Breaking News

Ramprahar News Team

कामोठे : येथील युवा कार्यकर्ते सुशांत एकनाथ काटकर यांना वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी कामोठे शहर अध्यक्ष आरोग्य समिती सभापती डॉ. अरुणकुमार भगत, नावडे युवा मोर्चा अध्यक्ष जितेंद्र काटकर, सूर्यकांत काटकर, प्रशांत काटकर, रोशन सरकाले, मिलिंद झुरे आदी उपस्थित होते.

Read More »

पालिका अतिक्रमण विभाग पथकाची धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग पथकाने आज पनवेल परिसरात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण शुल्क वसूल केले आहे. खांदा वसाहत परिसरात दीपावलीच्या सुटीमुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण व अवैध विक्रेते वाढले होते. याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण …

Read More »

मोसारे येथे शैक्षणिक, क्रीडा साहित्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील नानोशी ग्रामपंचायतमधील मोसारे गावात पनवेल टेनिस क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या वतीने खर्‍या अर्थाने गरजू व गरीब शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी पनवेल टेनिस समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील (रोहिंजण), उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे (ओवळे), कुंडेवहाळ येथील प्रख्यात आणि दानशूर व्यक्तिमत्त्व असणारे …

Read More »

भ्रष्टाचाराविरोधात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पथनाट्य

उरण : प्रतिनिधी देशातील शासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली असल्याने त्याचा मनस्ताप जनतेला वारंवार सोसावा लागत आहे. या भ्रष्टाचाराचा बंदोबस्त कसा करावा या अनुषंगाने वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींचे उरणच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यासमोर भ्रष्टाचारविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. आज शासकीय यंत्रणेत जनतेला लहानशा कामासाठी लाच …

Read More »

चेन स्नॅचिंगवर नियंत्रण आणण्याची मागणी, खारघर पोलिसांना महिलांनी दिले निवेदन

खारघर : प्रतिनिधी खारघर शहरात नजीकच्या काळात चेन स्नॅचिंगचे प्रकार सर्वच सेक्टरमध्ये वाढले आहेत. संबंधित प्रकाराने महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांनी यासंदर्भात योग्य ती पावले उचलण्याची मागणी शुक्रवारी (दि. 1) खारघर भाजपच्या महिला पदाधिकार्‍यांनी केली. भाजपच्या महिला मोर्चाच्या चिटणीस बिना गोगरी यांनी …

Read More »

नुकसानीचे पंचनामे लवकर करावेत, भाजपचे केळवणे विभाग अध्यक्ष किरण माळी यांची मागणी

मोहोपाडा : प्रतिनिधी या वर्षी झालेला पाऊस आणि त्यामुळे बहरलेली शेती शेतकर्‍यांना सुखद करणारी होती, मात्र परतीच्या अवेळी पावसाने बहरलेल्या भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांचे डोळे पाणावले आहेत.शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून गरीब शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केळवणे भाजप विभागप्रमुख किरण माळी, तसेच रसायनी पाताळगंगा परिसरातील शेतकर्‍यांनी केली …

Read More »

परतीचा पाऊस, वादळाचा पर्यटन व्यवसायावर परिणाम

अलिबाग ः प्रतिनिधी दिवाळीपासून रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम सुरू होतो, परंतु यंदा परतीचा पाऊस आणि चक्रीवादळाचा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला आहे. दिवाळीची सुटी असतानादेखील रायगड जिल्ह्यात फार कमी पर्यटक येत आहेत. गोव्यापाठोपाठ कोकणातील समुद्रकिनार्‍यांनी पर्यटकांना भुरळ पाडली आहे. नारळी-पोफळीच्या बागा, रूपेरी वाळू, निळाशार समुद्र आणि फेसाळणार्‍या लाटा यामुळे रायगडचे समुद्रकिनारे …

Read More »

गोवंश हत्येप्रकरणी खालापुरात एकाला अटक

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील हाळ बुद्रुक गावातील रियाज अब्दुल कादीर जळगावकर याला पोलिसांनी गोवंश हत्येप्रकरणी अटक केली आहे. हाळ बुद्रुक गावात बेकायदा गुरांची कत्तल होत असल्याची माहिती खालापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हाळ बुद्रुक गावात छापा टाकला असता रियाज हा गोवंश जातीच्या प्राण्याची हत्या …

Read More »

नवीन पनवेल परिसरात छट्पर्व उत्साहात, आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले छट्पूजेचे दर्शन

पनवेल ः  रामप्रहर वृत्त दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात उत्तर भारतात छट्पर्व मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. त्यानिमित्त नवीन पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, कामोठे, कळंबोली येथे छट्पूजा उत्साहात करण्यात आली. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध ठिकाणी जाऊन छट्पूजेचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता …

Read More »

सुकापूरमध्ये शेकापला पुन्हा धक्का!, कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी छट्पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत सुकापूर येथे भाजप उत्तर भारतीय समितीतर्फे छट्पूजेनिमित्त  शनिवारी (दि. 2) भजनसंध्या आयोजित करण्यात आली होती. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. सुकापूर येथे शनिवारी …

Read More »