटर फ्री स्टाइल (सुवर्ण), 100 मीटर फ्री स्टाइल (सुवर्ण), 400 मीटर फ्री स्टाइल …

Read More »

हैदराबाद घटनेवर विराट संतप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हैदराबादमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची जाळून हत्या केल्याच्या घटनेमुळे अवघा देश हादरला आहे. देशभरात विविध ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह क्रीडा जगतातील दिग्गज खेळाडूंनीही याबद्दल  तीव्र दुःख व्यक्त केले आहे. हैदराबादमध्ये जे घडलं ते अगदीच लज्जास्पद आहे, असे ट्विट …

Read More »