मुरूड : प्रतिनिधी रोह्यातील दीपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्थेने जिल्हा शासकीय रक्तकेंद्राच्या सहकार्याने चणेरे येथील कुणबी समाज हॉलमध्ये नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात 41 जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन रोहा पंचायत समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ यांनी केले. या वेळी चणेरा सरपंच प्रसन्ना सिनकर, संस्थेचे अध्यक्ष संतोष भोईर, तसेच …
Read More »कर्जतमध्ये कोरोना लसीकरण शिबिर
कर्जत : बातमीदार येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने कर्जत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री कपालेश्वर मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या शिबिरात 201 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या वेळी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. या लसीकरण शिबिरात उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली रूपेश लाड, पूनम जगडुळे, रूपाली कांबळे, शाहीन …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त रोह्यात विविध सामाजिक उपक्रम
धाटाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 17) रोठ बुद्रुक (ता. रोहा)ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. तर रोहा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून फळे वाटप करण्यात आले. तसेच कोलाड येथील कुष्ठरोगी वसाहतीला ऑक्सिमीटर भेट देण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या …
Read More »वावड्यांचा धुरळा
राजकारणामध्ये वावड्यांचे पतंग उडायला लागले की थांबता थांबत नाहीत. कुणाची पतंग किती उंच जाते आणि अन्य किती पतंगांचा मांजा काटते याचीच उत्सुकता लागून राहते. समाजमाध्यमे शिरजोर झाल्यानंतर असल्या प्रकारच्या राजकीय वावड्या हा मनोरंजनाचाच भाग झालेला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकारणाकडे मनोरंजन अथवा विरंगुळ्याचे साधन म्हणून कुणी पाहात नव्हते. आता मात्र परिस्थिती …
Read More »किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे
गुरु चरण नित लाभो प्रभो, मांगत एकहि दान तुम्हीसो प्रभो नाद समिंदर अतहि कठिण, पार उतरु कैसे गुरु बिन प्रभो किराणा घराण्याच्या अष्टपैलू गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्याबद्दल लिहिणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती केल्यासारखंच आहे. तरीही एक शिष्या म्हणून मी माझ्या गुरुंबद्दलच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. विज्ञान आणि कायदा …
Read More »पनवेलमध्ये वकिलांनी घेतला ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व पनवेल बारचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांच्या मागणीवरून गुरुवारी (दि. 16) कोविशिल्डचा दुसरा डोस वकिलांना देण्यात आला. या वेळी बार असोसिएशनच्या 175 वकिलांनी त्याचा लाभ घेतला. पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, उपाध्यक्ष अॅड. जे. …
Read More »…तर ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक ठरेल -चंद्रकांत पाटील
पुणे : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा अध्यादेश न्यायालयात टिकावा अशी आपली इच्छा आहे, पण हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते देहू येथे पत्रकारांशी बोलत होते. …
Read More »आता तरी जागे व्हा!
संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. या घटनेच्या …
Read More »आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम
नवी मुंबई :प्रतिनिधी विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात भाजप पदाधिकार्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. राज्यातील कोकण, कोल्हापूर, सोलापूर पश्चिम व उत्तर महाराष्ट्र परिसरातील पदाधिकार्यांनानी विविध समाजहिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, चक्रीवादळात कोळी बांधवांना मदतीचा हात देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात …
Read More »बँक ऑफ इंडियातर्फे हिंदी दिवस
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडियाच्या नवी मुंबई विभागीय कार्यालयात दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्यास सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. मंगळवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. विभागीय प्रमुख अनिल जाधव व समस्त कर्मचार्यांच्या उपस्थितीत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper