पनवेल : बातमीदार गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महापालिकेने 41 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे. हे तलाव 4 बाय 6 फूट लांबी-रुंद आणि चार फूट खोल असतील. नागरिकांनी थेट पाण्यात जाऊन विसर्जन करू नये, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे. तसेच या …
Read More »पनवेल तालुक्यात 232 नवे कोरोनाग्रस्त
एकाचा मृत्यू; 220 रुग्णांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 21) कोरोनाचे 232 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 220 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 165 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 160 रुग्ण बरे …
Read More »पळून गेलेल्या मुलीवर बलात्कार
पनवेल : बॉयफ्रेन्डसोबत पळून गेलेल्या 17 वर्षीय मुलीवर त्याच्या मित्रांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,17 वर्षीय मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली होती. या मुलीला खारघरमधील फ्लॅटमध्ये नेले होते. तिथे तिला पावडर म्हणून ड्रग्ज देण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला. सध्या तिचे समुपदेशन केले जात आहे. …
Read More »भक्तांकडून लहान गणेशमूर्तींना प्राधान्य
पनवेल : बातमीदार कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संसर्ग टाळण्यासाठी घरगुती गणेशोत्सव करणारे आणि सार्वजनिक मंडळांनीही यंदा कमी उंचीच्या गणेश मूर्ती स्थापन करण्यास पसंती दिली आहे. गणेशभक्त यंदा सहज विरघळणार्या शाडू मातीच्या आणि लहान मूर्तींचा आग्रह धरत असल्याची माहिती येथील मूर्तिकार यांनी …
Read More »कोरळवाडी आदिवासीवाडीतील प्रश्न मार्गी लागण्याची आशा
पनवेल : वार्ताहर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वाडीतील रस्ता पाणी आणि शिक्षणाचा प्रश्न कायमचा सुटणार या आशेने कोरलवाडीतील आदिवासींनी आपले पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करून प्रशासनाचे आभार मानले. गेल्या काही महिन्यापासून ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर या वाडीला मूलभूत सुविधा पुरवून देण्यासाठी जागतिक आदिवासी दिनापासून बेमुदत आमरण …
Read More »शिवाजीनगर येथे अन्नधान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना पार्श्वभूमीवर माजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरिबांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. यामध्ये गव्हाण येथील शिवाजीनगर येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी …
Read More »जान्वी टेलिकॉम नवीन मोबाइलचे दालन सुरु
पनवेल : मिडल क्लास सोसायटी येथे सोनी बंधूंनी जान्वी टेलिकॉम हे नवीन मोबाइलचे दालन सुरु केले आहे. त्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी नगरसेवक राजू सोनी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, पवन सोनी यांच्यासह व्यापारी बांधव व समाज बांधव उपस्थित होते.
Read More »नाल्यांना संरक्षक जाळी बसवण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर खांदा कॉलनी परिसरातील परिसराला लागून असलेल्या नाल्यांना संरक्षण जाळी बसवुन पदपथांची दुरुस्ती तसेच पदपथांवरील तुटलेली झाकणे बदलण्यात यावी, अशी मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी सिडकोकडे निवेदनाद्वारे केली आहे. खांदा कॉलनी परिसरातील सेक्टर 7 आणि नव्या विभागांना लागून तसेच सेक्टर 5 वसाहत यांच्यामध्ये मोठे नाले …
Read More »सायन-पनवेल महामार्गावरील पथदिवे मोडकळीस
शासनाचे दुर्लक्ष खारघर : प्रतिनिधी यंदा पावसाळ्यात वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात झाडे, विजेचे खांब उन्मळून खाली पडल्याने मोठ्या प्रमाणात गाड्यांचे नुकसान झाले आहे. सायन पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असताना असेच मोडकळीस आलेले पथदिवे सध्याच्या घडीला याठिकाणी मृत्यूचे सापळे बनले आहेत. मात्र याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास …
Read More »‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’
मुरूड ः प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व शांततेत साजरा करून शांतता कमिटीच्या सदस्यांनी पोलिसांना विशेष सहकार्य करून गणपतीचे आगमन व विसर्जनावेळी मदत करावी, असे प्रतिपादन मुरूड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरूड पोलीस ठाण्यात शांतता सभा आयोजित करण्यात आली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper