पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याची सीमा बंद न केल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आतापर्यंत असंख्य चाकरमानी रायगड जिल्ह्यासह कोकणात शिरकाव करू शकले आहेत. मात्र, पोलादपूर या रायगड जिल्ह्याच्या शेवटच्या तालुक्याच्या ठिकाणी अनेक पादचारी चाकरमान्यांना कशेडी घाटातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरून परत जाण्यास भाग पाडले जात आहे. पोलादपूर शहरातील प्राथमिक …
Read More »महागणपती मंदिरात शुकशुकाट
चिरनेर (ता. उरण) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करुन धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रविवारी संकष्टी चतुर्थी असतानादेखील कोरोनाच्या भीतीमुळे श्री महागणपती मंदिरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
Read More »श्री विरुपाक्ष मंदिराचा वर्धापनदिन
पनवेल ः पनवेल शहरातील श्री विरुपाक्ष महादेेव मंदिराचा वर्धापनदिन शासनाच्या नियमाप्रमाणे झाला. सालाबादप्रमाणे यंदाही श्री विरुपाक्ष महादेव मंदिराचा वर्धापन दिन कार्यक्रम कोरोना संक्रमण झाल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे या वर्षी शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे झाला. त्यामुळे सर्व भक्तांनी घरूनच दर्शन घेतले. गॅलेक्सी कंपनीच्या माध्यमातून पनवेलकरांना बहुमोल सहकार्य पनवेल : वार्ताहर तळोजा …
Read More »अंगणवाडी, आशा सेविकांचे कोरोना युद्धात महत्त्वाचे योगदान
उरण : वार्ताहर कोरोना युद्धात अंगणवाडी सेविका व आशा सेविका महत्त्वाचा दुवा ठरत आहेत. अल्प मानधनात काम करणारा हा घटक कोरोना सर्व्हेमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका करत आहे. घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशा सेविका घरातील प्रत्येक सदस्याचा सर्व्हे व थर्मल स्क्रिनिंग करत आहेत. तसेच जनजागृतीचे कामही करत आहेत. …
Read More »जासई भागातील शेतकर्यांना थेट बांधावर मिळणार कृषिसेवा
चिरनेर : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना सर्व कृषिसेवा थेट बांधावरच देण्याचा उपक्रम शासनाच्या उरण तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आला आहे. यामध्ये जासई विभागातील चिरले, जांभुळपाडा, गावठाण या गावांमधील शेतकर्यांना खते व भातबियाणे थेट शेताच्या बांधावरच देण्यासाठी उरणचे कृषी सहाय्यक अधिकारी डी. टी. केणी यांनी प्रत्येक शेतकर्याच्या घरी जाऊन …
Read More »रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपिठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक अंतर्गत मारूती मंदिर नवीन पनवेल केंद्राच्या युवा प्रबोधन विभागाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन पनवेल शहरातील श्री साई ब्लड बँक येथे करण्यात आले होते. त्याला स्वामी सेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशासनाने लावलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून स्वामी सेवकांनी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून वूमन्स प्रेस ऑर्गनायझेशनला मदत
पनवेल : वार्ताहर पनवेलमधील पत्रकारितेत कार्यरत असणार्या महिला पत्रकारांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मदतीचा हात दिला आहे. तसेच त्यांना सर्वतोपरी मदतही केली आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याच्या या लढाईत 31 मेपर्यंत सर्व जनता लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाऊनची परिस्थिती आणखी किती दिवस राहील याबद्दल साशंकता आहे. अशातच …
Read More »तळीरामांचा मोर्चा रसायनी, पेणकडे
रेड झोनमधील मद्यप्रेमींची वाइन शॉपवर गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा पनवेल : वार्ताहर कोरोना साथीचा आजार संपूर्ण देशभरात थैमान घालत असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊन येत्या 31 मेपर्यंत हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यातच नुकतेच दारूची दुकाने काही ठिकाणी सुरु केल्याने तळीरामांची प्रचंड गर्दी वाइन …
Read More »लॉकडाऊनमुळे शेतकरी हवालदिल
पेण ः प्रतिनिधी एकीकडे अवकाळी पाऊस व दुसरीकडे कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. या काळात शेतीमाल विकण्यात शेतकरीवर्गाला अडचणी येत होत्या. अत्यावश्यक सेवेमध्ये जरी कृषी क्षेत्राला सूट देण्यात आली असली तरी ऐन हंगामाच्या काळात …
Read More »गावठी हातभट्टीचा दारूअड्डा उद्ध्वस्त
रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कुदे खाडीलगत खाजण झाडीत गावठी हातभट्टीची दारू बनविण्याच्या अड्डा रेवदंडा पोलिसांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास उद्ध्वस्त केला. या कारवाईत रेवदंडा पोलिसांनी 20 हजार किमतीची 1000 लिटर गूळमिश्रीत गावठी हातभट्टीची रसायने व इतर साहित्य नष्ट केले आहे. सध्या कोरोनाच्या संकटकाळात गावठी दारूविक्री सुरू असल्याच्या चर्चेनुसार रायगडमध्ये पोलिसांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper