पाली ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात रुग्णांना रक्ताची सातत्याने गरज भासते. या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिहूतील युवकांच्या संकल्पनेतून रविवारी (दि. 25) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात शिहू बेणसे विभागातील नागरिकांसह तरुण व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनीही रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. डॉ. पुरुषोत्तम भोईर …
Read More »जिल्ह्याबाहेरून आलेल्या नागरिकांनी माहिती लपवू नये
प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचे आवाहन पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून येणार्या नागरिकांनी आपली माहिती न लपविता प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केले आहे. चौथ्या टप्प्यामध्ये लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आल्याने अनेक नागरिक जिल्ह्याबाहेरून …
Read More »नागोठणे ग्रामपंचायतीकडून मान्सूनपूर्व कामांना प्रारंभ
नागोठणे ः प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आल्याने येथील ग्रामपंचायतीच्या वतीने नालेसफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. 7 जूनपर्यंत शहराच्या सर्व भागातील कामे पूर्ण होतील, असा विश्वास सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आणि ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांनी व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूंचा शहरात प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीकडून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात …
Read More »माणगावात कोविड 19 रूग्णालय सज्ज
35 दिवसांत केले नूतनीकरण; रुग्णांना दिलासा माणगाव ः प्रतिनिधी जगभरात थैमान घातलेल्या कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांंचे निदान करणारी यंत्रणा शासन तातडीने उभारत आहे. याचाच एक भाग म्हणून माणगाव उपजिल्हा रुग्णालय कोविड 19करिता सुसज्ज करण्यासाठी एक महिन्यापूर्वी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सूचना केली होती. या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यासाठी …
Read More »लॉकडाऊनमुळे आदिवासींचा रोजगार बुडाला
उरण : वार्ताहर देशासह संपूर्ण जगावर कोरोन विषाणूच्या साथीने हाहाकार माजविला आहे. साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन केलेले आहे. त्यामुळे आदिवासींचा रोजगार बुडाला आहे. जंगलातून मिळणारा मेवा बाजारात विकून आपला उदरनिर्वाह करणारे आदिवासी यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. जंगलातून विपुल प्रमाणत करवंदे, जांभळे, फणस, काजू इत्यादी रानमेवा मिळतो. अतिशय …
Read More »1 जूनपासून मासेमारी बंद; नौका किनारी
उरण : वार्ताहर महाराष्ट्र सागरी मासेमारी आणि नियमन अधिनियम 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलै असा 61 दिवस करण्याकरिता शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या आयुक्तालयाच्या आदेशानुसार 1 जून ते 31 जुलै असा मासेमारी बंदी कालावधी आदेशित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील …
Read More »भाजपतर्फे सावळे गावात रक्तदान शिबिर; उपक्रमाला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याने अनेक ठिकाणी रक्ताची कमतरता भासत आहे. ही गंभीर परस्थिती लक्षात घेता, गुळसुंदे जिल्हा परिषद भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष रोशन पाटील व सावळे गावचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किरण केदारी यांनी सावळे गावामध्ये …
Read More »रायगडात 408 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग : जिमाका रायगड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळे रविवारी (दि. 24) जिल्ह्यात दिवसभरात 408 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर बाधितांच्या संख्येत 50 ने वाढ झाली आहे व जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा एकुण आकडा 316 झाला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक …
Read More »रायगडात कोरोना वाढतोय
कोरोनाने रायगड जिल्ह्याला आपल्या कवेत घेतले आहे. पूर्वी केवळ शहरांपुरता मर्यादित असलेल्या कोविड-19च्या विषाणूने एव्हाना जिल्ह्याचा ग्रामीण भागही व्यापला असून, सुधागड हा एकमेव तालुका सोडला तर उर्वरित सर्व 14 तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. दुर्दैवाने काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे काही जण उपचार घेऊन बरे होत सुखरूप घरीही …
Read More »वाशीच्या कोविड रुग्णालयात गरोदर मातांचे यशस्वी सीझर
नवी मुंबई : बातमीदार गेल्या दोन महिन्यांपासून नवी मुंबई मनपा हद्दीत 1500 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह गरोदर मातांचाही समावेश आहे. परंतु या गरोदर मातांचे बाळंतपण व्यवस्थित व सुखरूप करून त्यांना यशस्वीपणे घरी सोडून देण्यात आले आहे. यामुळे वाशी कोविड 19 रुग्णालयातील भूल विभागाचे डॉक्टर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper