Breaking News

Ramprahar Team

हजारो कोंबड्यांचे प्राण वाचले

सिद्धेश्वर ग्रामपंचायत हद्दीत युद्धपातळीवर लसीकरण पाली : प्रतिनिधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सिद्धेश्वर (ता. सुधागड) ग्रामपंचायत हद्दीतील गावे व वाड्यांमधील कोंबड्या रोगामुळे मृत्यूमुखी पडत होत्या. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते. हे निदर्शनास आल्यानंतर सरपंच उमेश यादव आणि व दुग्ध व्यावसायिक दत्ता इंदुलकर यांनी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांना …

Read More »

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्पर्धा विश्व अॅकॅडमीमध्ये अभिवादन

अलिबाग : रामप्रहर वृत्त येथील नेहरू युवा केंद्र, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि रोहे येथील स्वयंसिध्दा सामाजिक विकास संस्था, तसेच स्पर्धा विश्व अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सावित्रीमाई जयंती तथा महिला मुक्तीदिन साजरा करण्यात आला. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धा विश्व अकॅडमीमध्ये उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

बेकायदेशीर वाळू उपशाने नागोठणेतील शेतकरी संतप्त

जिल्हाधिकार्‍यांचे वेधणार लक्ष नागोठणे : प्रतिनिधी अंबा नदीच्या जांभूळटेप भागातील खाडीतून बेकायदेशीररित्या वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. त्यामुळे खारबंदिस्तीला खांडी पडून खारे पाणी शेतात येते व शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थ हिराचंद गदमले, दामोदर भोईर, किरण भोईर, महादेव भोईर, लहू भोईर, केशव भोईर, कल्पेश भोईर …

Read More »

द्रुतगती महामार्गावर बसला अपघात

12 प्रवासी जखमी खालापूर, खोपोली : प्रतिनिधी ब्रेक निकामी झाल्याने एका खाजगी प्रवासी बसने रविवारी (दि. 10) पहाटे ट्रकला जोरदार धडक दिली. मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील ढेकू गावाच्या हद्दीत झालेल्या या अपघातात 12 प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार करण्यात आले. ‘वैभव ट्रॅव्हल्स‘ ची …

Read More »

सुधागडमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव

तालुक्यात सहा सक्रिय रुग्ण, प्रशासन अलर्ट पाली : प्रतिनिधी  सुधागड तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र गुरुवारी (दि. 7) चार व शनिवारी (दि. 9) कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. तालुक्यात सध्या कोरोनाचे सहा सक्रिय रुग्ण आहेत. आणि ते गृह विलगिकरणमध्ये उपचार …

Read More »

हक्काचे पाणी माथेरानकरांनाच

एमजीपीच्या कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन; बेमुदत उपोषण मागे कर्जत : बातमीदार माथेरान पाणीपुरवठा योजनेतील पाणी अन्य कोणालाही दिले जाणार नाही, असे पत्र जीवन प्राधिकरणाचे पनवेल येथील कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने मनसे पदाधिकार्‍यांनी आपले बेमुदत उपोषण तिसर्‍या दिवशी शनिवारी (दि. 9) रात्री मागे घेतले. माथेरानसाठी येथील शारलोट तलाव तसेच नेरळ कुंभे येथे उल्हास …

Read More »

कुडपण येथील अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत करणार -विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

महाड : प्रतिनिधी कुडपण येथील अपघातातील जखमींना सर्वतोपरिने मदत करण्याचे आश्वासन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर शनिवारी (दि. 9) सायंकाळी महाड येथे दिले. पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथे शुक्रवारी सायंकाळी लग्नाच्या वर्‍हाडचा टेम्पो दरीत कोसळला होता. या अपघातात तीघे ठार तर 67 जण जखमी झाले होते. त्यातील चौघा जखमींना …

Read More »

निसर्गाची अवकृपा

कोरोना महामारीतून भारत सावरत असताना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना देशातील नागरिकांना करावा लागत आहे. सध्या देशात हिवाळा सुरू असला तरी पावसाळ्याचा अनुभव येत आहे. या ‘हिवसाळ्या’चा फटका नागरिकांना विशेषकरून शेतकरी आणि मच्छीमार बांधवांना बसत असून, बदलत्या हवामानामुळे त्यांना सातत्याने आर्थिक नुकसानीची झळ सोसावी लागत आहे. महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात गेल्या काही …

Read More »

हक्काच्या जमिनीसाठी आदिवासी आक्रमक…!

वहिवाट असलेल्या जमिनी आपल्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी झगडत आहेत. शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या जमिनीची खातेफोड होऊन वारसनोंदी झाल्या नाहीत तर आदिवासी समाज आणखी आक्रमक होईल, असा इशारा आदिवासी शेतकरी परिषदेत देण्यात आला. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या वनजमिनी संबंधीत आदिवासी शेतकर्‍याच्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी …

Read More »

जेएनपीटीमध्ये वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र सुरू

उरण ः वार्ताहर भारताचे प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) पर्यावरणासंबंधी उद्दिष्ट प्राप्ती व हरित बंदर बनण्याच्या दृष्टीने पोर्ट ऑपरेशन सेंटर येथे ’सतत वातावरणीय वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र’ (सीएएक्यूएमएस) सुरू केले आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा. प्र. से.  यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी पोर्टचे …

Read More »