Breaking News

Ramprahar Team

पनवेल जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 383 प्रकरणे निकाली

पनवेल : प्रतिनिधी पनवेल जिल्हा न्यायालयात शनिवारी (दि. 12) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये 383 प्रकरणे निकाली निघाली असून 1459 प्रकरणात पावणे पाच कोटी रुपये तडजोड वसूली झाली. पनवेल जिल्हा न्यायालायत शनिवारी राष्ट्रीय लोकअदालत भरवण्यात आली होती. तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश आर. जी. अस्मर यांचे हस्ते दीप प्रज्वलन …

Read More »

वाशिवली आदिवासीवाडीतील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली  आदीवासीवाडीच्या डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा बेवारस अड्डा उद्ध्वस्त केला आहे. यात 200 लिटर क्षमतेचे तांबड्या रंगाचे उग्र वास येत …

Read More »

होळी सणानिमित्त विशेष ट्रेन

पनवेल : रामप्रहर वृत्त होळी सणानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनांने प्रवासी संघ, पनवेलच्या लेखी निवेदन व चर्चेद्वारे प्रवासी चाकरमानी कोकणी बांधवांच्या मागणीप्रमाणे विशेष प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहेत. याची आरक्षण व्यवस्था 10 मार्चपासून सर्व संगणक आरक्षण केंद्रावर आणि या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. यामुळे नवीन मुंबई, पनवेल शहर व ग्रामीण …

Read More »

‘मविआ’ने शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली

राज्याच्या अर्थसंकल्पावरून माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांची टीका पनवेल : वार्ताहर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प  सादर केला, परंतु शेतकर्‍यांसाठी त्याच त्याच योजना नाव बदलुन पुन्हा पुन्हा समोर येत असून शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका असे माजी राज्यमंत्री तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर …

Read More »

कर्जतच्या रामदास लोभी यांचे दुबईत चित्रप्रदर्शन

कर्जत : प्रतिनिधी तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या बिड बुद्रुक गावातील उदयोन्मुख चित्रकार रामदास शंकर लोभी यांचे ’जॉय ऑफ बिईंग’ हे चित्रप्रदर्शन दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सभागृहात 19 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कला, संस्कृति आणि उत्सव यांचे महत्त्व पटवून देणारी रामदास लोभी यांची चित्रे मनाला मोहून टाकणारी आहेत. त्यांचे …

Read More »

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचा सत्कार

पाली : प्रतिनिधी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच लिव्हींग लिजंट हा पुरस्कार मिळाला तसेच डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना डिलिट पदवी मिळाली आहे. त्याबद्दल लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. संजय सोनावणे यांनी रेवदंडा येथे जाऊन त्या दोघांचा सत्कार केला व आशीर्वाद घेतले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीदेखील लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या …

Read More »

पोलादपूरमध्ये दिशा ग्रुपच्या स्पर्धेत श्रुती गोळे, प्रेमा मेस्त्री अव्वल

पोलादपूर : प्रतिनिधी येथील दिशा सांस्कृतिक ग्रुपतर्फे गुरूवारी सायंकाळी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत श्रुती गोळे हिने मिस पोलादपूर तर प्रेमा मेस्त्री यांनी मिसेस पोलादपूर किताब पटकावला. स्पर्धेच्या सुरूवातीस राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धेतील रॅम्पवॉकमध्ये सहभागी स्पर्धकांनी विविध आकर्षक पेहेरावांसह पदलालित्य दाखविले. …

Read More »

महाड तहसील कार्यालयाला वॉटर कुलर भेट

महाड : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी याकरिता अंजुमन दर्द मंदाने या सामाजिक संस्थेने वॉटरकुलर भेट दिला आहे. महापुरामध्ये महाडमधील विविध शासकीय कार्यालयांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयात  पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली होती. महाडमधील अंजुमन दर्द मंदाने या सामाजिक संस्थेतर्फे तहसील कार्यालयाच्या आवारात वॉटरकुलर …

Read More »

बोरघाटात कुरियर गाडीला आग

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर खोपोली एक्झिट दरम्यान मुंबईला जाणार्‍या कुरियर गाडीला शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी आग लागली. आगीचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस, आयबी यंत्रणा, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

Read More »

माथेरान भाजपतर्फे नेत्रतपासणी शिबिर

176 लोकांनी घेतला लाभ कर्जत : बातमीदार माथेरान शहर भाजप आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रांगोली हॉटेलमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 176 लोकांनी घेतला. माथेरानमधील रांगोली हॉटेलचे संचालक डोरीक नथवाणी यांच्या हस्ते या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »