कोरोना महामारीच्या काळात ज्याच्या-त्याच्या तोंडी एकाच गोळीचे नाव होते – ‘डोलो 650’! कुणालाही जरासाही ताप आला तरी ‘डोलो’च घेण्याचा सल्ला असंख्य डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणावर दिला गेला. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घरी परतल्यावरही अनेकांनी डोलो घेण्याचा उपाय वापरला. तर अशी ही एकाएकी देशभरात भलतीच लोकप्रिय झालेली डोलो गोळी आता वादाच्या कचाट्यात …
Read More »केंद्राच्या योजना महिला सक्षमीकरणासाठी -प्रल्हाद सिंह पटेल
रोहे ः प्रतिनिधी आज मला आनंद वाटत आहे की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.त्यामुळे मी महीला कार्यकर्त्यांचा अभिनंदन करतो.देशाची आर्थिक ताकत तुमच्यात आहे.त्यामुळे महीला ना सक्षम केले तर कुटुंब सक्षम होईल.यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्यापासुन सर्वांन साठी अनेक योजना आणल्या.या योजना मातृशक्तीशी निगडीत आहे. पंतप्रधान नरेंद्र …
Read More »गव्हाण विद्यालयात फिरती प्रयोगशाळा
गव्हाण ः वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने नॉलेज ऑन व्हील्स अर्थात फिरती प्रयोगशाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पनवेल येथील सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने या फिरत्या प्रयोगशाळेच्या विज्ञान प्रशिक्षिका जयश्री सानप …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात परिसंवाद
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात कार्यशाळा व परिसंवाद समितीमार्फत मंगळवारी (दि. 23) वित्त व लेखा विभागातील पदवीधारकांसाठी करिअरपाथ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादासाठी आयबीएस महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अमेय तनावडे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. …
Read More »केंद्रीय अन्नधान्य विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेलांनी साधला नागरिकांशी संवाद
महाड ः प्रतिनिधी महाड तालुक्यात केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या दौर्यात महाडमध्ये नागरिकांशी संवाद साधत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती दिली. अन्न प्रक्रिया उद्योगांवर भर दिल्यास उत्पादनात वाढ होऊन निर्यात क्षमता वाढेल असे मत व्यक्त केले. केंद्रीय अन्नधान्य व विकास राज्यमंत्री प्रल्हाद सिंह …
Read More »सिडकोच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईचे संकट
विधीमंडळात लोकप्रतिनिधींनी उठवला आवाज मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई क्षेत्र विकसित करताना तसेच पनवेल व उरण तालुक्यात मूलभूत सोयीसुविधा देताना पाणीपुरवठ्याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना अनेक वर्षे सातत्याने अपुर्या व कमी पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागत असल्याची बाब पुन्हा एकदा शासनाच्या निदर्शनास आणून देत पाणी प्रश्न योग्यप्रकारे मार्गी लावण्याची …
Read More »पनवेल रेल्वेस्टेशनवर सुरक्षा वाढविणे गरजेचे
राज्याची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा बॉम्बने उडविण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिल्याने मुंबईसह राज्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. शहरात आणि महत्त्वाच्या रेल्वेस्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. यामध्ये पनवेल स्टेशनचाही समावेश आहे, पण मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाणार्या पनवेल रेल्वेस्टेशनवर प्रवाशांच्या बाबतीत काहीसे दुर्लक्ष होत आसल्याचे दिसून येत आहे. येथील प्रवाशांच्या सामानाची तपासणी …
Read More »निर्विघ्न गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज
खारघर ः रामप्रहर वृत्त खारघर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी व सागरी सुरक्षा दल यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत गणेशोत्सव साजरा करताना मंडप आणि बाहेरील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपार्ह देखावे, फलक व चित्रफिती करू नये, जबरदस्तीने वर्गणी गोळा …
Read More »पनवेल मनपा लावणार ई-कचर्याची विल्हेवाट
अनुभवी संस्थांकडून निविदा मागविली; पालिका क्षेत्रात करणार जनजागृती पनवेल ः रामप्रहर वृत्त घातक कचर्यात मोडणार्या ई- कचर्याची स्वतंत्र विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेने पाऊले उचलली आहेत. या कामाचा अनुभव असलेल्या संस्थेकडून पालिकेने निविदा मागविली आहे. याकरीता प्रदूषण नियंत्रक मंडळाची परवानगी असलेल्या संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. ई- कचर्यामध्ये वैद्यकीय कचर्यासह …
Read More »नवी मुंबई मनपा मेडिकल कॉलेजसाठी गतिमान
आरोग्य सेवेला मिळणार बळकटी; कामांना आला वेग नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेतर्फे प्रथमच स्वतःच्या मालकीचे पदव्युत्तर पदवी मेडिकल कॉलेज सुरू केले जाणार आहे. त्याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मे 2023पर्यंत मुदत प्रशासनाला दिली आहे. या मेडिकल कॉलेजमुळे येत्या तीन वर्षांत महापालिकेच्या वाशी आणि तेरणा या दोन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper