Breaking News

Ramprahar News Team

विजेंदर सिंगचा विजयी पंच; प्रो-बॉक्सिंगमध्ये सलग अकरावी जीत

नेवार्क : वृत्तसंस्था भारतीय बॉक्सर विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. वर्षभर रिंगपासून लांब राहिलेल्या विजेंदरने अमेरिकेच्या माइक स्नायडरचा पराभव करीत बॉक्सिंग करियरमधील 11वा विजय मिळविला. त्याचबरोबर प्रो-बॉक्सिंगमध्ये पराभूत न होण्याचा विक्रमही त्याने कायम राखला आहे. विजेंदर आणि स्नायडरदरम्यान अमेरिकेच्या नेवार्क (न्यूजर्सी) येथे हा सामना रंगला. आठ राऊंडच्या मिडलवेट …

Read More »

करण माळी, प्रतीक्षा कुलथे रोहा वर्षा मॅरेथॉनमध्ये प्रथम

रोहे ः प्रतिनिधी येथे आयोजित जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉनमध्ये खुल्या गटात पुरुषांमध्ये करण माळी आणि महिलांमध्ये प्रतीक्षा कुलथे यांनी बाजी मारली. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होेते. पुरुष खुला गटात करण हरिश्चंद्र माळी प्रथम, अक्षय जितेकर व्दितीय, रामू गणपत पारधी तृतीय, तर महिला खुला गटात प्रतीक्षा कुलथे प्रथम, …

Read More »

वेस्ट इंडिज दौर्‍याआधी शंकर देणार फिटनेस टेस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर आगामी वेस्ट इंडिज दौर्‍याआधी फिटनेस टेस्ट देणार आहे. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत शंकरला ही टेस्ट द्यावी लागेल. विश्वचषक स्पर्धेत सरावादरम्यान जसप्रीत बुमराहचा यॉर्कर चेंडू विजय शंकरच्या पायाला लागला होता. या दुखापतीमुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले होते. विश्वचषक स्पर्धेसाठीच्या 15 …

Read More »

हिमा दासची ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक ; तिसरी स्पर्धा जिंकून रचला इतिहास

झेक प्रजासत्ताक : वृत्तसंस्था भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने 11 दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या क्लांदो स्मृती अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन …

Read More »

कामगार हिताय, कामगार सुखाय! ; गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस वेतनवाढ आणि सोयीसुविध

पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामगार नेते जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जय भारतीय जनरल संघटनेच्या माध्यमातून न्हावा-शेवास्थित पंजाब कॉन्वेर सीएफएसमधील गॅड लॉजिस्टीकच्या 250 कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करारनामा झाला. त्यामुळे …

Read More »

मराठा आरक्षणाला तूर्त स्थगिती नाही ; सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मराठा आरक्षणावरील मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती देता येत नसल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजासह राज्य सरकारला दिलासा दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर दोन आठवड्यांनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाबाबतचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर या निर्णयाला आरक्षण विरोधकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान …

Read More »

बा विठ्ठला… जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेेक्षा पूर्ण होऊ दे! मुख्यमंत्र्यांचे साकडे

पंढरपूर : प्रतिनिधी राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी  (दि. 12) विठ्ठलचरणी घातले. परंपरेप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुख्मिणीची सपत्नीक शासकीय महापूजा केली. त्यानंतर ते बोलत होते. या वेळी अहमदपूरच्या वारकरी …

Read More »

मृतदेह शोधण्यात पनवेलमधील कोळी बांधवांची विशेष मेहनत

पनवेल : रामप्रहर वृत्त गाढी नदीपात्रात वाहून गेलेल्या आदित्य आंब्रे यांचा मृतदेह शोधून देण्यात पनवेल कोळीवाडा येथील मच्छीमार बांधवांनी विशेष मेहनत घेतली. आदित्य व सारिका आंब्रे हे दाम्पत्य गाढी नदीपुलावरून वाहून गेले होते. बुधवारी शोधमोहिमेत त्यांची दुचाकी सापडली, मात्र ते बेपत्ता होते. त्यामुळे तिसर्‍या दिवशीही शोधमोहीम सुरू होती. या संदर्भात …

Read More »

अलिबागेत भरवस्तीत भंगार गोदामाला आग

अलिबाग : प्रतिनिधी शहरातील जुन्या मासळी बाजाराच्या मागील बाजूस असलेल्या भंगाराच्या गोदामाला गुरुवारी रात्री आग लागली. अग्निशमन दलाने अडीच तासांच्या महत्प्रयासाने या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी भरवस्तीतील अनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. घराशेजारीच मोकळ्या जागेला गोदामाचे स्वरूप देण्यात …

Read More »

निघालो घेऊन पालखी विठ्ठलाची..! ; आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर झाले पालखीचे भोई

पनवेल : रामप्रहर वृत्त विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन होत पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. 12) वारकरी दिंडी काढली. निमित्त होते आषाढी एकादशीचे. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिंडीत सहभाग घेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. महाराष्ट्राच्या विविध भागांतून वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात …

Read More »