Breaking News

Ramprahar Team

पनवेलमध्ये मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा

पनवेल ः बातमीदार कोरोना या संसर्गजन्य रोगापासून बचावासाठी पनवेल परिसरात मास्क, सॅनिटायझरचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे मेडिकलमध्ये मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा जाणवत आहे. काही मेडिकलमध्ये त्यांची दुप्पट ते तिप्पट दराने विक्री केली जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. करोनाबाधित रुग्ण मुंबई, पुणे, नागपूरसह महाराष्ट्रात आढळू लागल्याने पनवेलमधील नागरिकदेखील काळजी घेऊ लागले …

Read More »

कडेकोट बंदोबस्त

कोरोनाच्या भीतीचे सावट इतके गडद आहे की देशातील अनेक भागांत अक्षरश: टाळेबंदीसारखी परिस्थिती नजीकच्या काळात ओढवेल असे वाटते. परंतु त्याला काही इलाज देखील नाही. या घातक विषाणूने जगाचीच अर्थव्यवस्था हादरवून टाकली असून त्याचा काही प्रमाणात फटका भारताला देखील बसेल. परंतु ‘जान है तो जहान है’ या उक्तीनुसार हे नुकसान सहन …

Read More »

खोपोलीतील आठवडा बाजार बंद

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार खोपोलीसह संपूर्ण खालापूर तालुक्यातील नागरिकांसाठी घरगुती व कौटुंबिक उपयोगी वस्तू, कपडे एकाच ठिकाणी उपलब्ध असण्याचे केंद्र आहे. त्यामुळे गुरुवार बाजारात प्रचंड गर्दी होते. मात्र कोरोना व्हायरसची गडद बनलेली काळी छाया बघता नगरपालिका व पोलीस प्रशासनाने एकत्रित निर्णय घेऊन खोपोलीत गुरुवारी …

Read More »

खोपोलीत पोपटांचे मारेकरी तीन आठवड्यानंतरही मोकाट

खालापूर ़: प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गाच्या रूंदीकरणात वृक्ष तोडताना  मृत्युमुखी पडलेल्या पोपटांचे मारेकरी 20 दिवसानंतरसुद्धा मोकळे असून, त्यांच्या कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यानी दिला आहे. महामार्ग रूंदीकरणात अडथळा ठरणारे खोपोलीतील दर्ग्याजवळचे जांभळाचे झाड 20 फेब्रुवारीला कापण्यात आले. या झाडाच्या खोडातील ढोलीत पोपटांचा निवारा आहे, हे …

Read More »

भाल विठ्ठलवाडी बंधारा फुटला

पेण तालुक्यातील शेकडो एकर भातशेती खार्‍या पाण्याखाली पेण : प्रतिनिधी तालुक्यातील भाल विठ्ठलवाडीची उघाडी फुटून समुद्राचे पाणी पेण खारेपाट परिसरातील शेकडो एकर भातशेतीत शिरले आहे. या उघाडीची तात्काळ दुरुस्ती करून ती बांधली नाही तर हे समुद्राचे पाणी तालुक्यातील थेट वाशी ते वाशीनाक्यापर्यंत जावून, त्या परिसरातीलही सर्व शेतीचे नुकसान होण्याचा धोका …

Read More »

रायगड जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी

महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडसह महाड परिसरात गुरुवारी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर गुरुवारी पहाटेपासूनच तरुणांनी शिवजयंतीचा जल्लोष साजरा केला. किल्ले रायगडावरून आलेल्या शिवज्योतींचे महाडच्या छत्रपती शिवाजी चौकात स्वागत करण्यात आले.  महाड शहरातील आदर्श नगर, नवेनगर, तांबटआळी, बाजारपेठ, चवदारतळे, …

Read More »

बहुरंगी व्यक्तिमत्व दादा कोंडके

कोंडके, दादा  मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलावंत; अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते. त्यांचे मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके; मात्र ‘दादा कोंडके या नावाने ते सुपरिचित. त्यांचा जन्म नायगाव, मुंबई येथला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहीत नसल्याने जन्मदिनी जन्माष्टमी होती, म्हणून तिथीवरून जन्मतारीख काढण्यात येऊन त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले. त्यांचा आज मृत्यूदिन. …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर

‘देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे, तुडुंब भरलीस मातृत्वाने, काजळ वाहवले गालावर, मोहोर गळला मदिर क्षणांचा, कुणी प्रगटली निवले अंतर’ अशांसारख्या एकाहून एक सरस कविता लिहिणार्‍या कवी विंदा करंदीकरांचा यांचा आज स्मृतीदिन. ‘विंदा’ करंदीकर यांचे पूर्ण नाव गोविंद विनायक करंदीकर. त्यांचा जन्म 23 …

Read More »

तेव्हा त्या माणसाची मोठे होण्याची सुरुवात होते -योगीराज महाराज गोसावी

कर्जत : प्रतिनिधी हल्ली स्तुती करण्यापेक्षा निंदा करण्याकडे जास्त कल असतो. जो श्रेष्ठ आहे, त्याच्या पायी नतमस्तक होणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसर्‍याचे कौतुक करायला शिकतो, तेंव्हा माणसाची मोठे होण्याची सुरुवात होते, असे प्रतिपादन एकनाथ महाराजांचे चौदावे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी यांनी येथे केले.  भागवत धर्म सेवा मंडळ व …

Read More »

शेतकर्याची शक्कल; मिळविले वालाचे अमाप पीक

कर्जत : प्रतिनिधी यंदा पावसाळा लांबल्याने कडधान्याचे पीक कसे घ्यायचे? याची चिंता शेतकरी वर्गाला पडली होती. भात पिकाची कापणी झाली, तेव्हा शेतात चिखलच होता. नांगरणी करता येत नसल्याने कर्जत तालुक्यातील एका शेतकर्‍याने शक्कल लढवली. भात कापल्यानंतर त्याने चिखलावरच वाल पेरले आणि शेतात म्हशी नेऊन त्या शेतभर फिरविल्या. त्यानंतर वाल रुजला …

Read More »