पनवेल : वार्ताहर तळोजा रेल्वे फाटकातील पादचारी भुयारी मार्गातील दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावे लागत आहेत. दरम्यान, तळोजा येथील भुयारी पादचारी मार्गातील विद्युत दिवे बंद असल्याने रात्री मार्गक्रमण करताना अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे बंद दिवे सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. …
Read More »भाजप युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
पनवेल : वार्ताहर भाजप युवा मोर्चा महापालिका सरचिटणीस केदार भगत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. 1000 गोरगरिबांना अन्नदान, रस्त्यावरील गरिबांना ब्लँकेटचे वाटप असे विविध उपक्रम या वेळी राबविण्यात आले. केदार भगत यांनी कोरोना काळात अन्नधान्य वाटप, एन 95चे मास्क, रोग प्रतिकारक शक्तीच्या अर्सेनिक 30च्या गोळ्यांचे वाटप, …
Read More »तात्पुरते 837 आरोग्यसेवक कार्यमुक्त
नवी मुंबई महापालिकेकडून भरती प्रक्रियाही रद्द नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची तिसरी लाट जेवढ्या वेगाने पसरली तेवढ्याच वेगाने नियंत्रणात आली आहे. शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालिका प्रशासनाने तात्पुरत्या आरोग्यसेवकांचा भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि. 1) 837 जणांना कार्यमुक्त करण्यात आले असून राबवण्यात येणारी भरती …
Read More »भविष्यवेधी अर्थसंकल्प
या अर्थसंकल्पाला भविष्यवेधी अशासाठी म्हटले पहिजे की यंदा प्रथमच रिझर्व्ह बँकेतर्फे डिजिटल चलन बाजारात आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच क्रिप्टो करन्सीबाबतही केंद्र सरकारने 30 टक्के कर आकारण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. करचुकवेगिरीच्या प्रकरणात छापा मारल्यास संपूर्ण संपत्तीच जप्त करण्याची कायद्यात तरतूद करण्यात येईल असेही अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. ही सारी …
Read More »खोपोली सुभाषनगर रस्त्याच्या नामकरणासाठी ग्रामस्थ आक्रमक
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मास्को गेट ते सुभाषनगर या मार्गाला तसेच चौकाला स्वर्गीय सखाराम जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुभाषनगर ग्रामस्थांनी खोपोली नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मस्को गेट ते सुभाषनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी …
Read More »‘मविआ’ सरकारने रायगडातील मच्छीमारांच्या तोंडाला पुसली पाने
डिझेल परतावा रक्कम कमी मिळाल्याने सोसायट्यांची नाराजी मुरूड : प्रतिनिधी डिझेल परताव्याची 48 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थकीत असताना फक्त दोन कोटी देण्याचे परिपत्रक काढून राज्य सरकारने रायगड जिल्ह्यातील मच्छिमार सोसायट्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे मच्छिमार संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी परतावा रक्कम मोठ्या स्वरूपात …
Read More »हळदी-कुंकू समारंभात कोरोनाचे वाण
पेणमधील प्रकार, आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पेण ः रामप्रहर वृत्त कोरोना ससंर्गामुळे राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घातली आहेत. असे असतानाही पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भरविलेल्या हळदी-कुंकू समारंभात नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. पेण शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झालेल्या …
Read More »सुधागड तालुकास्तरीय स्पर्धांमध्ये नेणवली शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश
पाली : प्रतिनिधी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून सुधागड तहसील कार्यालय आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले होते. त्यात नेणवली येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस पारितोषिके पटकावली. मतदार दिनाचे औचित्य साधून तहसीलदार दिलीप रायण्णावार व गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास यांच्या मार्गदर्शनाखाली पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी …
Read More »मुरूडमध्ये जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात
मुरूड : प्रतिनिधी रायगड प्रेस क्लब व तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुरूडमध्ये सोमवारी (दि. 31) जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. सकाळी शहरातील आझाद चौकात नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मेघराज जाधव यांनी जंजिरा मुक्ती संग्रामविषयी माहिती …
Read More »अखेर खोपोली पालिका प्रशासनाला आली जाग!
खोपोली : प्रतिनिधी नगरपालिका हद्दीतील अनेक मोक्याच्या ठिकाणी जागा अडवून व्यवसाय करणार्या हातगाडीवाल्यांविरोधात खोपोली पालिकेने पोलीस बंदोबस्तात मोहीम उघडली तरी कायद्याचा धाक नसल्याने ही कारवाई ‘फुसका बार‘ ठरत आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेत आर. डी. कॉम्प्लेक्ससमोर, त्याचप्रमाणे दीपक चौकात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे फळ आणि भाज्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय केला जातो. काही …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper