नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या सौजन्याने आणि युगांतर मित्र मंडळाच्या वतीने नेरूळ येथील श्री झोटिंगदेव बामणदेव मैदान परिसरात जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्यात आले, आतापर्यंत मंडळाच्या वतीने 500 हुन अधिक झाड लावून त्यांचे संवर्धन करत असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली. पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी आणि हवेतील प्राणवायुचे …
Read More »तळोजा एमआयडीसीत अमलीसाठा नष्ट
मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी परिसरात जप्तीच्या पदार्थांची विल्हेवाट पनवेल : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आजादी का अमृत महोत्सवा निमित्त केलेल्या आयकॉनिक विकच्या पार्श्वभूमीवर भारतीय कस्टमने तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी परिसरात जप्त केलेल्या अमली पदार्थांची विल्हेवाट बुधवारी (दि. 8) लावली. मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ नष्ट …
Read More »स्थानिक बियाणांच्या संवर्धनासाठी तरुणांची धडपड
बाजारात गेल्यावर हिरव्यागार दिसणार्या भाज्या आपले लक्ष वेधून घेतात. मात्र या सर्व भाज्या संकरित बियाणांच्या असतात. संकरित बियाणांच्या शेतीचे प्रमाण वाढल्यामुळे स्थानिक पारंपरिक बियाणे लुप्त होत चालले आहे. या स्थानिक पारंपरिक बियाणांचे संवर्धन करण्याचे तसेच शेतीतील जैवविविधतेचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिगस ग्रामपंचायतीमधील तरूण करत आहेत. अकरा तरूणांनी एकत्र …
Read More »कोरडी आश्वासने
राज ठाकरे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेतील सभेचा पर्याय निवडला असावा असे वाटते. तथापि त्यांचे प्रत्युत्तर तितकेसे यशस्वी ठरले असे म्हणता येणार नाही. औरंगाबादच्या नामांतराचा आणि शहरवासियांच्या पाण्याचा प्रश्न महाविकास आघाडी अद्याप सोडवू शकलेली नाही. किंबहुना या दोन्ही प्रश्नांबाबत औरंगाबादकरांच्या मनात तीव्र नाराजी आहे व …
Read More »‘मजनू’ चित्रपट आज होणार प्रदर्शित
कर्जत : प्रतिनिधी प्रेम म्हणजे खरं काय? युवक – युवती प्रेमा मध्ये अडकले की वेडे होतात. त्यांना भान रहात नाही. त्यांना जन्म दिलेल्या आई-वडिलांचीही फिकीर रहात नाही. कधी कधी प्रेमविवाह घटस्फोटाकडे जाताना दिसतात. मात्र मजनू हा चित्रपट प्रेमाची खरी परिभाषा सांगणारा आहे, असा विश्वास या चित्रपटातील नायिका श्वेतलाना अहिरे हिने …
Read More »कर्जत पं.स. कार्यालयाच्या आवारात कुत्र्यांचा सुळसुळाट
कर्जत : बातमीदार येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. या कार्यालयाच्या गेटवरच नाहीतर परिसरात आणि काही कुत्रे कार्यालयाच्या पायर्यांवरही दिसून येत आहेत. त्याबद्दल कर्जत पंचायत समितीचे प्रशासन काय करतेय, अशी विचारणा होत आहे. कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांना …
Read More »पावसाच्या आगमनाने खोपोलीच्या आठवडा बाजारात दाणादाण
खोपोली : प्रतिनिधी येणार, येणार म्हणून हुलकावणी देणार्या मोसमी पावसाने गुरुवारी (दि. 9) विजेच्या कडकडाटासह खोपोलीत जोरदार एन्ट्री केली. दर गुरुवारी खोपोली बाजारपेठेत आठवडा बाजार असतो, खेड्यापाड्यातील नागरिक तसेच आदिवासी बांधव या बाजारात खरेदीसाठी येत असतात. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आलेल्या पावसाने आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या परिसरातील ग्रामस्थांची चांगलीच …
Read More »उमटे धरणावर अवलंबून असणार्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करा
भाजपची अलिबाग प्रांताधिकार्यांकडे मागणी अलिबाग, रेवदंडा : प्रतिनिधी तालुक्यातील उमटे धरणावर अवलंबून असणार्या 65 गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी अलिबाग येथील उपविभागीय अधिकार्यांकडे केली आहे. या वेळी प्रांताधिकार्यांना उमटे धरणातील दूषित पाण्याने भरलेली बाटली देण्यात आली. उमटे धरणाबाबत …
Read More »महाडमध्ये एक हजार वृक्षांची लागवड
संत निरंकारी मिशनचा उपक्रम महाड : प्रतिनिधी जागतिक हवामान दिनानिमित्त संत निरंकारी मिशन व एम्बायो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एम्बायो लिमिटेड कंपनीच्या महाड एमआयडीसीमधील दीड एकर जमिनीत सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. संत निरंकारी मिशनचे रायगड व चिपळूण झोन प्रमुख प्रकाश म्हात्रे, रायगडचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील, महाड …
Read More »बंदीकाळात मासेमारी करणार्यांवर कारवाई करा
अन्यथा उपोषण करणार, हरिदास बाणकोटकर यांचा इशारा मुरुड : प्रतिनिधी शासनाने बंदी घातली असतानाही समुद्रात मासेमारी करणार्या मच्छिमारांवर येत्या दोन दिवसात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राजापुरी येथील ग्रामस्थ हरिदास बाणकोटकर यांनी मुरूड तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. माशांचा प्रजननकाळ असल्यामुळे शासनाने 1 जून ते 31 जुलै …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper