लाइफ लाइन हॉस्पिटलला तत्काळ ऑक्सिजन पुरवठा पनवेल ः वार्ताहर पनवेल येथील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा अचानकपणे कमी झाला होता. अशा वेळी नवी मुंबई गुन्हे शाखेची पोलीस यंत्रणा त्यांच्या मदतीला धावून आली. काही तासांतच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत केल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहेत. पनवेलच्या लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये …
Read More »भारताच्या सात महिला हॉकीपटू कोरोना पॉझिटिव्ह
बंगळुरू ः वृत्तसंस्था भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिच्यासह सात खेळाडू तसेच दोन साहाय्यक कर्मचार्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. बंगळुरू येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये (साइ) सराव शिबिराला सुरुवात होण्याआधीच या सर्वांचे करोना अहवाल सकारात्मक आले आहेत. या खेळाडूंमध्ये रामपाल, रविता पुनिया, शर्मिला देवी, रजनी, नवज्योत कौर, …
Read More »मायदेशात परतण्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय करा
मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलच्या 14व्या हंगामात काही परदेशी खेळाडूंनी स्पर्धेच्या मधूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यात अधिकतर खेळाडू ऑस्ट्रेलियाचे आहेत. आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार्या ऑस्ट्रेलियन खेळाडूने आपल्या देशातील बोर्डाला चार्टर्ड प्लेनची सोय करण्याची मागणी केली आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणार्या ख्रिस लीन या खेळाडूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला विनंती केली आहे की, …
Read More »बार्सिलोना ओपनचा राफेल मानकरी
बार्सिलोना ः वृत्तसंस्था जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने स्टीफनोस सितसिपासला 6-4, 6-7(6), 7-5 असे पराभूत करीत 12व्यांदा बार्सिलोना ओपन स्पर्धा जिंकली आहे. नदालने इल्या इवाश्का, केई निशिकोरी, कॅमेरून नॉरी आणि पाब्लो कॅरेनो बुस्टा अगुट यांचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वी नदालने 2018मध्ये बार्सिलोना ओपनच्या अंतिम …
Read More »विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत दीपिका, अतानूला सुवर्णपदक
ग्वातेमाला सिटी ः वृत्तसंस्था भारताचे अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतानू दास यांनी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करीत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई केली. भारताने तीन सुवर्ण आणि एक कांस्यपदकासह आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. गतजागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या दीपिकाने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या कारकीर्दीतील तिसरे सुवर्णपदक प्राप्त केले. दीपिकाचा …
Read More »कोलकाताची पंजाबवर मात
चार पराभवानंतर साकारला विजय अहमदाबाद ः वृत्तसंस्था येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्जवर पाच गडी राखून विजय मिळवला. कोलकाताने आधी भेदक गोलंदाजी करून पंजाबला 20 षटकांत नऊ बाद 123 धावांमध्ये रोखले. त्यानंतर 17व्या षटकात विजय मिळवला. कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनला सामनावीर पुरस्काराने …
Read More »एका सुरात तरी बोला
कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात त्सुनामीसारखी आली तेव्हा या सरकारचे काय चालले होते? शंभर कोटीच्या वसुलीचे प्रकार घडू लागले होते. भ्रष्ट वर्तनापायी दोन-दोन मंत्र्यांना राजीनामे देण्याची नामुष्की स्वीकारावी लागली. तरीही हे सरकार अजुनही खुर्चीला घट्ट चिकटून आहे. याला काय म्हणायचे? कोरोनाच्या हाहाकारामध्ये महाराष्ट्र भरडून निघत असताना मदतीला धावले ते पंतप्रधान नरेंद्र …
Read More »उरणमध्ये गरजू मजुरांना अन्नधान्याचे वाटप
उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात उपाशी राहू नये या दृष्टीकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था कोप्रोलीच्या माध्यमातून उरण तालुक्यातील गरजू मजूरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. उरण-पनवेल मार्गांवर जेएनपीटी टाऊनशिप बस स्टॉप ते नवघर फाटा बस स्टॉपदरम्यान मुख्य रस्त्याला लागून असलेल्या झोपडपट्टीवासीय हे मोलमजुरी करतात. कडक निर्बंधाच्या काळात …
Read More »रेमडेसिवीर काळ्याबाजारातून खरेदी करू नका
जिल्हा इंजेक्शन, औषधे व मेडिकल मदत कक्षाचे आवाहन पनवेल : प्रतिनिधी रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, हे इंजेक्शन डॉक्टरांनी जरी लिहून दिले तरी बाहेरच्या मेडिकलमध्ये कुठेही मिळणार नाही. जिल्हाधिकार्यांनी नेमलेल्या समितीमार्फत, रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे, फक्त त्या हॉस्पिटललाच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईल, असा सरकारचा …
Read More »घरपोच मद्यविक्रीला परवानगी
पनवेल : वार्ताहर जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार नमुना एफएल-2, फॉर्म इ-2 व एफएलडब्ल्यू-2 मद्यविक्री अनुज्ञप्ती मधून घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात आलेली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper