Breaking News

Ramprahar Team

कोरोना प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाची तयारी

प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांची माहिती माणगाव : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी प्रांत कार्यालयात माणगाव उपविभागांतर्गत माणगाव व तळा तालुक्यातील महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, व्यापारी असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, पंचायत समिती व नगरपंचायत विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत कोरोना विषाणू …

Read More »

कोरोना… भीती नको… दक्षता घ्या!

सार्वजनिक आरोग्य विभागासह म्हसळ्यात प्रशासन सज्ज म्हसळा : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने म्हसळा तहसीलदार शरद गोसावी यांच्या दालनात म्हसळा तालुक्यातील आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, प्राथमिक शिक्षण विभाग नगरपंचायत, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस विभाग, …

Read More »

लाडवलीत दिवसाढवळ्या घरफोडी

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील लाडवली गावातील राजमाता जिजाऊनगरमधील करण कदम राहत असलेल्या भाड्याच्या घराचा दरवाजा फोडून शनिवारी (दि. 14) दुपारी अज्ञात इसमाने कपाटातील सोन्याचे दागिने चोरले. गेल्या महिनाभरातील याच परिसरातील ही दुसरी घरफोडीची घटना घडली असून, त्यामुळे रहिवाशांत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. महाड तालुक्यातील लाडवली गावातील राजमाता जिजाऊनगरमधील पराग …

Read More »

लोधिवली ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार

गटविकास अधिकार्‍यांचे लेखी पत्र; मारुती तवले यांचे आमरण उपोषण स्थगित खालापूर : प्रतिनिधी लोधिवली ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार प्रकरणाचा चौकशी अहवाल 20 मार्चपर्यंत जिल्हा परिषदेला पाठविण्याचे लेखी आश्वासन खालापूरच्या गटविकास अधिकार्‍यांनी दिल्याने मारुती तवले यांनी आपले आमरण उपोषण शनिवारी (दि. 14) स्थगित केले. खालापूर तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायतीमधील विकासकामांत तसेच 31 लाख रुपयांच्या …

Read More »

अपघातांना निमंत्रण देणारे विजेचे खांब

कर्जत तालुक्यातील नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर विजेचे खांब उभे आहेत. त्यांच्या आजूबाजूला रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि मध्ये विजेचा खांब ही समस्याच आहे. यावर महावितरण कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत असून रस्त्याची कोट्यवधी रुपयांची कामे करणारी यंत्रणादेखील वीज वाहून नेणारे खांब हटवत नसल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुक्यात मागील …

Read More »

क्षुल्लक कारणावरून मुलाकडून आईची हत्या

महाड ः प्रतिनिधी आईने पुण्याला जाण्यासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या मुलाने आपल्या वृद्ध आईची क्रूरपणे हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी महाड तालुक्यातील नागाव रेवतळे फाटा येथे घडली. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. महाड तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार …

Read More »

अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

पनवेल ः कोन येथे आयोजित अखंड हरिनाम उत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देत मनोभावे दर्शन घेतले. या वेळी कोन ग्रामपंचायत सरपंच निलेश म्हात्रे, काशीनाथ म्हात्रे, अर्जुन म्हात्रे, पांडुरंग घरत, भगवान शिसवे, प्रकाश शिसवे, नाथा म्हात्रे, हनुमान म्हात्रे, गणेश म्हात्रे, लक्ष्मण घरत, रामचंद्र …

Read More »

कार्ला येथील एकवीरा देवीची यात्रा रद्द

पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले असून संसर्ग टाळण्यासाठी भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून एकवीरा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. एकवीरा देवस्थान कार्ला येथील प्रशासकीय समितीने यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला असून भाविकांनी गडावर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. एकवीरा देवस्थान …

Read More »

महिला दिनानिमित्त व्याख्यानाला प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मिडलक्लास हौसिंग सोसायटीमधील आदर्श महिला मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि. 13)व्याख्यान तसेच मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होेते. हे कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीमध्ये आदर्श महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून …

Read More »

‘सीएए’वरून राज्य सरकारची दुटप्पी भूमिका

देवेंद्र फडणवीस यांची टीका मुंबई ः प्रतिनिधी  एकीकडे पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री आपला पाठिंबा जाहीर करतात आणि दुसरीकडे राज्यात येताच त्यासाठी समिती गठीत करतात. याच सरकारमधील दोन मंत्री उमर खालिदच्या सभेला उपस्थित राहतात आणि त्यानंतरच दिल्लीत दंगे होतात आणि त्यावर काहीच कारवाई होत नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. भारतीय …

Read More »