Breaking News

Ramprahar Team

ड्रेनेजच्या सभोवताली पडलेला खड्डा बुजविला

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला पडलेला खड्डा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेने बुजविण्यात आला. स्वामी नित्यानंद मार्ग या मुख्य रस्त्यावरील तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला असलेले पेव्हर ब्लॉक दबले गेल्यामूळे खड्डा पडला होता. …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात विशेष लसीकरण मोहीम

खारघर : रामप्रहर वृत्त कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता बंद झालेली महाविद्यालये पुन्हा सुरळीत सुरू झालेली आहेत. त्या दृष्टीने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशेष कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिर शनिवारी (दि. 30) यशस्वीपणे झाले. या शिबिराचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. निलेश कोळी …

Read More »

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात येणार्या अभ्यागतांसाठी नियमावली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात येणार्‍या अभ्यागतांना भेटण्याच्या वेळांत प्रशासनाने बदल केले आहेत. नव्या नियमाप्रमाणे दुपारी 3 ते 6 या वेळांत भेटता येणार आहे. याची गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू झाली, मात्र नागरिकांनी याला विरोध दर्शवला. नवी मुंबई महापालिकेने दोन दिवसांपूर्वी कोरोना आणि सुरक्षिततेकरिता नवीन नियमावली जाहीर केली …

Read More »

डॉक्टरकडून बाळाची विक्री

कामोठ्यातील संतापजनक घटना पनवेल : वार्ताहर लहान बाळाची चार लाखांत विक्री करणार्‍या डॉक्टरला कामोठे पोलिसांनी शुक्रवारी (दि. 29) कामोठे वसाहतीमधून रंगेहात अटक केले आहे. त्यासोबत बाळाला विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलांनादेखील पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना कामोठे वसाहतीमधील असून डॉक्टरचे या वसाहतीमध्ये स्वतःचे क्लीनिक आहे. डॉ. पंकज गोपालराव पाटील (वय …

Read More »

बांगलादेश वर्ल्डकपमधून आऊट

शारजा ः वृत्तसंस्था शारजाहच्या मैदानावर रंगेलल्या टी-20 वर्ल्डकपच्या चित्तथरारक लढतीत वेस्ट इंडिजने जायंट किलर म्हणून ओळखल्या जाणार्‍या बांगलादेशला तीन धावांनी पराभूत केले. त्यामुळे बांगलादेशचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी असलेल्या या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. खराब फॉर्मशी झगडणार्‍या विंडीजने 20 …

Read More »

केवनाळे येथेही दरडीखाली मृत झालेल्या

व्यक्तींच्या नातेवाईकावर ग्रामस्थांकडून हल्ला पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील केवनाळे येथे दरडीखाली आई, वडील गमावलेल्या व्यक्तीवर 10 ऑक्टोबर 2021 रोजी दोघा जणांनी हल्ला केला होता. तत्पूर्वी, चार मृतांच्या नातेवाईक असलेल्या तरुणावर तीन जणांनी 26 सप्टेंबर 2021 रोजी हल्ला केला होता. तळिये येथील दरडीखाली आई, वडिलांचा मृत्यू झालेल्या प्रदीप कोंडाळकर (सध्या रा. …

Read More »

मुरूडमध्ये दुसर्या दिवशीही एसटी बंद

मुरूड : प्रतिनिधी प्रलंबीत मागण्यांची तड लावण्यासाठी एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने गुरुवारपासून बेमुदत एसटी बंद आंदोलन सुरु केले आहे. त्यात मुरूड आगारातील  187 कर्मचारी सहभागी झाले असून, त्यांनी आज (दि. 29) दुसर्‍या दिवशीही आंदोलन सुरू ठेवले आहे.   दरम्यान, दोन दिवस एसटी बंद असल्याने प्रवाशांचे व विद्यार्थ्याचे प्रचंड हाल …

Read More »

बोर्ले गावातील अपरिहत बालकाची हत्या; आरोपीला अटक

माणगाव,  धाटाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोर्ले गावातून अपहरण केलेल्या रुद्र यादव या दोन वर्षांच्या चिमुरड्याची हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी सिल्व्हासा (गुजरात) येथून ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी संतोष अशोक यादव (वय 30, रा. बोर्ले, ता. माणगाव) याने 26 ऑक्टोबरला सायंकाळी बोर्ले गावातील सुनील यादव …

Read More »

खालापूर तहसील कर्मचारी एक, तास ठिय्या आंदोलन

खोपोली : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी    खालापूर तहसील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 29) तहसील कार्यालयाच्या आवारात एक तास ठिय्या आंदोलन केले. जुनी पेन्शन योजना, केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणारे सर्व लाभ राज्य कर्मचार्‍यांना मिळावे, पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन आलेल्या तसेच 2005 पूर्वी निवड झालेल्या परंतु उशिरा नियुक्ती मिळालेल्या कर्मचार्‍यांना …

Read More »

माणगावात राज्य सरकारी कर्मचार्यांचे ठिय्या आंदोलन

माणगाव : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करा, प्रमुख मागणीकडे  राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. 29)  सकाळी माणगावमधील सरकारी कर्मचार्‍यांनी येथील तहसील कार्यालयासमोर एक तासाचे ठिय्या आंदोलन करून निवासी नायब तहसीलदार बी. वाय. भाबड यांना निवेदन दिले. राज्य शासनाने 1982 ची जुनी पेन्शन योजना रद्द करून 1 नोव्हेंबर 2005 …

Read More »