Breaking News

Ramprahar News Team

तुकाराम केदारी पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि स्व. ह.भ.प तुकाराम महाराज केदारी यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि कैलासवासी स्वर्गीय ह. भ. प. तुकाराम …

Read More »

पनवेल एलआयसीची इमारत धोकादायक पनवेल ः बातमीदार ग्राहकांना वेगवेगळ्या विम्याच्या माध्यमातून भविष्याची चिंता न करण्याचा सल्ला देणार्‍या एलआयसीचे कार्यालयच धोकादायक इमारतीत सुरू आहे. पनवेल एलआयसीचे कामकाज महापालिकेने धोकादायक ठरविलेल्या पनवेल शहरातील एका इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू आहे. स्वत:सोबत ग्राहकांचा जीव धोक्यात टाकणार्‍या एलआयसी व्यवस्थापनाने लवकरात लवकर इमारत स्थलांतरित करण्याची गरज आहे. …

Read More »

बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

पनवेल ः बातमीदार नेरूळ सेक्टर 20मध्ये बालाजी गार्डन नावाने इमारतीचे बांधकाम करणार्‍या अर्जुन चौधरी या बांधकाम व्यावसायिकाने या इमारतीतील एक फ्लॅट दोन व्यक्तींना विकून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ सेक्टर 20मध्ये आरोही बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या वतीने बालाजी गार्डन या इमारतीतील 15 लाख किमतीच्या 1 …

Read More »

दोन ट्रेलरची परराज्यात विक्री ; बनावट कागदपत्रांनी महसूल बुडविला

पनवेल ः बातमीदार मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे पालन न करता गोरेगाव येथील एका वित्त पुरवठादार कंपनीने ताब्यात घेतलेल्या दोन ट्रेलरची परराज्यात परस्पर विक्री करून राज्य सरकारचा महसूल बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पनवेल आरटीओने या कंपनीसह वाहन मालकावर सरकारी महसुलाची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत कळंबोली पोलिसांकडे लेखी पत्रव्यवहार …

Read More »

पनवेल ः श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीने शेलघर शाळेत वह्यावाटप करण्यात आले.

Read More »

ज्येष्ठ साहित्यिका वासंती ठाकूर ‘काव्य शारदा’ पुरस्काराने सन्मानित

चिरनेर : प्रतिनिधी उरण येथील काव्य दरबार साहित्यिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा कै. प्रा. व्यंकटेश म्हात्रे स्मृती पुरस्कार जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिका वासंती ठाकूर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. सौ. ठाकूर या आजारी असल्याने हा पुरस्कार त्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन देण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या …

Read More »

सीकेटीत विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त सेंट्रल एक्साइज रायगड कमिशनरेटतर्फे साजर्‍या झालेल्या जीएसटी सप्ताहानिमित्ताने सीकेटी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सीकेटी इंग्रजी मााध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 9) झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कमिशनर श्रवणकुमार तसेच जॉइंट सेके्रटरी राघवेंद्र सिंग, …

Read More »

रोटरी क्लब पनवेलच्या अध्यक्षपदी अविनाश कोळी

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी जिल्हा प्रांतपाल डॉ. दीपक पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत व सहाय्यक प्रांतपाल   शाम फडणीस, रोटरॅक्ट जिल्हा सचिव द्विजेश नाशीककर यांच्या उपस्थितीत रोटरी क्लब पनवेल महानगरचे अध्यक्ष म्हणून अविनाश भगवान कोळी यांनी मावळते अध्यक्ष  गणेश मांजरेकर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. सचिवपदी शामला कुलकर्णी व खजिनदारपदी महेंद्र मारू यांनी …

Read More »

‘रानसई’ ओव्हरफ्लो

उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण मुसळधार पावसाने पूर्णपणे भरून वाहू लागल्याने उरणकरांचे पाणी संकट टळले आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नव्हता. त्यामुळे धरणाची पातळी आटली होती. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून पावसाने सुरुवात …

Read More »

स्वतंत्र कोकण विद्यापीठाची नितांत गरज

सातशे महाविद्यालये संलग्न असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर कमालीचा ताण पडत असल्याने, पर्यायाने 1857 साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. पेपरफुटीचे अनेक प्रसंग, उशिरा लागणारे निकाल, प्रमाणपत्र मिळण्यात होणारा विलंब, अभ्यासमंडळ व प्राध्यापकांच्या नियुक्तीस होणारा विरोध हा मूलतः विद्यापीठाचा वाढलेला अवाढव्य पसारा …

Read More »