मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील शिवनगर मोहोपाडा येथील कौशल विनायक गायकवाड याने एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. मेकॅनिकल इंजिनियरचा डिप्लोमा केलेला हा संगीतप्रेमी लहान वयातच संगीतक्षेत्राकडे वळलेला आहे. त्याने मोहोपाडा प्रिया स्कुलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याला संगीताची आवड निर्माण झाली होती. कॉलेज जिवनात असतानाच त्याने कविता लिहण्यास सुरुवात केली. …
Read More »पालिका हद्दीत शौचालये बांधण्याची मागणी
नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी दिले आयुक्तांना निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीत शिवाजी नगर व नवनाथ नगर झोपडपट्टीमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात यावे अशी मागणी भाजप नगरसेविका वृशाली जितेंद्र वाघमारे यांनी केली आहे. यासाठी पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील शिवाजी …
Read More »जयहिन्द कप क्रिकेट स्पर्धा
आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या जयहिन्द क्रीडा मंडळाच्या वतीने व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खारघर शहर मंडळ भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जयहिन्द कप 2020 क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी (दि. 24) प्रारंभ झाला. या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष …
Read More »पोदी भुयारी मार्गाचे लोकार्पण
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक नगरसेवकांनी पोदीहून पनवेलला जोडणार्या भुयारी मार्गाच्या (रेल्वे अंडर पास) कामासंदर्भात केलेल्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश आले आहे. या मार्गाचे काम अखेर पूर्ण झाले असून, महापौर डॉ. कविता …
Read More »‘भगव्या’ची पळवापळवी
वर्षभरापूर्वी ‘चलो अयोध्या’ असा नारा देणारी शिवसेना आज राष्ट्रवादीच्या तालावर नाचताना पाहून अनेक जुन्या-जाणत्या शिवसैनिकांना देखील दु:ख होत असेल. आमचे रंग आणि अंतरंग अजूनही भगवेच असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी वचनपूर्ती सोहळ्याच्या मंचावरून केला, तो किती पोकळ आहे हे तेथील गर्दीला देखील उमगले असेल. उक्ती आणि कृतीमध्ये विसंगती दिसली तर …
Read More »गगनगिरी महाराज समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात
खोपोलीत हजारो भाविकांनी घेतले दर्शन खोपोली : प्रतिनिधी पूज्य गगनगिरी महाराज यांचा 12 वा समाधी सोहळा मंगळवार व बुधवारी खोपोली येथील गगनगिरी महाराज मठात विविध सामाजिक उपक्रम व हजारो भाविकांच्या दर्शनाने संपन्न झाला. मठाचे मुख्य आशिष भाई महाराज यांच्या देखरेखीखाली हा समाधी सोहळा पार पडला. नगरपालिकेकडूनही आवश्यक सुविधा या निमित्ताने …
Read More »मुरूडमध्ये युवा स्पंदन स्पर्धा उत्साहात
मुरूड : प्रतिनिधी कोंकण उन्नती मित्र मंडळ संचालित वसंतराव नाईक महाविद्यालयाने नुकताच युवा स्पंदन 2020 हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुभाष महाडिक यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मधुकर वेदपाठक यांनी प्रास्ताविक केले. नजीरभाई चोगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला वासंतीताई …
Read More »अखेर ‘तो पट्टा’ पेव्हर ब्लॉकने भरला
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील अनेक रस्त्यांच्या कामाचा ठेका घेतलेला ठेकेदार एका रस्त्याचे काम सोडून दुसर्या ठिकाणी काम करत असल्याने रस्त्यावरील किरकोळ कामे अर्धवट अवस्थेत तशीच राहिली होती. त्याने शहरातील कन्याशाळेसमोरील रस्त्याच्या पट्ट्यातील एक साईटमध्ये पेव्हर ब्लॉक बसवले तर दुसरी बाजू तशीच सोडली होती, त्यामुळे या ठिकाणी काही वाहनांची …
Read More »फणसाड अभयारण्य ठरतेय पर्यटकांचे आकर्षण
मुरूड तालुक्यातील सुपेगाव परिसरात फणसाड अभयारण्याचा विस्तार झालेला असून सुमारे 54 चौरस किलोमीटर क्षेत्रात या अभयारण्याचे क्षेत्र व्याप्त असून मुरुड, रोहा व अलिबागच्या सीमा रेषेचाही समावेश यामध्ये होत आहे. रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर हिरव्यागार झाडाच्या कुशीत वसलेले एक घनदाट जंगल अर्थात फणसाड अभयारण्य होय. मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावर पनवेल पेण …
Read More »पेणमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत महिलांची भव्य रॅली
पेण : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत पेण येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना विभागाच्या वतीने शहरात महिलांची भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीत महिलांनी बॅनर हातात घेऊन बेटी बचाओ बेटी पढाओच्या घोषणा देत महिलांच्या सक्षमीकरणाविषयी जनजागृती केली.या रॅलीची सुरूवात पेण नगर परिषद कार्यालयापासून करण्यात आली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper