Breaking News

Ramprahar Team

विजेच्या लपंडावाने त्रस्त नागरिकांचा जनआक्रोश आंदोलनाचा इशारा

पनवेल ः प्रतिनिधी उरण पूर्व विभागात गेले काही दिवस विजेचा लपंडाव सुरू असून दोन-दोन दिवस वीज गायब होणे,  अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. त्यात सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही वीज महावितरण कंपनी कोणत्याही उपाययोजना करीत नाही. कोरोनाच्या महामारीत ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज …

Read More »

पनवेलमध्ये 176 कोरोनाबाधित

आठ जणांचा मृत्यू; 198 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल ः प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 18) कोरोनाचे 176 नवीन रुग्ण आढळले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर 198 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 139  नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून  सात जणांचा मृत्यू झाला, तर 150 …

Read More »

मोदक बनविणार्या महिलांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

पनवेल ः बातमीदार गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असला तरी भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. घरोघरी बाप्पाच्या सेवेसाठी कामांची विभागणी झाली असून यात महिलावर्ग आघाडीवर आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाच्या नैवेद्याचा भार खांद्यावर घेत त्यासाठी त्यांनी …

Read More »

शिवकर येथे आंतरजातीय विवाहसोहळा संपन्न

पनवेल ः बातमीदार शिवकर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सुरज ढवळे आणि सुश्मिता जाधव यांचा आंतरजातीय विवाहसोहळा रविवारी (दि. 16) ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला. या आंतरजातीय विवाह सोहळ्यामध्ये शिवकर गावातील तसेच ढवळे परिवारातील मोजकेच सदस्य उपस्थित होते. हा सोहळा वैदिक पद्धतीने दोन्ही कुटुंबांच्या आईवडिलांच्या परवानगीने संपन्न झाला. उच्चशिक्षित मुलगी आणि व्यावसायिक मुलगा हे …

Read More »

श्री गणेश मित्रमंडळाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने; बैठकीत निर्णय

पनवेल ः प्रतिनिधी कामोठ्यातील श्री गणेश मित्रमंडळाचा गणेशोत्सव सेक्टर 34चा राजा म्हणून ओळखला जातो. संपूर्ण जगभर सध्या कोरोनाच्या साथीमुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीत देशभर लॉकडाऊन सुरू असताना गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी विचारविनिमय करण्यासाठी श्री गणेश मित्रमंडळाची बैठक झाली. या बैठकीत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे तसेच इतर …

Read More »

हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ

पनवेल ः बातमीदार नामदेव शिंपी समाज युवक संघातर्फे दिला जाणारा शिंपी समाजात प्रतिष्ठेचा समजला जाणारा हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाला. 15 ऑगस्ट रोजी पनवेलचे सुपुत्र हिरवे गुरुजी हे गोवा मुक्तिसंग्रामात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी नामदेव शिंपी समाज …

Read More »

सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीची कोंडी

नवी मुंबई ः प्रतिनिधी सायन-पनवेल महामार्गावर सोमवारी सकाळी टॅक्सी व कारचा अपघात झाला. यानंतर कारचालकाने टॅक्सीची चावी खेचून तेथून पळ काढला. त्यामुळे अर्धा तास टोल नाक्याजवळ चक्काजाम झाला होता. वाशी प्लाझापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नवी मुंबई, पनवेलवरून रोज हजारो नागरिक मोटरसायकल व कारनेच मुंबईत कामाच्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे …

Read More »

खारघरमध्ये चेन स्नॅचर सक्रिय

तीन महिलांचे मंगळसूत्र लंपास पनवेल ः प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असताना दुसरीकडे चोरटे मात्र पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. रविवारी (दि. 16) तीन ज्येष्ठ नागरिक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र बाइकस्वारांनी लंपास केले. भाजी खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या या महिलांना दुचाकीस्वारांनी आपले शिकार बनविले आहे. पहिली घटना सेक्टर 19 …

Read More »

प्लाझ्मा दान करणार्यांचा गौरव करावा

आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई ः बातमीदार अनेक कोरोनाबधित रुग्ण बरे झाल्यानंतर प्लाझ्मा दान करण्यासठी पुढे सरसावले आहेत. नवी मुंबईच्या दृष्टीने ही चांगली बाब असून, पालिकेने अशा प्लाझ्मा दान करणार्‍यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. त्यामुळे इतरांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी …

Read More »

दक्षतेत ढिलेपणा नको

आजवरच्या एकूण कोविड-19 रुग्णांच्या संख्येत पुण्यातील संख्या रविवारी मुंबईच्याही पुढे गेल्याने पुणे शहर हे देशातील नवीन ‘कोरोना राजधानी’ बनले आहे. पुण्याच्या आधी देशातील सर्वाधिक कोरोना केसेसमध्ये मुंबई आघाडीवर होती. एकूण परिस्थिती पाहता आजही महाराष्ट्रातील कोरोना संदर्भातील स्थिती चिंताजनकच आहे. आणि या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारपासून राज्यातील सर्वात महत्त्वपूर्ण असा सांस्कृतिक उत्सव …

Read More »