Breaking News

Ramprahar Team

नव्या दशकातील लंबी रेसचे घोडे कसे शोधणार?

नवनवे उच्चांक प्रस्थापित करणार्‍या शेअर बाजाराने नव्या दशकाच्या नव्या आशा निर्माण केल्या आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीचे महत्त्व प्रचंड वाढणार असलेल्या या दशकात ‘लंबी रेस के घोडे’ असलेल्या कंपन्या शोधणे म्हणूनच महत्त्वाचे ठरणार आहे. 2020 हे वर्ष जागतिक शेअर बाजारांसाठी दणक्याचं ठरलं. वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांत बाजारांनी नवनवे उच्चांक नोंदवले, तर …

Read More »

मनुष्यबळावरील वाढीव खर्च मान्य करणे हेच हिताचे

उद्योग व्यवसायांना मनुष्यबळावर होत असलेल्या खर्चाचे जरा जास्तच ओझे होत आहे. वास्तविक इतर संसाधने आणि माणूस याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे मनुष्यबळावर करावयाची बचत हा स्पर्धेचा विषय होऊ नये. अ‍ॅपलचे सुटे भाग तयार करणार्‍या भारतातील तैवानी विस्ट्रोन कंपनीत नेमके तेच झाले आणि त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भोगावे लागले. बंगळूरजवळील …

Read More »

थेरोंडा समुद्रकिनारी पोलिसावर हल्ला

दोघा व्यावसायिकांवर गुन्हा दाखल रेवदंडा : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थेरोंडा समुद्र किनारी उभारलेल्या बीच कॅम्पींग व्यावसायिकांनी स्पीकर वाजविण्यास मनाई करणार्‍या पोलिसावर हल्ला केला.  रेवदंडा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरोंडा समुद्रालगत हरेश किशोर मारकू व शाम हरिश्चंद्र मारकू (रा. खंडेरावपाडा) यांनी बीच कॅम्पींग व्यवसाय  सुरू …

Read More »

प्रवासी शेड दुरुस्तीकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष

मुरुड : प्रतिनिधी चक्री वादळात मुरूड एसटी आगारातील प्रवासी शेड  व आरक्षण कक्षाच्या इमारतीचे छप्पर उडून गेले होते. मात्र या छप्परावर पत्रे बसवण्याकडे विभाग नियंत्रकांकडून दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील एसटी कर्मचार्‍यांना इमारतीबाहेर बसून कामकाज करावे लागत आहे तर प्रवाशांना कडक  उन्हात बसून बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. 15 दिवसात …

Read More »

‘…तर माणगाव नगरपंचायत निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार’

माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत  महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनी आम्हांला  सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही, तर ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढवू, असे काँग्रेस (आय) चे रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार (माणगाव) यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले. माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये होणार आहे. या निवडणुकीबाबत बोलताना ज्ञानदेव पवार …

Read More »

रसायनीत दुकानाला आग

एकाचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी खालापूर, मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनीमधील मोहोपाडा येथील दुकानाला आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोघेजण होरपळले. त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर झाला असून त्याला  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मोहोपाडा येथील मरिआई मंदिराजवळ एका दुकानाच्या गाळ्यात कापसाचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये गोपाळ …

Read More »

अत्याचारी नराधमाला ‘शक्ती कायद्या’द्वारे 21 दिवसांत फाशी द्या

शूरनारी प्रतिष्ठानतर्फे  ट्विटर मोहिमेद्वारे मागणी; नागोठणे पोलीस ठाण्यात दिले निवेदन नागोठणे : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पांचोळा आदिवासी वाडीवरील तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करणार्‍या नराधमाला ’शक्ती कायद्या’द्वारे 21 दिवसात फाशी देण्याची मागणी येथील शूरनारी प्रतिष्ठानच्या वतीने 31 डिसेंबर रोजी ट्वीटर मोहिमेद्वारे करण्यात आली असून तसे निवेदन  शुक्रवारी (दि. 1) …

Read More »

पर्यटकांनी समुद्रकिनारे गजबजले!

संचार बंदी दूर होताच मुरुड येथील काशीद व मुरुड समुद्र किनारी हजारो पर्यटकांची गर्दी उसळत आहे.मुंबई पासून 165 किलोमीटरवर मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने मुंबई, ठाणे, बोरिवली, कल्याण, डोम्बवली, विरार येथील सर्वाधिक पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत.मुरुड तालुक्यात विविध पर्यटन स्थळे आहेत.या विविध ठिकाणी पर्यटक आवर्जून भेटी देऊन पर्यटनाचा आनंद …

Read More »

शिंदे शिक्षक दाम्पत्य राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

माणगाव : प्रतिनिधी         कोल्हापूर येथील आविष्कार फाऊंडेशनने शंकर दत्ताराम शिंदे (प्राथमिक शाळा-देगाव) आणि उर्मिला शंकर शिंदे (प्राथमिक शाळा-पानोसे) या शिक्षक दाम्पत्याला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. आविष्कार फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी विशेष कामगिरी बजावणार्‍या शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत …

Read More »

विजयभूमी विद्यापीठाने जपली सामाजिक बांधिलकी

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार तालुक्यातील अतिदुर्गम भागात जांबरुंग येेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहाची समस्या भेडसावत होती. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत विजयभूमी विद्यापीठ हे एक शैक्षणिक संकुल आकार घेत आहे. या संस्थेने जांबरुंग प्राथमिक शाळेला मुलींसाठी दोन स्वच्छतागृहे उभारून देऊन सामाजिक बांधिलकी जपली. शासनामार्फत प्राथमिक शाळेच्या इमारती उभारल्या जातात, परंतु विद्युत …

Read More »