नागोठणे : प्रतिनिधी कोएसोच्या नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात एनएसएसतर्फे नुकतीच महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल सोसायटीच्या अंतर्गत रोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय संलग्न रेड रिबन क्लबची स्थापना करण्यात आली. रुग्णालयाचे समुपदेशक महेश गोसावी, मंगेश पाटील यांनी या वेळी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्सविषयी मार्गदर्शन केले, तर प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांनी एड्स …
Read More »अभिनव ज्ञानमंदिर संस्थेची सामाजिक बांधिलकी ; पूरग्रस्तांसाठी चार लाख 30 हजारांचा धनादेश
कर्जत, खोपोली : प्रतिनिधी येथील अभिनव ज्ञानमंदिर संस्थेने कोल्हापूर, सांगलीमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा करून त्याचा धनादेश जनकल्याण समितीकडे सुपूर्द केला. यासाठी संस्थेच्या प्रांगणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला असल्याची माहिती संस्थेचे सचिव जनार्दन मोघे यांनी प्रास्ताविकात दिली. …
Read More »बल्लाळेश्वर देवस्थानचा पूरग्रस्तांना मदतीचा हात ; मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन लाख 11 हजारांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकापैकी एक स्थळ असलेल्या पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दोन लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश बुधवारी (दि. 20) मंत्रालयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे देवस्थानचे अध्यक्ष अॅड. धनंजय धारप यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच देवस्थानतर्फे सुधागड तहसीलदारांकडे ब्लँकेट देण्यात आले. श्री …
Read More »‘निलिकॉन’च्या कंत्राटी कामगारांचा संप
रोहे : प्रतिनिधी न्याय हक्क देण्याबाबत निलिकॉन कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ येथील निलिकॉन कंपनीतील कंत्राटी कामगारांनी बुधवारी (दि. 21) सकाळपासून एक दिवसीय लाक्षणिक संप सुरू केला होता. त्यामुळे खडबडून जाग आलेल्या कंपनी व्यवस्थापनाने युनियनच्या पदाधिकार्यांबरोबर सकारात्मक चर्चा केल्याने दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले. रोहे तालुक्यतील …
Read More »ग्रामपंचायत कर्मचार्यांची आता पनवेल मनपात होणार नियुक्ती ; 297 जणांना कायम करण्याचे निर्देश
मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील 297 ग्रामपंचायत कर्मचार्यांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे नगरविकास विभागाला दिले. ना. योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्यांचे समायोजन पनवेल महानगरपालिकेत करण्याबाबत कर्मचार्यांची बाजू …
Read More »अभिनंदन यांचा छळ करणार्या कमांडोचा खात्मा
नवी दिल्ली : भारतीय मिग-21 लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडणार्या आणि टॉर्चर करणार्या पाकिस्तानी कमांडोचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा …
Read More »मनसेचा यू-टर्न
मुंबई : प्रतिनिधी राज ठाकरे यांना आलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)च्या नोटीसनंतर 22 ऑगस्ट रोजी या कार्यालयावर धडकण्याचा आक्रमक निर्णय मनसेने अचानक बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर येऊ नये, असे आवाहन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ‘कोहिनूर स्क्वेअर’ गैरव्यहारप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावल्याने मनसेने ईडीच्या कार्यालयावर धडकण्याचा …
Read More »अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेची स्थापना
मुंबई : प्रतिनिधी खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, युप्लिफ्टमेंट अॅण्ड ट्रेनिंग) ही संस्था स्थापन करण्यास मंगळवारी (दि. 20) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून, त्यात मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी विशेष …
Read More »मोनिका जाधवचा तिरंदाजीत ‘सुवर्ण’वेध
शांघाई : वृत्तसंस्था चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्समध्ये भारतीय पोलीस दलाच्या महिला प्रतिनिधीने देशाची मान उंचावली आहे. या स्पर्धेत भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणारी महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली आहेत. मोनिका जाधव बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून …
Read More »स्मिथ तिसर्या कसोटीतून बाहेर
लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अॅशेस 2019 मालिकेत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. तिसर्या कसोटीतून ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ बाहेर झाला आहे. दुसर्या कसोटीत जोफ्रा आर्चर याच्या गोलंदाजीवर खेळताना त्याच्या मानेवर चेंडू आदळला होता. त्या दुखापतीतून न सावरल्यामुळे त्याला हेडिंग्ले कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. दुसर्या अॅशेस कसोटी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper