Breaking News

Ramprahar Team

पाली बसस्थानक परिसरात असह्य दुर्गंधी

उघड्या नाल्यांमुळे अपघाताच्या भीतीसह नागरिकांचे आरोग्यही धोक्यात पाली : प्रतिनिधी  पाली बसस्थानकासमोरील दोन भल्या मोठ्या व उघड्या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. येथील अस्वछता व असह्य दुर्गंधी यामुळे बसस्थानक व परिसरातील बाजारपेठेत येणार्‍या जाणार्‍या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधागड पाली बसस्थानकाचे प्रवेशद्वार असलेल्या मार्गावर दोन मोठे नाले आहेत. …

Read More »

म्हसळा महावितरणला भाजपचा झटका; भविष्यात जनआंदोलन करणार -प्रकाश रायकर

म्हसळा : प्रतिनिधी आव्वाच्यासव्वा वीज बिले आणि बिले न भरल्यास वीज जोडण्या तोडण्याच्या नोटीसा दिल्याने महावितरण विरोधात शुक्रवारी (दि. 5) म्हसळा तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्या नेतृत्वाखाली टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या बाबत आपल्या धोरणात योग्यत्या सुधारणा न केल्यास भविष्यात जन आंदोलन …

Read More »

वनखात्याच्या कर्मचार्यांना मारहाण; गुन्हा दाखल

अलिबाग : प्रतिनिधी मांडूळ जातीचा साप विक्रीसाठी आणणार्‍यांना अटक करण्यास गेलेल्या वनखात्याच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना मारहाण केल्याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसनी आदिवासी वाडीवरील दोन आणि पोयनाड येथील चारजण बुधवारी (दि. 3) सायंकाळी मांडूळ जातीचा साप विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वनखात्याच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. …

Read More »

अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यार्या आरोपीला एक वर्षाची सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यार्‍या आरोपीला अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. योगेश तळेकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे 3 ऑक्टोबर 2019 रोजी सहा वर्षाची मुलगी वाडीत खेळत होती. यावेळी आरोपी योगेश यशवंत तळेकर तिथे आला. त्याने बळजबरीने तीला …

Read More »

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा

मनसेची मागणी; कर्जत पोलिसांना निवेदन सादर कर्जत : बातमीदार राज्यातील जनतेला आश्वासन देऊनदेखील सर्वसामान्य जनतेची वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीजबिलांची रक्कम वसूल करणे, ही केवळ फसवणूक नाही. यामुळे गोरगरीब जनता भयभीत झाली असून त्यांना  मानसिक आघात आणि क्लेश पोहोचला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे …

Read More »

गाड्यांविषयीचे भंगार धोरण ऑटो कंपन्यांना तारणार का?

मागील आठवड्याच्या सुरुवातीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं बाजारानं जोरदार स्वागत केलं आणि त्यामुळं मागील आठवडाभर सर्वच्या सर्व पाच सत्रांमध्ये शेअर बाजारात तेजीची घोडदौड दिसून आली. याच अर्थसंकल्पात मांडलेलं आणि अनेक दिवस प्रतीक्षेत असलेलं एक धोरण म्हणजे स्क्रॅपेज पॉलिसी. हे धोरण म्हणजे ज्या …

Read More »

अर्थसंकल्प-आर्थिक संकटातही का वाढला आत्मविश्वास?

भारत नावाच्या 136 कोटींच्या महाकाय देशाच्या अर्थसंकल्पाकडे आपण कसे पाहतो? कोरोना संकटामुळे सर्व काही संपले अशी भावना निर्माण झाली असताना या अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत? या आणि अशा सात प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न. कोरोना साथीमुळे अर्थव्यवहार थंडावले असताना अर्थसंकल्पाने अनेकांच्या आशा पल्लवित का झाल्या आहेत? अर्थव्यवस्था …

Read More »

युगपरिवर्तक नाटक लोक-शास्त्र सावित्री

पनवेल : रामप्रहर वृत्त थिएटर ऑफ रेलेवन्सचे शुभचिंतक आणि अभ्यासक माणुसकीचा समाज निर्माण करण्यासाठी, न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाचे क्रांतिकारी सूत्र घेऊन, नवी पिढी घडवण्याचा संकल्प करून, सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे युगपरिवर्तक नाटक लोक-शास्त्र सावित्री रविवारी (दि. 21) सकाळी 11.30 वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात प्रस्तुत होणार आहे. या …

Read More »

गरीब-गरजू लहान मुलांसाठी मिसळ महोत्सव

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा उपक्रम; सभागृह नेते परेश ठाकूर यांची विशेष उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून 2021 रोजी 70 वा वाढदिवस आहे. यानिमित्त श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने  महाराष्ट्र सहचिटणीस व …

Read More »

तोतया टीसीकडून तरुणाची लूट

पनवेल : वार्ताहर अकोला येथून मुंबईत कामानिमित्त आलेल्या तरुणाला टीसी असल्याचे भासवून त्याच्याकडील मोबाइल फोन आणि रोख रक्कम लुबाडून नेल्याची घटना हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते बेलापूर दरम्यान घडली. पनवेल रेल्वे पोलिसांनी या चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत बनावट टीसीने लुबाडलेल्या तरुणाचे नाव हर्षल ज्ञानशिल खंडेराव (वय 19) …

Read More »