Breaking News

Ramprahar Team

झोपड्यांच्या पुनवर्सनाबाबत सिडको उदासीन

प्राधिकरणाची भूमिका तळ्यात-मळ्यात पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील झोपड्यांचे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्या संदर्भामध्ये सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून आर्थिक तरतुद सुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांचे आपल्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी सिडको हद्दीतील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत अद्यापही पाऊले उचलण्यात आले …

Read More »

डॉ. आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमास प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आजोजित करण्यात आलेल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमास प्रारंभ झाला. अलिबाग येथील सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात गुरुवारी (दि. 7) या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नेते नाहीत. त्यांनी या देशाला घटना दिली …

Read More »

फेरीबोटींच्या तिकीट दरात तफावत; प्रवाशांची नाराजी

मुरूड : प्रतिनिधी आगरदांडा ते दिघी या एकाच सागरी मार्गावर चालणार्‍या दोन रोरो फेरी बोट सेवांच्या तिकीट दरात मोठी तफावत असल्याने प्रवाशांत नाराजी निर्माण आहे. आगरदांडा व दिघी ही दोन महत्त्वाची बंदरे आहेत. मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन या तीन तालुक्यांना जोडणारा रोरो फेरी बोट सेवा हा महत्त्वाचा दुवा आहे. या ठिकाणी …

Read More »

अखेर पाटबंधारे खाते वठणीवर

तळेगाव कालव्याला सोडले पाणी; शेतकरी सुखावले माणगाव : प्रतिनिधी डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी कालव्याला सोडणे बंद केल्यामुळे माणगाव तालुक्यातील तळेगाव परिसरातील भातशेती पिकण्याआधीच सुकली होती. त्याचे वृत्त प्रसिध्द होताच पाटबंधारे विभागाने तळेगाव मार्गावरील कालव्याला बुधवारी (दि. 6) पाणी सोडले. त्या भागातील भातशेतीचे होणारे नुकसान टळले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही माणगाव तालुक्यात …

Read More »

माथेरानचा निसर्ग उतरला कॅनव्हासवर

लँडस्केप पेंटिंग स्पर्धेत देशातील चित्रकारांचा सहभाग; विजेत्यांमध्ये जेजे स्कुलचे वर्चस्व कर्जत : बातमीदार लँडस्केप पेंटिंग स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा माथेरानचा निसर्ग कॅनव्हासवर साकारला असून या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये मात्र मुंबईतील सर जेजे स्कुल ऑफ आर्टसच्या चित्रकारांचे वर्चस्व राहिले. माथेरानचा निसर्ग कोणत्याही चित्रकाराला आकर्षित करणारा आहे. येथील निसर्गप्रेमी प्रसाद सावंत यांच्या संकल्पनेतून …

Read More »

संजय बियाणी यांच्या हत्येचा कर्जतमध्ये निषेध

कर्जत : बातमीदार नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय बियाणी यांच्या हत्येचा कर्जत माहेश्वरी युवा मंडळाने निषेध केला असून, पोलीस प्रशासनास निवेदन देऊन या प्रकरणातील आरोपींवर कारवाईची मागणी केली. माहेश्वरी समाजातील नांदेड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची  दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली.  बियाणी यांची हत्या करणार्‍या …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकामधील अर्धवट अवस्थेतील पादचारी पूल तोडण्यास सुरुवात

कर्जत : बातमीदार नेरळ रेल्वे स्थानकात दोन नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार असल्याने अर्धवट अवस्थेत असलेल्या पादचारी पूलाच्या दोन्ही बाजूच खांब जमीनदोस्त करण्यात येत आहेत. नेरळ रेल्वे स्थानकात  2003 मध्ये पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आली होते. मात्र दोन्ही बाजूला सिमेंटचे खांब उभे राहिल्यानंतर त्या पुलाचे काम बंद पडले ते …

Read More »

कोतुर्डे धरणातील पाणी आरक्षित करावे

महाड तहसीलदारांकडे ग्रामस्थांची मागणी महाड : प्रतिनिधी रायगड विभागात असलेल्या कोतुर्डे धरणातील पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येत असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या महाड तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कोतुर्डे धरणाचे पाणी रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येऊ नये, अशी मागणी ग्रामस्थांनी महाड  तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाड …

Read More »

‘तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी सहकार्य करा’

मुंबई : प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत केवळ तीन हजार 700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे. मतदार यादीत राज्यातील सर्व तृतीयपंथीय समाजाने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान …

Read More »

मुंबईत नव्या विषाणूचा रुग्ण

दक्षिण आफ्रिकेचा नागरिक; चिंता वाढली मुंबई ः प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या नगण्य झाल्याने निर्धास्त असणार्‍या आरोग्य विभागाची चिंता ब्रिटनमध्ये आढळलेल्या ‘एक्सई’ या कोरोनाच्या नव्या उपप्रकाराने बाधित असलेला एक रुग्ण मुंबईत आढळल्याने वाढली आहे. मुंबई पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे निदर्शनास आले आहे. भारतातील हा एक्सईचा पहिलाच …

Read More »