Breaking News

Ramprahar News Team

विंडीजचा शेवट गोड ; अखेरच्या सामन्यातही अफगाणिस्तानची हार

लीड्स : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करीत विश्वचषक स्पर्धेचा समारोप गोड केला. 312 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला अफगाणिस्तानचा संघ 288 धावांपर्यंतच मजल मारू शकला. या संघाला विश्वचषकात एकही विजय मिळवता आला नाही. अफगाणिस्तानकडून यष्टीरक्षक इक्रम अलीने 86, तर रेहमत शाहने 62 धावांची …

Read More »

हिमा दासची ‘सुवर्ण’धाव; पोन्जान अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद

वॉर्सा : वृत्तसंस्था भारतीय स्टार धावपटू हिमा दासने पोलंडमध्ये झालेल्या पोन्जान अ‍ॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले आहे. हिमाने 200 मीटर अंतर केवळ 23.65 सेकंदांमध्ये पूर्ण करीत सुवर्णपदक आपल्या नावावर केले. ट्विटरच्या माध्यमातून हिमाने ही माहिती दिली. 400 मीटर स्पर्धेतील वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा …

Read More »

रायगड जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग

अलिबाग : प्रतिनिधी पाच दिवसांनतर पाऊस थांबल्यामुळे रायगड जिल्ह्यात  शेतीच्या कामांना वेग आला आहे. लावणीच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे जलाशायांमध्ये  50 टक्के पाणीसाठा झाला आहे.   जून महिन्याच्या सुरूवातीला मान्सूनपूर्व सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे धूळपेरणी केलेली भाताची रोपे तयार झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. भात …

Read More »

विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव पायरीचीवाडी प्राथमिक शाळेचा उपक्रम

पाली : प्रतिनिधी नांगरणी, पेरणी व लावणी आदी कामे विद्यार्थी पुस्तकातून अभ्यासतात. मात्र भात लावणीचा अनुभव विद्यार्थ्याना प्रत्यक्ष देता यावा, यासाठी सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुणाल पवार यांनी सोमवारी (दि.1) विद्यार्थ्याना प्रत्यक्ष शेतात नेऊन भात लावणी केली. पावसाची सर्वत्र जोरदार सुरुवात झाली आहे. शेतात भात लावणीची कामे …

Read More »

पावसामुळे शिक्षकांची वाट बिकट माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांचा रस्ता बंद

कर्जत : बातमीदार माथेरानच्या डोंगरात जुम्मापट्टी गावाच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्याचा रस्ता पावसामुळे खचून गेला आहे. त्यामुळे त्या भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये येणारे शिक्षक हे शाळेत वेळेवर पोहचत नाहीत. या शाळांमधील विद्यार्थी हे शाळेत येतात आणि गुरुजी आले नाहीत म्हणून पुन्हा घरी जातात. दरम्यान, वन जमिनीतून जात असलेला रस्ता …

Read More »

भाज्या गटारात धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल ; महाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष

महाड : प्रतिनिधी पावसाळा सुरू झाला आणि बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली. या हिरव्यागार पालेभाज्याकडे ग्राहकदेखील आकर्षित होत आहेत. मात्र गुरुवारी (दि. 4) सकाळी महाडमधील एका रस्त्याकडेला असलेल्या गटारात या भाज्या धुतल्या जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि शहरात एकच खळबळ उडाली. महाडमध्ये ऐन पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात दाखल होतात. …

Read More »

म्हसळा पोस्ट ऑफिसची स्थिती दयनीय; इमारत मोडकळीस

म्हसळा : प्रतिनिधी येथील पोस्ट ऑफीसची इमारत मोडकळीस आली आहे. स्लॅप कधीही कोसळण्याच्या स्थितीत असल्याने तेथील कर्मचारी जीव मुठीत धरुन काम करीत आहेत. येथील बहुतांश संगणक बंद पडले असून, या कार्यालया मार्फत देण्यात येणार्‍या सेवा पूर्णपणे बंद पडल्या आहेत. म्हसळा पोस्ट ऑफीसमध्ये उपडाकपाल, पोस्टल अस्सीस्टंट, एमटीएस, पोस्टमन असे 7 ते …

Read More »

विकासकामांचे श्रेय पालकमंत्री व जिल्हाध्यक्षांनाच -देवेंद्र साटम

कडाव : प्रतिनिधी विधानसभेच्या कर्जत-खालापुर मतदारसंघात गेल्या पाच वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत तर अनेक कामे मंजूर झाली आहेत. ही विकासकामे आणण्याचे श्रेय पालकमत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे आहे, असा दावा भाजपचे कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांनी गुरुवारी (दि. 4) केला. …

Read More »

सुधागडात एक हजार रोपांची लागवड

सुधागड : राज्य शासनाने 33कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून, त्याचाच भाग म्हणून सुधागडच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने तालुक्यातील चिखलगाव ते करंजाई रस्त्याच्या दुतर्फा एक हजार खड्डे खोदून त्यामध्ये लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थित विविध जातीच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी पं.स. सभापती साक्षी दिघे, वनक्षेत्रपाल आय. डी. …

Read More »

मुरुड नगर परिषदेतर्फे शहरात वृक्षदिंडी

मुरुड : प्रतिनिधी येथील नगर परिषदे तर्फे नुकताच मुरुड अलंकापुर, कुभांरवाडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये चोनचाफा, चिकू, काजू, आंबा, जास्वद, पेरु, मोगरा, जुई, कन्हेर, बुलासियन, हेलीकोनिया, कडुलिंब व इतर जातीची झाडे लावण्यात आली.उत्तम आरोग्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक असे मत नगराध्याक्षा स्नेहा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. नगर परिषदेच्या …

Read More »