Breaking News

Ramprahar Team

वेश्वी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; तालुक्यात 26 जागांवर भाजपचे उमेदवार; आमदार महेश बालदींकडून अभिनंदन उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील नागाव, केगाव, म्हातवली, चाणजे, फुंडे व वेश्वी या सहा ग्रामपंचायत निवडणूक मतदान मतमोजणी सोमवारी (दि. 18) उरण नगरपरिषदेच्या महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळेत करण्यात आली. या वेळी वेश्वी ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व जागांवर …

Read More »

कर्जतमध्ये दुसरे भातखरेदी केंद्र सुरू; शेतकरी आनंदले

कर्जत ः बातमीदार नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीकडून कर्जत तालुक्यातील दुसरे भातखरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनकडून दरवर्षी भाताची हमीभावाने खरेदी केली जाते. दरम्यान, तब्बल दीड महिना उशिरा भाताची हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात झाल्याने नाराज शेतकरी आनंदले आहेत. नेरळ सोसायटीत कर्जतमधील 30 गावे आणि 11 आदिवासी वाड्यांचा …

Read More »

पहिल्या दिवशी 268 जणांचे लसीकरण

अलिबाग ः प्रतिनिधी केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे शनिवारी (दि. 16) जिल्ह्यातील शासकीय जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासह लोकप्रतिनिधी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचून कोविशिल्ड …

Read More »

बोरघाटात कंटेनरच्या केबिनला लागली आग

खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अमृतांजन ब्रिजच्या जवळपास रविवारी (दि. 17) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कंटेनरच्या केबिनला आग लागल्याची घटना घडली आहे. किमी 46 पुणे मार्गिकेवर अचानक लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठे नुकसान झाले आहे. चालक व त्याच्या सहकार्‍याने प्रसंगावधान राखून बाहेर उड्या मारल्याने दोघांचे जीव …

Read More »

रस्ता सुरक्षा अभियानाचे आज अलिबागेत उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधी पेण उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व रायगड जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. 18) सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालयातील जंजिरा सभागृहात 32व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निधी चौधरी, तर प्रमुख उपस्थिती जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, …

Read More »

स्वच्छतागृहावर चालविला हातोडा

नेरळ ग्रामपंचायतीचा अजब कारभार कर्जत ः बातमीदार 50 वर्षे जुने आणि बाजारपेठेत असलेले एकमेव स्वच्छतागृह नेरळ ग्रामपंचायतीने तोडायला घेतल्याने नेरळकर हैराण झाले आहेत. परिणामी नेरळ ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराला आता नेरळकर पुरते वैतागले आहेत.पनेरळ मुख्य बाजारपेठेत असलेल्या शिवसेना शाखेजवळील स्वच्छतागृह गेली अर्धा दशकाहून अधिक काळापूर्वी बांधण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात नेरळ …

Read More »

खारघरमध्ये कृत्रिम फुप्फुसांचे महापौरांच्या हस्ते अनावरण

खारघर : प्रतिनिधी खारघर शहरातील वातावरण फाऊंडेशनतर्फे खारघर सेकटर 7 येथील उत्सव चौक येथे श्वास घेणार्‍या कृत्रिम फुप्फुसांची (लंग्जबिलबोर्ड)चे पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शनिवारी (दि. 16) अनावरण करण्यात आले. नुकतेच हवा प्रदूषणासंदर्भात वातावरण फाऊंडेशनने संशोधनपर अभ्यास केला. या संशोधन अभ्यासाअंती समोर आलेल्या माहितीनुसार खारघर-तळोजा-पनवेल येथील रहिवासी …

Read More »

शिक्षकांकडून डॉक्टरांचा सत्कार

चिमुकल्यांनी दिले संदेशात्मक पत्र खारघर : प्रतिनिधी सैन्य दिनाच्या औचित्यावर पनवेलमधील एमएनआर शाळेच्या शिक्षकांनी डॉक्टरांची भेट घेत डॉक्टरांचा सत्कार केला. कोविड काळात डॉक्टरांनी देशसेवेसाठी आपले जीव धोक्यात घालुन रुग्णांची सेवा केली. देशाच्या सीमेवर ज्याप्रकारे सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात त्याचप्रकारे डॉक्टरांनी आपली सेवा बजावल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

वावर्ले शाळेला पुस्तकांची भेट

कळंबोली : बातमीदार, पनवेल : वार्ताहर आदर्श शिक्षक वडील कै. गजानन गणू खारपाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पत्रकार मिलिंद खारपाटील यांनी वावर्ले शाळेला 4400 रुपये किमतीची 17 अनमोल पुस्तके भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. ते स्वतः पुस्तक प्रेमी असून त्याने अनेक ग्रंथालयांना आतापर्यंत एक लाखापेक्षाही जास्त किमतीची पुस्तके भेट दिली आहेत. …

Read More »

शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त सचिन तांडेल मेमोरियल फाऊंडेशन, कळंबुसरे संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त तसेच संस्थेचे सदस्य कै. रिंकू नाईक यांच्या स्मरणार्थ गुरुवारी (दि. 14) पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात 146 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम कै. रिंकू नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन सुरू करण्यात …

Read More »