सरपंच शैलेश माळी, उपसरपंच राजेंद्र गोंधळी यांनी स्वीकारला पदभार पनवेल ः रामप्रहर वृत्त खेरणे ग्रामपंचायतीवर गेली 25 वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व कायम होते. ते मोडीत काढत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलले असून सरपंचपदी भाजपचे शैलेश माळी विराजमान झाले आहेत. सरपंच शैलेश माळी आणि उपसरपंच राजेंद्र गोंधळी यांनी शुक्रवारी (दि. …
Read More »अलिबाग-मुरूड रस्त्याचे लवकरच मजबुतीकरण
शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांची माहिती मुरूड : प्रतिनिधी स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नामुळे अलिबाग-मुरूड रस्त्याच्या रुंदीकरण व मजबूतीकरणासाठी नाबार्डतर्फे निधी उपलब्ध झाला असून, हे काम मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी मुरूडमधील पत्रकारांना दिली. राजा …
Read More »कळंबोली शहरातील रस्ते दुरुस्तीला सुरुवात माजी नगरसेवक अमर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कळंबोली शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून ही कामे होत आहेत. सिडकोनिर्मित असलेल्या कळंबोली शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्ते डागडूजीसंदर्भात माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी सिडकोकडे सातत्याने …
Read More »डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा रस्त्यावर
पालीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात सुधागड ः रामप्रहर वृत्त पाली शहरातील कित्येक टन कचरा येथील टेंबी वसाहतीजवळील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो, मात्र येथे संरक्षक भिंत नसल्याने हा कचरा मुख्य रस्त्यावर येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगरपचायतीने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरीत आहे. डम्पिंग …
Read More »त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पनवेलमध्ये दीपोत्सव
पनवेल : वार्ताहर श्री रामेश्वर महादेव देवस्थान व जाणीव एक सामाजिक संस्था पनवेल यांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव कार्यक्रम श्री रामेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजता शहरातील श्री रामेश्वर महादेव मंदिर,वीर सावरकर चौक पनवेल येथे दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला …
Read More »किल्ले स्पर्धेत राजे शिवराय प्रतिष्ठान प्रथम
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवीन पनवेलच्या राजे शिवराय प्रतिष्ठानने …
Read More »खोपोलीत कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार
34 जणांना अटक, 72 लाखांचा मुद्देमाल जप्त खोपोली, खालापूर : प्रतिनिधी कोंबड्यांच्या पायाला धारदार हत्यार लावून त्यांची झुंज खेळवून चालणारा जुगार खोपोली पोलिसांनी छापा टाकून उघडकीस आणला असून, याप्रकरणी 34 आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून चार लाख 31 हजार 195 रुपये रोख रक्कम, 18 हजार 700 रुपयाची …
Read More »पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींमधील 32 कर्मचार्यांचे पनवेल महापालिकेत समावेशन
पनवेल ः प्रतिनिधी पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींमधील 32 कर्मचार्यांचे महानगरपालिकेच्या आस्थापनामध्ये समावेशन करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 3) घेण्यात आला. याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे 32 कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शुक्रवारी (दि. 4) या कर्मचार्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना …
Read More »थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी
पनवेल ः रामप्रहर वत्त पाऊस यंदा जास्त काळ लांबल्याने ऑक्टोबर महिना उलटल्यानंतर हवेत गारठा जाणवू लागला आहे. साधारणपणे नोव्हेंबर अखेरीस थंडी पडायला सुरुवात होते व डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका वाढू लागतो, मात्र यंदा नोव्हेंबरप्रारंभी थंडी जाणवू लागल्याने बाजारात उबदार कपडे दाखल झाले असून नागरिकांची खरेदीसाठी लगबगही सुरू झाली आहे. पनवेलच्या विविध …
Read More »घारापुरी लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
कोरोना काळानंतर स्थानिकांचे व्यवसाय पुन्हा सुरू उरण ः रामप्रहर वृत्त दोन वर्षांच्या कोरोना काळात पर्यटकच नसल्याने जागतिक ख्यातीच्या लेण्या असलेल्या घारापुरी (एलिफंटा) बेटावरील स्थानिक नागरिक व व्यवसायिक यांच्यावरही परिणाम झाला होता, मात्र सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बेटावर दररोज येणार्या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांचे व्यवसाय पूर्ववत होऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper