Breaking News

Ramprahar Team

टेलिकॉम कंपन्या व बँकांच्या ‘बूस्टरडोस’मुळे बाजाराची साठी

टेलिकॉम कंपन्यांसाठीचं पॅकेज कंपन्यांचं पुनरुज्जीवन करणार काय? आणि बहुचर्चित बॅड बँक बँकांसाठी गुड ठरणार की नाही याचा घेतलेला आढावा. या लेखात आपण प्रमुख दोन गोष्टींविषयी जाणून घेऊ ज्यामुळं मागील आठवड्यात बाजारात उत्साहाचं वातावरण होतं. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सिनिअर सिटीझन होण्याच्या बेतात (60 हजार) आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक …

Read More »

बँक ऑफ इंडियातर्फे हिंदी दिवस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडिया, प्रशिक्षण संस्थान, नवी मुंबई, येथे दरवर्षी प्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानमध्ये स्टाफ सदस्यांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्यात आला. प्रशिक्षण संस्थानाचे प्राचार्य विवेक प्रभु …

Read More »

कळंबोली भाजपतर्फे डॉक्टर, कर्मचार्यांचा सन्मान

कळंबोली : रामप्रहर वृत्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवासप्ताहातंर्गत भाजप कळंबोली मंडलच्या वतीने काळभैरव हॉलमधील लसीकरण केंद्रातील डॉक्टर व कर्मचार्‍यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी सेवा कार्य प्रमुख केशव यादव, कळंबोली भाजप अध्यक्ष रविशेठ पाटील, नगरसेवक अमर पाटील, बबन मुकादम, जिल्हा सचिव अशोक मोटे, सरचिटणीस …

Read More »

पनवेलमध्ये फूड व्हॅनचे उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी कोरोना काळामध्ये तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक तरुण-तरुणी प्रयत्न करीत आहेत. याच उद्देशाने राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी यांनी तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने फॅमिली अड्डा ऑन व्हील तंदूर अ‍ॅण्ड चायनीज फूड व्हॅन पनवेलमध्ये सुरू …

Read More »

कोरोना लसीकरणांसाठी सोसायट्यांना आवाहन

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका काही दिवसांपासून लसीकरणांवर भर देत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी पालिका क्षेत्रातील सोसायट्यांनी पुढाकार घेऊन आपल्या सोसायटीतील नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख केले आहे. शनिवारी झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत लसीकरणाबरोबरच पालिका क्षेत्रात सुरू …

Read More »

डेंग्यू नियंत्रणासाठी नवी मुंबई पालिका सज्ज

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सध्या एमएमआर क्षेत्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत असून या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांना योग्य दिशेने गती देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विशेष बैठक आयोजित करीत महापालिका क्षेत्रातील डेंग्यूच्या स्थितीचा नागरी आरोग्य केंद्रनिहाय सविस्तर आढावा घेतला व डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना अ‍ॅक्शन …

Read More »

खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप

खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, खोपोली भाजप युवा मोर्चाच्या वतीने शालोम एज्युकेशन या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि. 17) खाऊचे वाटप तसेच भेटवस्तू देण्यात आल्या.  भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, युवा मोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुळकर, उपाध्यक्ष पूनित तन्ना, सरचिटणीस विनायक माडपे, कार्यकर्ते सिद्धेश पाटील, …

Read More »

महाडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला अपघात

नऊ प्रवासी जखमी महाड : प्रतिनिधी तालुक्यातील विन्हेरे-तुळशीखिंड मार्गावरील कुर्ला गावाजवळ महाड दिशेने येणारा टेम्पो ट्रॅव्हलर बस रस्त्याकडेला पलटी झाली. या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले. खेडकडून मुंबईच्या दिशेने निघालेली टेम्पो ट्रॅव्हलर बस (एमएच-04, जेयु-6484) कुर्ला गावाजवळ आली असता एक उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्याकडेला पलटी झाली. या …

Read More »

रायगडात मुबलक पाणीसाठा

26 धरणे ओव्हरफ्लो, दोन धरणांत 90 टक्के पाणीसाठा रोहे ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 26 धरणे तुडूंब भरून वाहू लागली आहेत. तर उर्वरित दोन धरणात 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला असून ही दोन्ही धरणे भरून वाहण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे …

Read More »

सुधागडातील गावठी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्याच्या जांभुळपाडा पोलीस दुरक्षेत्र हद्दीत पेंढारमाळ ठाकूरवाडी डोंगर परिसरात सुरू असलेली गावठी दारूची हातभट्टी गुरुवारी (दि. 16) पोलिसांनी उद्ध्वस्त केली. याबरोबर सापडलेला मुद्देमालदेखील नष्ट करण्यात आला. पाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार मनोहर म्हात्रे, पोलीस नाईक कांचन भोईर व शिपाई रामसेवक …

Read More »