Breaking News

Ramprahar Team

हिंदुंनो, मरणाखेरीज तुमच्या नशिबी काय असणार?

ज्येष्ठ पत्रकार दि. वि. गोखले यांची जन्मशताब्दी आज 24 मार्च 2022 पासून सुरू होत आहे. विवेक साप्ताहिकाच्या 4 सप्टेंबर 1994 रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख पुन:मुद्रित करीत आहोत.  हा लेख मुद्दाम वाचकांच्या भेटीला आणावासा वाटला. त्यातील घटनांचे संदर्भ कदाचित वाचकांना कालबाह्य वाटतील. पण देशात आजही हिजाब-आग्रह,  ’काश्मिर फाईल्स’ चित्रपट …

Read More »

अंगार आणि भंगार

एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसमोर दोस्तीचा हात पुढे केला आणि नव्याच वादाला तोंड फुटले. महाविकास आघाडीत सामील होण्याच्या एमआयएमच्या ऑफरमुळे शिवसेनेच्या प्रतिमेला तडा जायचा तो गेलाच. पूर्वीच्या काळी एमआयएमची अशी हिंमत तरी झाली असती का, या एकाच प्रश्नाचे उत्तर शिवसेनेच्या नेत्यांनी स्वत:लाच प्रामाणिकपणे द्यावे. अंगार कोण आणि भंगार …

Read More »

सामाजिक संघटनांनी शासन व लाभार्थ्यांमधील दुवा बनावा

विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती अध्यक्ष भिकू इदाते यांचे आवाहन अलिबाग ः रामप्रहर वृत्त केंद्र स्तरावरील विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष भिकू रामजी इदाते हे दि. 16 व 17 मार्च दरम्यान रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. गुरुवारी (दि. 17) जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागातील अधिकारी व विविध …

Read More »

माणगाव कुणबी समाज मंडळातर्फे संत तुकाराम बीज

माणगाव ः प्रतिनिधी सालाबादप्रमाणे माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळातर्फे हभप जयराम खाडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज बीज व सत्कार सोहळा रविवारी (दि. 20) तालुका कुणबी विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला. या दिवशी सकाळी हभप गुगले महाराज निळगुण यांच्या हस्ते मूर्तीचे …

Read More »

खोपोलीत रक्तदान शिबिर उत्साहात

खोपोली : वार्ताहर वासुदेव सेवा मंडळ तसेच स्वराज्य मित्रमंडळ, खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात खोपोलीतील 37 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. खोपोली शहरातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या वासुदेव सेवामंडळ तसेच मोगलवाडी येथील स्वराज्य मित्र मंडळ यांच्या वतीने किशोर ओसवल यांच्या निवासस्थानी समर्पण रक्तपेढी मुंबई यांच्या …

Read More »

विघवली हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना निरोप

माणगाव ः प्रतिनिधी तालुक्यातील विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विघवली हायस्कूलमध्ये इ.10 वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व सत्कार समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विघवली विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम यांनी भूषविले. या कार्यक्रमास संस्थेचे शाळेचे मुख्याध्यापक पारकर, संस्थचे सहकार्यवाह दिलीप उभारे, संस्थेचे खजिनदार विनायक …

Read More »

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

पोलीस प्रशासनाचा ढिसाळ कारभार; प्रवाशांना मनस्ताप महाड ः प्रतिनिधी सलग 3 दिवसांच्या सुट्ट्या आणि चवदारतळे वर्धापनदिनासाठी आलेले भीमअनुयायी यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर नातेखिंड येथे रविवारी (दि.20) सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही वाहतूक कोंडी सुटू न शकल्यामुळे कोकणात व मुंबईत जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. चवदारतळे वर्धापनदिन, शिवजयंती …

Read More »

मुरूडमधील जीर्ण इमारत पाडण्यास अखेर सुरुवात

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड नगर परिषदेने 2004 साली बांधलेली प्रियदर्शनी इमारत धोकादायक झाल्याने रविवारी (दि. 20) पाडण्यास अखेर सुरुवात करण्यात आली. या इमारतीच्या तळ मजल्यावर व्यापार्‍यांसाठी गाळे तर पहिल्या मजल्यावर विविध समाजसेवी संघटनांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. येथे व्यायामशाळासुद्धा होती. परंतु इमारतीचा स्लॅब तसेच काँक्रिटच्या असणारा स्लॅब कोसळून …

Read More »

नेरळमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला सुरुवात

कर्जत ः बातमीदार नेरळ गावामध्ये गेली 56 वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाते. यावर्षी 21 मार्च रोजी शिवजयंती उत्सव असून त्यानिमित्ताने रविवारी (दि.20)चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून जयंती उत्सवाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याची सुरुवात रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेने …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेकापची कोंडी

आगामी काळात रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्हा परिषद आपल्या हातात असावी, यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत आहेत. सध्या जिल्ह्यात कोणताही एक पक्ष स्वबळावर सत्ता काबिज करू शकत नाही, अशी राजकीय स्थिती असताना जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमत …

Read More »