बालदिनी सुरू झाला उपक्रम कर्जत : बातमीदार आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबं वीटभट्टी कामगार म्हणून स्थलांतरण करतात, त्यामुळे त्या आदिवासी कातकरी यांच्या मुलांचे शिक्षण थांबते. अशा मुलांनी शिकले पाहिजे यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका भगवान जामघरे ही तरुणी त्या मुलांसाठी शाळा सुरू करून शिकवणी वर्ग घेणार आहे. आज बालदिनी वीटभट्टीवरील …
Read More »नेरळमधील चौकांना फलक आणि वाहनांचा गराडा
कर्जत : बातमीदार नेरळ गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्याचा प्रयत्य नेरळ गावातील विविध चौकांना देण्यात आलेल्या नावांवरून येतो. नेरळ ग्रामपंचायतीने त्या सर्व महापुरुष, हुतात्मे, संत यांची नावे या चौकांना दिली आहेत आणि त्याच नेरळ ग्रामपंचायतीला आता त्याचा विसर पडला आहे. दरम्यान, नेरळ गावातील बहुतेक चौकांना जाहिरात फलक आणि वाहनांचा …
Read More »एसटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पाठिंबा
पाली : प्रतिनिधी एसटी महामंडळ बरखास्त करून राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संप व आंदोलनाला भ्रष्टाचार निर्मूलन समिती रायगड यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला. तसेच सुधागड पालीचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्यामार्फत मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत …
Read More »मिनीट्रेनला खासगीकरणाचा धोका
मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड कडून नेरळ- माथेरान-नेरळ मिनीट्रेन या जागतिक वारसा मिळावा म्हणून 2012 पासून युनोस्कोचा वारसा मिळविण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनला जागतिक वारसा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र मिनीट्रेनची ओळख असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन ची प्रवासी वाहतूक सुरूच नाही. दुसरीकडे जागतिक वारसा बनण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनची इंजिने आज प्रवासी वाहतुकीसाठी …
Read More »अशांत महाराष्ट्र
पुरोगामी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र सध्या अनेक कारणांनी धूमसतोय. आधीच राज्यात शेतकर्यांचे प्रश्न, एसटी कर्मचार्यांचा संप यावर मार्ग काढण्यात आघाडी सरकारला अपयश आल्याने अस्वस्थता पसरलेली असताना आता हिंसाचाराचा वणवा पेटलाय. निमित्त झाले ते त्रिपुरातील कथित घटनेचे. यावरून महाराष्ट्रातील अनेक शहरांत मोर्चे निघाले आणि जे व्हायला नको होते तेच झाले. देशाच्या …
Read More »’कमळ’चा ग्राहक दिन साजरा
अलिबाग : प्रतिनिधी कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., अलिबाग या संस्थेच्या वतीने नुकताच ग्राहक दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे कामकाज 13 शाखांमार्फत चालते, संस्थेच्या सर्व शाखांमधून येणार्या ग्राहकांसोबत हितगुज करावे, त्यांना संस्थेकडून भविष्यात हव्या असणार्या वा अपेक्षित असणार्या सेवा याबाबत चर्चा व्हावी हाच हेतू ठेवून संस्थेने गुरुवारी (दि. 11) हा …
Read More »महापारेषणला पुरस्कार जाहीर
25 नोव्हेंबरला महाबलीपूरममध्ये होणार प्रदान मुंबई : प्रतिनिधी नवी दिल्ली येथील ग्रीनटेक फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा आठवा सीएसआर इंडिया पुरस्कार- 2021 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) मिळाला आहे. कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल महापारेषणला कोरोना योध्दा या गटात हा पुरस्कार मिळाला. त्यामुळे महापारेषणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला …
Read More »सिडको करणार गावांचा विकास आराखडा
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने खोपटा नव नगर अधिसूचित क्षेत्रासाठी 32 गावे (रायगड जिल्ह्याच्या पनवेल तहसीलची सात गावे आणि उरण तहसीलची 25 गावे) विकसित करण्यासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार सर्वसमावेशक व उत्तम दर्जाच्या सोयी सुविधांनी परिपूर्ण विकास करण्यासाठी खोपटा नव नगर …
Read More »पनवेलमध्ये ’हर घर दस्तक’अभियान कोरोना लसीकरणासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी ’हर घर दस्तक’ अभियानास सुरूवात करण्यात आली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने 9 ऑक्टोबरपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. पालिका क्षेत्रात मिशन कवच कुंडल अंतर्गत पहिल्या डोसचा लक्षांक …
Read More »भाजप मुंबईत शिवसेनेला धूळ चारणार
भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचा महापालिका निवडणूक जिंकण्याचा विश्वास मुंबई : प्रतिनिधी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारण्यात भाजप यशस्वी होईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी व्यक्त केला. मुंबईत मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत सदस्यांना नड्डा यांनी मार्गदर्शन केले. यंदा मुंबई महापालिका निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper