अंडर 19 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविले अँटिग्वा ः वृत्तसंस्था आयसीसी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवत फायनलमध्ये धडक दिली आहे. अँटिग्वा येथील कूलिज क्रिकेट मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारताने 96 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सुरुवातीच्या पडझडीनंतर कप्तान …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात जागतिक पाणथळ दिवस साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पाणथळ दिनानिमित्त बुधवारी (दि. 2) वनपस्ती शास्त्र विभाग ,नेचर क्लब आणि आयक्यूएससीतर्फे शाश्वत भविष्यासाठी ओलसर जमीन या विषयावर आभासी व्याख्यान आयेजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ए.एस.पी महाविद्यालय, देवरूख रत्नागिरी येथील वनस्पती शास्त्र …
Read More »केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपचे नेते गावोगाव पोहचविणार
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 2) देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या एक लाख 80 हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला. महाराष्ट्र भाजपचे पदाधिकारी गावोगाव हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …
Read More »‘फ्रेंड्स ऑफ नेचर’कडून वृक्षसंवर्धनाचा संकल्प
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील मोहो-शिवकर-चिखले डोंगरावर असणार्या शिव भोलेनाथ मंदिर परिसरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा ध्यास फ्रेंड्स ऑफ नेचर या ग्रुपने घेतला आहे. सध्याची तरुणाई व्यसनाधिनतेकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे पहावयास मिळते, मात्र याला अपवाद ठरत फ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुप पनवेलने कोणत्याही शासकीय निधी आणि मदतीविना 208 वृक्षांचे रोपण …
Read More »पिरकोनमधील स्मशान घाटाची डागडुजी
‘मैत्री कट्टा’तर्फे श्रमदान व स्वखर्चातून कार्य उरण : बातमीदार उरण तालुक्यातील पिरकोन गावातील फणसवाडी सेक्टर 11 येथील फणसवाडी मैत्री कट्टाच्या सर्व मित्र मंडळींच्या श्रमदानातून आणि स्वखर्चातून पिरकोन गावातील वैकुंठघाट (स्मशान घाट) डागडुजी करण्यात आली. या घाटावरच्या चित्ता पेटवयाच्या पोलादी खांबांच्या खालच्या ढासळलेल्या अवस्थेतील पिलर्स आरसीसी काँक्रीटचे बांधकाम करून त्याची डागडुजी …
Read More »तळोजा भुयारी मार्गातील बंद दिवे सुरू करण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर तळोजा रेल्वे फाटकातील पादचारी भुयारी मार्गातील दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडावे लागत आहेत. दरम्यान, तळोजा येथील भुयारी पादचारी मार्गातील विद्युत दिवे बंद असल्याने रात्री मार्गक्रमण करताना अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे बंद दिवे सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. …
Read More »भाजप युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
पनवेल : वार्ताहर भाजप युवा मोर्चा महापालिका सरचिटणीस केदार भगत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला. 1000 गोरगरिबांना अन्नदान, रस्त्यावरील गरिबांना ब्लँकेटचे वाटप असे विविध उपक्रम या वेळी राबविण्यात आले. केदार भगत यांनी कोरोना काळात अन्नधान्य वाटप, एन 95चे मास्क, रोग प्रतिकारक शक्तीच्या अर्सेनिक 30च्या गोळ्यांचे वाटप, …
Read More »तात्पुरते 837 आरोग्यसेवक कार्यमुक्त
नवी मुंबई महापालिकेकडून भरती प्रक्रियाही रद्द नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची तिसरी लाट जेवढ्या वेगाने पसरली तेवढ्याच वेगाने नियंत्रणात आली आहे. शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालिका प्रशासनाने तात्पुरत्या आरोग्यसेवकांचा भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि. 1) 837 जणांना कार्यमुक्त करण्यात आले असून राबवण्यात येणारी भरती …
Read More »भविष्यवेधी अर्थसंकल्प
या अर्थसंकल्पाला भविष्यवेधी अशासाठी म्हटले पहिजे की यंदा प्रथमच रिझर्व्ह बँकेतर्फे डिजिटल चलन बाजारात आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच क्रिप्टो करन्सीबाबतही केंद्र सरकारने 30 टक्के कर आकारण्याचा मनसुबा जाहीर केला आहे. करचुकवेगिरीच्या प्रकरणात छापा मारल्यास संपूर्ण संपत्तीच जप्त करण्याची कायद्यात तरतूद करण्यात येईल असेही अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. ही सारी …
Read More »खोपोली सुभाषनगर रस्त्याच्या नामकरणासाठी ग्रामस्थ आक्रमक
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मास्को गेट ते सुभाषनगर या मार्गाला तसेच चौकाला स्वर्गीय सखाराम जाधव यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुभाषनगर ग्रामस्थांनी खोपोली नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मस्को गेट ते सुभाषनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच या रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष सखाराम जाधव यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper