Breaking News

Ramprahar News Team

खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांचा जाहीर सत्कार शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व …

Read More »

मुसळधार पावसाने रायगडला झोडपले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला शुक्रवारी (दि. 28) मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. कामावर निघालेले नोकरदार आणि शाळा-कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला. दरम्यान, या पावसामुळे जलसंकट टळले असून, बळीराजाही सुखावल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून रुसून बसलेला मान्सून अखेर जिल्ह्यात …

Read More »

खालापुरात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील करंबेळी गावात डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. त्याच्यासह अन्य तीन संशयित रुग्णांवर वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. करंबेळीत गेल्या दोन-चार दिवसांपासून तापाची साथ आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यातील गणेश महाडिक (27) याला अशक्तपणा जाणवू लागल्याने वावोशी प्राथमिक …

Read More »

भारताला पाठिंबा देणार की इंग्लंडला? नासीर हुसैनचा पाक क्रिकेट रसिकांना सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मजबूत दावेदार असलेला इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. या संघाला सेमीफायनलमध्ये पोहचण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे रविवारी होणार्‍या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, असा सवाल इंग्लंड क्रिकेट संघांचा माजी कर्णधार नासिर हुसैन याने पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना केला …

Read More »

पावसाळी क्रिकेट स्पर्धेत आंजर्ले संघ विजेता

श्रीवर्धन : प्रतिनिधी जीवना येथील साईस्टार ग्रुपच्या वतीने आयोजिींत नगराध्यक्ष चषक पावसाळी क्रिकेट स्पर्धेत इरफानिया अडखळ आंजर्ले या संघाने विजेतेपद पटकाविले. दर्यावर्दी श्रीवर्धन संघ उपविजेता ठरला. मालिकावीर तुषार (दर्यावर्दी) उत्कृष्ट फलंदाज इमरान, उत्कृष्ट गोलंदाज फजल, सामनावीर इमरान आणि शिस्तबद्ध संघ म्हणून रॉकस्टार जीवना यांची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि …

Read More »

हा कसला बॉस, याची हुकूमत मर्यादित! ; रमीझ राजा यांची ख्रिस गेलवर जोरदार टीका

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेच्या 34व्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत विंडीज संघाचा हा पाचवा पराभव आहे. त्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूने टीकेचा अक्षरक्ष: वर्षाव होत आहे. दरम्यान, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू व क्रिकेट समीक्षक रमीझ राजा यांनी धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलवर जोरदार टीका केली आहे. चेंडू स्टेडिअमबाहेर …

Read More »

धोनी एक महान खेळाडू ; विराट कोहलीकडून पुन्हा पाठराखण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वर्ल्ड कपमध्ये आपल्या संथ खेळीमुळे टीकेचा धनी झालेल्या भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची विराट कोहलीकडून पाठराखण करण्यात आली आहे. धोनी एक महान खेळाडू असून, त्याला खेळाची उत्तम जाण आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होत असल्याचे  विराटने सांगितले. वेस्ट इंडिजवर दिमाखदार विजय मिळविल्यानंतर विराट प्रसारमाध्यमांशी …

Read More »

भारताला जो हरवेल तोच वर्ल्ड कप जिंकेल! ; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे विधान

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या धडाकेबाज कामगिरीनंतर अनेक माजी दिग्गजांनी भारतच विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले आहे. पाकिस्तान, श्रीलंकेकडून झालेला धक्कादायक पराभव आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मात दिल्यापासून इंग्लंडच्या माजी खेळाडूंचे सूरदेखील सोशल मीडियावर बदललेले पहायला मिळत आहेत. आतापर्यंत इंग्लंडच विजयाचा प्रबळ दावेदार आहे आणि घरच्या मैदानावर विश्वचषक …

Read More »

भारत उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर ; विंडीजवरील विजयाने गुणतालिकेत दुसर्या स्थानी

मँचेस्टर : वृत्तसंस्था दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 268 धावा केल्या होत्या, मात्र हे आव्हान विंडीजला पेलवले नाही आणि त्यांचा डाव अवघ्या 143 धावांत संपुष्टात आला. या विजयासह भारत 11 गुणांसह …

Read More »

अभिनंदन अन् शुभेच्छा! पनवेल : दिघाटी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत बिनविरोध विजयी झालेले भाजपचे सदस्य मनोहर मारुती पाटील, हर्षदा सुजित पाटील, अक्षता मयूर म्हात्रे व वैशाली कैलास पाटील यांचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, दिघाटीचे सरपंच अमित …

Read More »